Showing posts with label बालपणीच्या कविता. Show all posts
Showing posts with label बालपणीच्या कविता. Show all posts

Sunday, July 3, 2011

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

बालपणीच्या   कविता 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार,
शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॆलो हॆलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्याच्या फुलातून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

कित्ती कित्ती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
-अनामिक