Wednesday, May 29, 2013

चित्रकविता - 5

चित्रकविता 




(इथे वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांचा निषेध करण्यासाठी ..... चारोळीचा उपयोग केला आहे .) 




 
(इथे मुलींच्या भृणहत्या रोखण्यासाठी … चारोळीचा उपयोग केला आहे .)  


(इथे स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी चारोळी चा उपयोग केला आहे .)

(इथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी चारोळी चा उपयोग केला आहे .)




Tuesday, May 28, 2013

Friday, May 24, 2013

मी अद्वैताची प्रचिती.






 मी अद्वैताची प्रचिती..

मी अथांग आकाशाची व्यापून निळाई सारी
मी तेजाची देहावर लेऊन झळा सोनेरी
होऊन हवा भिरभिरती मी पाण्यावर थथरते
त्या महाभूतांच्या हृदयी मी स्पंद होऊनी रूजते

मी चाहुल ऋतूराजाची, कोकिळ मजसंगे गातो
त्या स्वर्णालंकारांनी मोहरून आम्रही न्हातो
मी येता तरु-वेलींना लोभस बाळसे धरते
मी भरात येता सार्‍या सृष्टीला येते भरते

मी यौवन सळसळणारे धुंदीतच रमते वेडी
मी गाणे घमघमणारे, सारंग कधी मी तोडी
मी गुंफ़त, आळवित जाते लडिवाळ मनाच्या ओळी
कधि होत व्यथा राखडी, कधि रंगाची रांगोळी

मी संध्या केशर भरली, क्षितिजाशी मंतरलेली
मी रात्रीची शितलता, दश-दिशांत पांघरलेली
पक्ष्यांची किलबिल घेउन, मी पहाटेस अवतरते
मी अद्वैताची प्रचिती, मी डोळ्यातुन पाझरते

तो विश्वाचा निर्माता, मी रूप आगळे त्याचे
मज दिलेस तू सौंदर्य अन पाशही कर्तव्याचे
मी झटले, लढले, मिटले कर्तव्या-पूर्तीसाठी
मी बंध उभ्या जन्माचे बघ सोडून आले पाठी

- प्राजु

Wednesday, May 22, 2013

पुन्हा एकदा चं .गों .च्या चारोळ्या - प्रा .प्र.शं . तासे

पुन्हा एकदा चं .गों .च्या चारोळ्या - प्रा .प्र.शं . तासे 

लोकप्रभा मध्ये आलेला चं .गो विषयीचा लेख..
पुन्हा एकदा चं.गों.च्या चारोळ्या book format मध्ये convert केला आहे...













 




ई साहित्य कांदबरी विभाग


टल्लीची शाळा
----------
टल्लीची शाळा. ई साहित्यचं पहिलं ई पुस्तक
----------
Free download ‪#‎eBook‬ copy @
http://www.esahity.com/uploa…/…/1/2/501218/tallichishala.pdf
----------------



सईची वही... काही पानं निखळलेली ~ सुप्रिया जाधव जोशी
July 14, 2013
------------------

प्रेम... एक नाजुक भावना.
वयात येता येता प्रेमात पडणं हे अत्यंत नैसर्गिक. पण त्यातल्या भावुकतेला दुर्बलता मानून जेव्हा कोणी फ़सवणुकीचे जाळे विणतो आणि त्यात एखाद्या अजाण मुलीचा बळी जातो. पण कुणी अशीही निघते जी त्या जाळ्याला भेदून त्या पारध्याचीच शिकार करते. एका धाडसाची कथा आहे ही.
लाल गुलाबांसह हा एक लाल सिग्नल दाखवण्याचा प्रयत्न. 
प्रत्येक मुलामुलीने आणि पालकांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
----------------------



Free download #eBook copy @ :  


-------------------



आरंभ एक नवी वाटचाल ~ शशांक नवलकर
---------
लघु कादंबरी ... प्रेम कथा
-------
Free download #eBook copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aarambh_ek_navi_vatchal......pdf

------------

रोबो : लेखक : दिनानाथ मनोहर
May 22, 2013
---------------------------
महाराष्ट्र राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कादंबरीचे पारितोषिक लाभलेली कादंबरी
--------------------------------
Free download #eBook copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/robo.pdf

---------------
रोबो संग्रहातून .......

त्या माणसाच्या ओठांवरून ओघळणाऱ्या हास्यामधून, त्याच्या नजरेमधून सर्व काही स्पष्ट होत होते. त्याने खिशात हात घातला. बराच वेळ खिशात चाचपले. खिशातून एक पावली काढून त्याने तिच्या हातात दाबली. पावली काढताना मघाशी खिशात कोंबलेले ते पत्र बाकावरून घसरत जाऊन त्याच्या पायाशी पडले. तिने थोडीशी नाराजी दाखवली; पण पावली कमरेला लावीत ती उठली व त्या माणसाच्या समोर बसलेल्या माणसाकडे सरकली. डिकीने घाईघाईने खिशातून एक रुपयाची नोट काढून समोरील बाकावर ठेवली. त्याने आपल्या सहप्रवाशांकडे पाहिले. समोरच्या बाकावरील दोघे सैनिक हसत होते. एकटक त्या पोरींकडे पाहाणाऱ्या त्यांच्या डोळयांत वखवखलेली भूक होती. त्या पोरींनी आता दुसऱ्या माणसांचा ताबा घेतला होता. दोघी त्याच्याशी लाडीगोडी करत होत्या. त्याच्या खिशाकडे त्यांचे लक्ष होते.
डिकी कोपऱ्यात सरकला, त्याने आपले अंग आक्रसून घेतले होते. त्यांच्यातील एक पोरगी त्याच्याजवळ आली. त्याने बोटानेच बाकावरील नोट तिला दाखवली, ओठावर स्मित आणण्याचा त्याने प्रयत्न केला. आपल्या डोळयांतील घृणा, किळस तिला दिसू नये, असे त्याला वाटत होते. त्या पोरींना कोण नाचावयास लावते, त्यांना रस्त्यावर येण्यास भाग का पडते, हे त्याला समजू शकत होते.
ती पोरगी क्षणभर घोटाळली, त्याच्या चेहऱ्याकडे पाहात राहिली, मग झटकन् तिने ती नोट कपाळाला टेकवून, किंचित खाली झुकून तिने त्याला सलाम केला आणि ती मागे वळली.
मिसामारी स्टेशनवर पाच सहा नग्न मुले आरडाओरड करीत डब्यात शिरली व दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडली. त्याने बाहेर पाहिले. गाडी स्टेशनच्या बाहेर उभी होती. समोरच एका शेतातील झोपडीबाहेर एक स्त्री कमरेवर पोरीला घेऊन उभी होती. नजर शून्यात लावून, अविचल, स्तब्ध. गाडी चालू झाली, तरी ती स्त्री तशीच उभी होती. खिडकीतून डोके बाहेर काढून तिच्या पुसट होणाऱ्या, अंधारात वितळत जाणाऱ्या आकृतीकडे पाहात राहिला. तिच्या कमरेवर बसलेल्या त्या पोरीचे भवितव्य काय आहे? कदाचित दहा बारा वर्षांनंतरती पोर मोठी होऊन पेटीच्या सुरावर अशीच रेल्वेच्या डब्यात त्याच्यापुढे येईल!
चीनने दिलेल्या धक्क्याच्या खाणाखुणा जरी नष्ट झाल्यासारख्या वाटत असल्या, तरी सैनिक तो प्रसंग अजून विसरले नव्हते. अजूनही गप्पा मारताना जुने लोक एकेका स्थळाशी, रस्त्यावरील मैलांच्या दगडाशी निगडित असलेल्या आठवणी सांगत होते. पंजाब सरहद्दीवर, सरहद्दीपलीकडील माणसांबद्दल असणारा द्वेष, चीड, संताप त्याला अनेकदा जाणवला होता. पण इथे त्याचा अभाव होता. खरे म्हणजे तो प्रसंग एका पराभवाची, एका न लढलेल्या युध्दची कहाणी होती. तरी पण सैनिकांच्या आठवणींना शरम, अपमान, दु:ख यांची झिलई नव्हती.

----------------------


ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
esahity@gmail.com

Sunday, May 5, 2013

सारे काही तेच आहे

सारे काही तेच आहे…

सारे काही तेच आहे…

तेच घर …
तेच दार...

तिच माणसं …
तिच आपुलकी...

तोच मायेने फिरवणारा हात ….
तीच सावली ….
तेच जिवलग…

तोच जिव्हाळा …
तिच नाती ….

तोच आपलेपणा …
तोच नात्यामधला ओलावा …

सारे काही तेच आहे…
फक्त बदलली आहे ती वेळ …

आज ह्या घरची मुलगी …
उद्या त्या घरची सून होणार आहे …

---विद्या
4-5-2013

Thursday, May 2, 2013

मैत्री

                                                                        मैत्रीचे नाते

मैत्रीचे नाते अल्लड... !
जिवनात रंग भरुनी ते जाई ..!!
जन्म मरणाच्या विळख्याला विस्मरुनी..!
क्षणोक्षणी सुखद अनुभूती ते देई ...!!
-विद्या 
(अक्षरवेल)



'माय मराठी' अमुची मायबोली
माधुर्य तिच्या शब्दांचे
सदा रुळावे अमुच्या ओठी
हीच इच्छा वसे मनी ..
- विद्या पालकर

2-5-2013 

Wednesday, March 27, 2013

Tuesday, March 26, 2013

होळी SMS



रंग प्रेमाचा , रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा , रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा



-------------------------------------------------------
होळी रे होळी, भांगेची गोळी
होळी रे होळी, पुरण पोळी

होळी रे होळी, रंगीत खेळी
होळी रे होळी, उमलली कळी

होळी रे होळी, गालावर खळी
होळी रे होळी ,ती त्याची साळी

होळी रे होळी ,टवाळांची टोळी
होळी रे होळी ,राग द्वेष जाळी…………

होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
-------------------------------------------------------
भिजुदे रंग अणि अंग स्वछंद ,
अखंड उडु दे मनी रंग तरंग ,
व्हावे अवघे जीवन दंग ,
   असे उधळुया आज हे रंग ...
होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
-------------------------------------------------------

Friday, March 22, 2013

तू सावली




तू सावली माझ्या जीवनाची ..
तू श्वास माझ्या अंतरीचे ..

कधी अश्रू बनून ओघळणारी तू..
तरीही सदा जवळ वाटणारी तू ..

जीवनात रंग भरुनी जाणारी तू ..
नवी स्वप्ने दाखवणारी तू ..

काळाच्या आघातात हरवलेली तू ...
मात्र मनाच्या कुपीत सदा दडवलेली तू...
- विद्या 
*आईच्या स्मरणार्थ मी लिहिलेली कविता *

Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Saturday, February 16, 2013

सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात



सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात,
खोल गेलेले डोळे अन पडून गेलेले दात!
पण पाठीवर हात ठेवता, मिटते सारी काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

आजीच्या हाताची चव लय लय भारी,
पोट भरेपर्यंत मग ती स्वःता मला चारी!
हॉटेल मधल्या पिझ्झाला तिची चव नाही,
भूक लागल्यावर चारायला आता ती नाही!

आईच अन आजीच मात्र कधीच पटत नाही,
एकदातरी भांडल्याशिवाय दिवस जात नाही!
बाबांनी ओरडल्यावर मात्र आई रडत बसते,
तेव्हा मात्र स्वःता हि तिचे डोळे पुसते!

आजीची माझ्या गोधडी सतरा ठिकाणी फाटलेली,
तरीसुद्धा मायेने ओतप्रोत भरलेली!
बेडवरच्या गादीवर झोप मला येत नाही!
पाणावलेले डोळे मग गोधडी तुझी शोधत राही!

आजीचा माझ्या जीव सगळ्या तिच्या लेकरांवर,
गोठ्यामधली गाई अन कोंबडीच्या पिल्लावर!
सगळ्यांचीच नेहमी करत बसणार काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

माझ्यावर माझी आजी जीवापाड प्रेम करायची,
शब्द पडण्यापूर्वीच इच्छा पूर्ण करायची!
त्या दिवशी मात्र तिन माझ ऐकलं नाही,
हाका मारून रडलो तरी साद दिली नाही!

रडून रडून नंतर डोळे गेले थकून,
आजी माझी गेली आयुष्यातून निघून!
लाडक्या तिच्या नाताला एकटच माग सोडून,
आजी माझी गेली देवाकडे निघून!

देवाने अस का केल मला माहिती आहे,
माझ्याइतकाच तोसुद्धा प्रेमाचा भुकेला आहे!
ए देवा, आजीला माझ्या नेहमी सुखात ठेवायचं,
पुढच्या जन्मीसुद्धा तिलाच तू पाठवायचं!
-अनामिक 

Friday, February 15, 2013