Friday, July 10, 2026

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र

सानेगुरुजींचे पाऊसा संबधी एक पत्र,

प्रिय सुधा...

त्या दिवशी थोडा पाऊस आला. सारी झोपली होती. पाऊस आला म्हणंजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे मला नेहमी वाटते. बाहेरच्या झाडावर टपटप आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात नाही? मी खिडकीतू बाहीर हात घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावर फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावंसाळा अजुन नाही सुरु झाला. होइल लवकरच. ढग दोन आले होते,रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळ्या आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणंजे विश्वंभराचे मुक भाव गीत आहे.! खिडकीतून मध्य रात्री माझ्या सारख्या कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?

जुन्या आठवणी गमतीच्या वाटतात.आज दादा नाहीत,वैनी नाहीत,परंतु या स्मृती आहेत. चैत्र वैशाखाचे दिवस आले! असे चांदणे पाहिले की त्या स्मृती पुन्हा जागृत व्हायच्याच नाही? 

जीवनात दुःखे आहेत, सुखे आहेत. परंतु सुखावर,आनंदावर दृष्टी ठेवून आशेने माणसाने वागावे. फुले, फळे, पक्षी, आकाश, तारे, रवि, शशी, नद्या, सागर, वने, उपवने, मित्र, सखे-सोयरे या आनंदाच्या रात्री आपल्या सभोवती आहेत. सांयकाळी हल्ली किती मस्त देखावा दिसतो! ढगांचे शत आकार दिसतात! क्षणात हत्ती तर क्षणात धावणारे ससे! क्षणात खादीचे पोशाख केलेले ढेरपोटे व्यापारी, तर दुस-या क्षणी भरजरी पोशाख केलेले विश्वभंराचे भालदार चोपदार! अनंत रंगाची अनंत मिश्रणे! जणू विराट नाटक चालु असते. किती अंक, किती प्रवेश! आणि शेवटी सारे रंग लोपतात! गंभीर अंधार येउ लागतो! शेवटचा काळा पडदा पडतो!

रवीद्रनाथांना सायंकाळच्या कृष्णछाया नेहमी मृत्युचे स्मरण करुन द्यावयाच्या. जणू रोज सांयकाळी आपण आपलेच नव्हे तर सा-या समाजाचे,जगाचे थोडक्यात रुपात्मक नाटक बघत असतो...

सुधा,मी तुला जवळजवळ गेले वर्षभर दर आठवड्यास पत्र लिहीत आहे परंतू आता हे शेवटचे साप्ताहीक पत्र. आता मी तुला केंव्हा तरी अधून मधून लिहीन. परंतु आता बंधन नको....!

तुझाच
आण्णा {सानेगुरुजी}
10 जून 1950

0 comments: