Showing posts with label मराठी बोला. Show all posts
Showing posts with label मराठी बोला. Show all posts

Wednesday, May 27, 2020

बातमी

भारतीय राज्यघटनेचे प्रकरण चार - विशेष निदेशक तत्त्वे : अनुच्छेद ३५०-क प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरविणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वत:ला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. असे असता प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाले असून ते तात्काळ थांबवावे.
#मराठीशाळावाचवा
#मातृभाषेतूनशिक्षण

#मराठीएकीकरणसमिती


Saturday, March 21, 2020

Saturday, March 7, 2020

मराठी बोला चळवळ १

तारक मेहता.." नावाच्या कधीच न पाहिलेल्या मालिकेच्या "मुंबईची भाषा कोणती?" या वादावर काही निरीक्षणे.

१) अनेक लोक याला विरोध करायला सरसावले. अनेक मराठीप्रेमींनी हा विषय समाज माध्यमांत उचलून धरला आणि त्याबद्दल चीड व्यक्त केली हे चांगले लक्षण आहे. लोक आता अधिक सजग होत आहेत हे उल्लेखनीय आहे.

२) निर्मात्याने निवेदन देताना "मी महाराष्ट्रीय गुजराती आहे, सर्व भाषांचा आदर करतो."  असा फापट पसारा मांडला पण माफी सोडा साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. 'मालिकेतील तो भाग पुन्हा चित्रित करून चूक सुधारू.'  हे तर लांबच. हा माज का येतो? कारण आपण यांना आधीपासून "मराठीच हवी." असं स्पष्ट शब्दांत न सांगता अतिसहिष्णुपणे यांच्या भाषेत व्यवहार करत गेलो. 

३) (अजूनपर्यंत तरी) राजकीय पक्षांमध्ये मनसे आणि मराठी कालावंतांपैकी सुबोध भावे यांनीच या विषयावर भूमिका मांडली. बाकीच्यांना निवडणुका आणि चित्रपट येणार असतील तेव्हाच का मराठी आठवते?  मराठी हा सर्वपक्षीय आणि सर्व कलावंतांचा मुद्दा असायला हवा हे आपण मराठी लोकांनीच यांच्या डोक्यात बसवायला हवं आणि त्यासाठी मराठी एकगठ्ठा मते किंवा मराठी मनोरंजनाचा प्रेक्षक निर्माण व्हायला हवा. 

४) आपण जर या मालिकेतील नट आणि निर्माते यांच्याकडून कोरडी माफी लिहून घेतली आणि उद्या परत यांच्याच मालिका पाहणार असू, तर त्याला काहीही अर्थ नाही. 
या मालिका पहाणे बंद करणे हाच एकमेव उपाय करायला हवा. 

५) चेन्नईची भाषा तामिळ पण मुंबईची मराठी असं का म्हटलं नाही याचा आपण जरा अधिक गंभीरपणे विचार करायला हवा.  आज व्हाट्सअप फेसबूक ट्विटरवर उर बडवून आपण या संवादाला विरोध केला आणि उद्या घराबाहेर पडल्यावर बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षावाले, भाजीविके, फळविके यांच्याशी मराठीतच बोलणार नसू तर "मुंबईची भाषा मराठी नाही हे आपणच सिद्ध करत नाही का?" 

त्यामुळे फक्त मराठी मनोरंजनाला प्राधान्य आणि फक्त मराठीत व्यवहार करणार असा निर्धार सुद्धा करायलाच हवा तर येत्या काळात परिस्थिती बदलताना दिसेल.

- चंदन तहसीलदार


मराठी एकीकरण समिती १

अखेर लेखी तक्रार दाखल

कारवाई करून मराठी बोलणारा अधिकारी  मुंबई शहरासाठी नेमावा मुख्यमंत्री महोदयांकडे करणार मागणी - गोवर्धन देशमुख

"मुंबई शहराचे नवनिर्वाचित #पोलीस आयुक्त सेवेवर असताना माध्यमांशी बोलताना किंवा इतर ठिकाणी #मराठी भाषेचा वापर करत नसल्याबद्दल #मराठीएकीकरणसमिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंदा पाटील आणि सहकारी यांनी मा. गृहमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली"