Showing posts with label मराठी कट्टा. Show all posts
Showing posts with label मराठी कट्टा. Show all posts

Monday, November 27, 2017

कोणे एके काळी म्हणे...

कोणे एके काळी म्हणे...
'Windows' म्हणजे 
एक 'खिडकी' होती 
आणि
'Applications' म्हणजे 
कागदावर लिहिलेला
'विनंती अर्ज' होता...
जेव्हां 'Keyboard'
म्हणजे 'पियानो'
आणि
'Mouse' म्हणजे
फक्त 'उंदिरच' होता...
जेव्हां 'File' ही
कार्यालयातील
'एक महत्वाची वस्तू' होती
आणि
'Hard Drive' म्हणजे
महामार्गावरील 'एक
जिकिरीचा वाहन प्रवास' होता...
जेव्हां 'Cut' हे 'चाकूने किंवा
धारदार शस्त्राने' करत होते
आणि
'Paste' हा
'डिंका' ने करत होते...
जेव्हां 'Web' म्हणजे
'कोळ्याचे जाळे' होते
आणि
'virus' ने फक्त
'तापच' येत होता...
जेव्हां 'Apple'
आणि
'Blackberry'
ही केवळ 'फळेच' होती...
त्यावेळी म्हणे आपल्याकडे
कुटुंबासाठी,
आणि
मित्र-मैत्रिणींसाठी
मुबलक वेळ होता...!!!
कोणे एके काळी म्हणे...
खरंच काय असं होतं...???
#fb #msg

Friday, April 7, 2017

सल्लागार

सल्लागार.... जीवनात बहार
************
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता
मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता
आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
************
इतके जरी लक्षात घेतले तरी जीवनातील निम्मे प्रश्न आपोआप सुटतील.
मात्र यासाठी स्वतः जागरूक राहणेही गरजेचे. आपल्याला छान वाटेल असे काहीतरी बोलतोय म्हणून ती व्यक्ती सल्लागार होऊ शकत नाही. तटस्थ पणे त्या व्यक्तीने वागणे आवश्यक !!
***
सुदैवाने मला त्या त्या काळात असेच अनेक श्रीकृष्ण लाभले म्हणूनच तर खेड्यातून पुण्यात आलेला हा "धनंजय" काहीतरी करू शकला !!
**
#DD

साकेत प्रकाशन



ग्रंथास्वाद

साकेत प्रकाशनच्या बाबा भांड यांनी त्यांच्या योगी या पुस्तकाचे ग्रंथास्वाद मधे केलेले अवलोकन. एका जन्मजात योग्याची कहाणी.





Thursday, April 6, 2017

महिला व पुरुषांमधील मैत्री बद्दल

महिला व पुरुषांमधील "मैत्री"बद्दल
आपण कधी विचार करायला शिकणार ?
**********
अनामिक
**********
काल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री, नातेसंबंध असं काहीकाही बोलत असताना तो अगदी सहज म्हणाला, “मला ना मित्र म्हणजे काऊन्सलर वाटतात.  बघ ना, आपण त्यांना काय काय सांगतो आणि ते काय काय ऐकून घेतात. आपल्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं पोहचत नसेल ही. कदाचित त्यांच्या आकलन अंदाजानुसार ते त्या गोष्टी ऐकत राहतात. आपली काही अडचण असेल तर प्रत्येकवेळी ते उत्तर शोधायला मदत करतात असंही नव्हे. पण नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं. ‘व्हॉट अ रिलीफ’  ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्या अर्थी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हे काऊन्सलरच असतात.
असं मनातला निचरा होऊ द्यावं असा ज्यांच्या आयुष्यात माणूस नसेल त्यांची काय घालमेल होत असेल. किती साठत असेल आणि मग ते काय करत असतील याचं, कसं डील करत असतील अशा अव्यक्ताला असा एक प्रश्‍न पडतो मला. काही वेळा मला सांगावंसं वाटतं त्यांना सांग, मला सांग. मनातल्या मनात विचार करत किती कुढशील? बोल एकदाचा आणि मोकळा हो. मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हलनरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ना, आपल्याला खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात. मोजकीच असतात. त्या पलिकडच्या माणसांना खरं तर आपण परिचित, ओळखीचा म्हणायला हवं ना, पण तसं म्हणत नाही. उलट आपण किती मोघमपणे किंवा सरसकटपणे मित्र-मैत्रिण म्हणून मोकळे होतो.
काही वेळा आपल्या अगदी जवळच्या नात्यातही ही मोकळीक मिळत नाही. अगदी नवरा-बायकोच्याही. लग्नानंतरच्या काही काळात लक्षात येतं की, आपल्या आवडीनिवडी किंवा आपला साधा संवाद हा आपण आपल्या जोडीदाराशी करू शकत नाहीयोत. न बोलता येण्याची, न सांगता येण्याची ही भूक मग कशी भागवायची? नवरा बायकोत काही बिनसलेलं नाहीये पण संवादाच्या या जागा नाहीयेत मग काय करायचं? साहजिकच आपण आपल्या जोडीदारापलिकडंही अशी माणसं शोधू लागतो. ज्यांच्यासमवेत आपला संवाद होऊ शकतो. आपलं बोललेलं ऐकणारं आणि समजून घेणारं अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. विवाहित असल्यास ही जागा केवळ नवरा-बायकोतच मर्यादित असावी असं मानणं किती चूकीचं आहे. स्त्री-पुरूषांच्या नात्यांचा विचार वासनेच्या पलिकडं करता यायला हवा. मोकळ्या-ढाकळ्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या एकमेकांशी शेअरींग करणारं हे नातं तर मैत्रीच्याही पलिकडचं असेल. आपण उगीच अशा सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो. ”
तो हे सर्व सांगत होता तेव्हा मला ‘डिअर जिंदगी’ चित्रपट आठवत होता. या चित्रपटात छोटे-छोटे असे अनेक घटक आहेत की जे आपल्याला आनंद देऊन जातात. याच चित्रपटात काऊन्सिलींगच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलेली कायरा म्हणजेच आलिया भट शाहरूख खानला विचारते, “इज देअर सच थिंग अ‍ॅज अ परफेक्ट रिलेशनशिप? एक स्पेशल रिश्ता?” हा प्रश्‍न खूप मोलाचा आहे आणि यावरचं शाहरूख खानचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं. तो म्हणतो, “का? असं एकच स्पेशल नातं का असावं? अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते? एखाद्यासोबत स्पेशल म्युजिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीच नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमॅण्टीकवालं नातं असतं. पण आपण या रोमॅण्टीक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांच ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्वप्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो? असं करणं म्हणजे रोमॅण्टीक नात्यावर अन्याय करण्यासारखंच की.” किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात. जसा माझा मित्र सांगत होता की, मित्र-मैत्रिणी कान्ऊसलर असतात. म्हणजे डिअर जिंदगीतील स्पेशल नाती म्हणजे मित्राच्या व्याख्येनुसार स्पेसिफिक काऊन्सलरच की.
किती गंमतीदार आहे ना, जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो, पण ते शक्य असतं का? आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का? एकूणात काय, विवाहित जोडीदारापलिकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. त्यांना काय म्हणायचं? मैत्री? प्रेम? मैत्री-प्रेमाच्या अधेमधे? मैत्री-प्रेमाच्या पलिकडे? नाही माहित काय म्हणायचं.
मित्र जसा म्हणाला, “स्त्री-पुरूषांच्या नात्यात नेहमी वासनाच असते असं नाही गं.”
हे अगदी बरोबर आहे, आपण स्त्री-पुरूषांच्या नात्यांमध्ये अशी वासनाच शोधत असतो. त्यात त्या पलिकडं काहीतरी असेल याचा विचार करण्यात खुजेपणा दाखवतो. नाही का? मागे एकदा एका मैत्रिणीने, अशाच रितीचं एखादं बॉण्डींग शेअर करत असणार्‍या ऑफिसमधल्या दोन सहकार्‍यांवर कॉमेन्ट केली होती. “बघ, रोमिओ ज्युलिएट येताहेत.” मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली,  “हे मी नाही म्हणतेयं. अख्खं ऑफिस म्हणत आहे. ” स्वत: विचारांनी बर्‍यापैकी मोकळी असणार्‍या या मैत्रीणीकडून अशी कॉमेंट ऐकून कसंसच झालेलं. त्यावेळेसच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही. पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं की, ‘पण तूही कोणाची अशी खास मैत्रिण असशील तर इतरांनी काय म्हणावं तुला?’ असो.  डिअर जिंदगी बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाहीतर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारख्या काऊन्सलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल...!! 
*****