Showing posts with label marathi song lyrics. Show all posts
Showing posts with label marathi song lyrics. Show all posts

Monday, January 14, 2019

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव

नाचती वैष्णव, मागेपुढे



मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड

अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन

निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

गीतकार : गदिमा
गायक : पं. भीमसेन जोशी
संगीतकार : पु ल देशपांडे

https://youtu.be/2Lcb7vTUlvE

Saturday, April 29, 2017

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
_________________________________

गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

Sunday, March 12, 2017

गीत

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !

भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;
अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा !

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

Thursday, February 23, 2017

सोनियाच्या उंबऱ्यात

#गीत
 
सोनियाच्या उंबर्‍यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबील
पाणवठे जागे झाले कांकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणार्‍या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
गीत - दासू
संगीत - अशोक पत्की
स्वर - स्वप्‍नील बांदोडकर , माधुरी करमरकर
गीत प्रकार - मालिका गीते
शीर्षक गीत, मालिका- सोनियाचा उंबरा, वाहिनी- ई टीव्ही
https://www.youtube.com/watch?v=A5I3JprY9PY

Monday, February 13, 2017

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
गीतकार : ग्रेस , गायक : सुरेश वाडकर , संगीतकार : श्रीधर फडके , गीतसंग्रह : ऋतू हिरवा

Friday, February 10, 2017

तू जिथे मी तिथे

तू जिथे मी तिथे


तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे .... आता
स्पर्श ओल्या ... वाटा
मी न माझी राहिले आता


सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे
शोधते स्वतःला भेटूनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला


तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा
मी न माझी राहिले आता
सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन् त्या ढगांवर चालणे


गुणगुणावे मी तुला मग तू मला ही सुचावे
बोलुनी झाले तरिही खूप काही उरावे
बोलणे नको हे सांगणे आता
पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा


अंतरे संपून जावी विरघळावे दुरावे
कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे
सांगणे सुखाचे ऐकवू जगा
पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा


Lyrics: Ashwini Shende
Tu Jithe Mi Tithe Song - Photocopy | 
New Marathi Romantic Songs 2016 | 
Parna Pethe, Chetan Chitnis

Tuesday, January 31, 2017

ओली ती माती, ओला तो गंध

ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू, माझ्या श्वासात एक तू
पानांत तू, दंवात तू
रोमारोमांतच तू
सरीत तू, लहर तीच तू

माझी न मी राहे, पाहुनी तुला रे
आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले, बरसुनी तू ये ना रे

ढगांचा स्पर्श मृदुल तो
रवीला ही लपवतो
मंद वारा वाहतो, चांद खुशीत हासतो
ओठांत मी गुणगुणू, कानत तू रुणुझुणू
ऊन ही तू, सावली तू, इंद्रधनु तू
पहाटेचा समीर तोच तू

गीतकार : नेहा राजपाल, गायक : -, संगीतकार : नेहा राजपाल, चित्रपट : फोटोकॉपी (२०१६)


चित्रपट ~ फोटो कॉपी 

Monday, January 9, 2017

कितीदा नव्याने तुला आठवावे

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे


कितीदा झुरावे तुझ्याच साठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा झुरावे तुझ्याच साठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

कितीदा सुकून पुन्हा फुलावे…

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे

किती हाक द्यावी तुझ्या मनाला
किती थांबवावे मी माझ्या दिलेला
कितीदा रडुनी जीवाने हसावे

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे


चित्रपट : ती सध्या काय करते
 Devayani Karve-Kothari

Thursday, May 19, 2016

तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो..

तुझी आठवण ..........


कधी न येई ओठी माझ्या नाव तुझे ............ पण,
डोळ्यांमधील हजारो हाका तुझ्याच साठी
वादळातही खचे ना ज्याचा धीर कधीही ....... पण,
बुडते माझे जहाज तुझ्याच साठी

कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
दिसूनही मी दिसलो नाही ,
जवळ तुझ्या मी होतो इतका,
बघुन घे तू नजर फसावी,

असा तुझ्या आसपास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो........
कुठेतरी मग भरकटलेला....
धीर समजलो ज्या हाकेला,
केवळ तो आवाज निघाला,
सदैव स्वप्ने बघणारयाचा,
असा कसाच का भ्रमनिरास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला....
रात्र काल एकटीच होती चांद तिला भेटलाच नाही,
हायाय या साध्या विरहाचा त्रास किती पण दवास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला...


Friday, March 11, 2016

श्याम वनमाली गिरिधारी

श्याम वनमाली गिरिधारी

श्याम वनमाली गिरिधारी

मृगमदतिलक विराजत भाली
कृष्ण कुरळ अलक मृद गाली
शारद पूनावा कालिंदी तटी
रास रंगला कदंब तळमटी
गोप गोपिका कर कर गुंफिती
भ्रमती धुंद लय ताली

श्याम वनमाली गिरिधारी
कृश कटी वरती
झुलती किंकिणी
किरण झळकती
रत्न कंकणी
रुणुझुणु  नाद पैजनी  
यमुना गान मय झाली

श्याम वनमाली गिरिधारी
हसीत  बिलसते
हरी वदनावर
अधरी  मुरली
मधुर मधुर
स्वर
रास रंगला रमले स्थिर चर
झुकले नील नभ खाली
श्याम वनमाली गिरिधारी


~ ओंजळीतून मनाच्या 


Sunday, February 14, 2016

दोन हे आहेत पेले

दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू
कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू

दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी
पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू

दोन हे आहेत पेले एक माझा संपला
झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु

नीट न समजणारे कडवे:
दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला
होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू
~ आरती प्रभू
=============

Meaning in English : Shared by Shailesh Vaite
( https://www.facebook.com/shailesh.vaite )
I believe the poem is about two people in an intimate relationship where the sense of separateness has started fading. But one partner is still not ready to surrender totally to this merger and the other partner is urging him/her to just jump into this blissful togetherness. Thus the poem goes-

We have our own separate bodies (and lives), but perhaps they are not our own anymore (दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू), because at present we are so entangled in each other, it is so confusing as to where your existence begins and where mine ends (कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू)

These two streams of separate existence have merged with each other (दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी), this merger has enriched both of us and the sense of separate bodily existence has ceased to exist now (पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू)

We have these two separate bodies but I have given up on mine totally (दोन हे आहेत पेले एक माझा संपला), but you still have not been able to jump into this stream of joint existence and still trying to look at this relationship with objectivity of an outsider, (झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु) (I love this reference to resting of chin, it just so beautifully talks about looking at a situation objectively)

I urge you to just throw in your existence into this relationship and merge into mine (दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला) and enjoy the bliss and the ecstasy of togetherness (होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू)

Song @ https://www.youtube.com/watch?v=NNofkLly06k
song @ https://www.youtube.com/watch?v=drEJr3WlSSU

Tuesday, January 29, 2013

गडद जांभळं भरलं आभाळ

                                                              
 गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)