Monday, May 28, 2012

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली

सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
किंकिण कांकण
रुणझून पैजण
सजली नटली नवरी आली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

नवऱ्यामुलाची आली
हळद हि ओली
हळद हि ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीन नवरीच
अंग सारं माखवा
पिवळी करून तिला
सासरी पाठवा

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सासरी मिळूदे तुला
माहेरची माया
माहेरच्या मायेसंग
सुखाची गा छाया
भरुनिया आले डोळे
जड जीव झाला
जड जीव झाला लेक
जाय सासराला
आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी
ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली......
-गुरु ठाकुर 

Sunday, May 27, 2012

आयुष्य

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.देशपांडे

Saturday, May 26, 2012

वा-यावर उडणारी बटं सावरताना



वा-यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”
पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..

-अनामिक

Sunday, April 22, 2012

आई ......ती गेली तेव्हा....


आई
(आईच्या स्मरणार्थ  मी  लिहिलेली  कविता )

ती  गेली  तेव्हा दुखा:चा पाऊस कोसळत होता !!
आयुष्याच्या कटू प्रवासाची तो चाहूल देत होता !!

आता फक्त आठवणींचा वारा दुमदुमत होता मनी !!
आणि  केविलवाण्या हृदयाला जाऊन भिडत होता !!
 ओसंडून वाहणारा डोळ्यातला पाऊस सुद्धा थांबत नव्हता !!

आयुष्यातला हिरव रान कोरडं झालं होतं !!
त्या मायेच्या अस्तित्वाला परकं झालं होतं !!

आता फक्त होता तो आठवणींचा झरा !!
हुंदके देऊन रडणाऱ्या डोळ्यांना
तिच्या प्रेमाचा ओलावा !!

----------विद्या  ---------
              8/4/2012
              8:02 pm

Saturday, April 21, 2012

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे


कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

-अनामिक

Wednesday, April 11, 2012

कोणी गेलं म्हणून, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...


कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं......

आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...
आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही,
रात्रतुझीच आहे.

त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडं जगणं मागायचं असत...
-अनामिक

Tuesday, April 10, 2012

थंड थंड हिवाळा संपला


थंड थंड हिवाळा संपला, गरम गरम उन्हाळा असा पेटला,
आटोपून परीक्षेचा भार, मग गावाला जायचा बेत आखला,

गावाला जायची मजाच वेगळी असायची,
ओसाड रस्ता आणि घनदाट झाडीच दिसायची,

काय काय करायचे तिकडे, हे ठरलेलेच असायचे,
कड़क उन्हात मित्रांच्या जोडीने नुसतेच भटकायचे,

वर्षभरात केलेली मस्ती मग त्याना सांगायची,
आणि नंतर नदीकाठी जाउन मजा लुटायची,

शहरातून आलोय म्हणून वेगळाच रुबाब असायचा,
प्रत्येक खेळामध्ये कसा दबदबा असायचा,

रात्री जेवणाची वेगळीच असायची मेजवानी,
आणि झोपताना सोबत आजीची गाणी,

सुंदर निसर्गाच्या सानिध्यात गार झोप लागायची,
आणि पहाटेची सुर्यकिरने चटकन डोळ्यावर यायची,

शहरात उशिरापर्यंत झोपनारे तिकडे लवकर उठायचो,
बाबा आणि आजोबांसोबत मग नदीवर आंघोळीला जायचो,

तो सुंदर उन्हाळा आता कुठेतरी हरवलाच आहे,
ह्या दगदगीच्या आयुष्यात जणू कोणीतरी पळवलाच आहे,

आता ऑफिसच्या कामात हे सारे विसरलोच आहे,
म्हणुनच का कुणास ठाउक हा उन्हाळा जास्तच गरम भासतो आहे...
-अनामिक

Sunday, April 8, 2012

आई


ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
_____________

चित्रपट : निवडुंग
गीत : ग्रेस
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर

(माझ्या आयुष्याच्या कटू आठवणीना उजाळा देऊन हृदयाशी भिडुन गेलेली हि कविता ........विद्या )

Saturday, April 7, 2012

पाऊस

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा
-ग्रेस

Friday, April 6, 2012

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे



राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?

कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची
आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे
_________________

गीत : वा. रा. कांत
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित वसंतराव देशपांडे

Thursday, April 5, 2012

माझी शाळा

माझी शाळा.....


शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं....
Highway जवळ
ची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं....
... शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team
होती ....
Cricket च्या वेळी ground वर
cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन
मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हातालाटेकू
देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र....
सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामचभिजत
जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात
उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ....
Black -board वर
बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव
लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा....
प्रयेत्येक Off -period ला P.T.
साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा....
तो बर्फाचा गोळा संपवायचा....
मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही....
कधी कोणी link नाही लावायचं...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक
वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...
इतिहासात वाटतं ....
होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च
प्रमेय ...
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य...
मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य....
हिंदीतली आठवते
ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा ...
शाळेतल्या gathering चा dance...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा...
तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms
आणि वह्या पुस्तकांचा set.....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ....
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात....
desk वर pen ने त्या "pen fights"
खेळणं ....
exams मधल्या ...
रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या
जुळवणं ...
चिखलातल्या त्या football
च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं ..
-अनामिक

Wednesday, April 4, 2012

Friday, March 23, 2012

मराठी हास्यकट्टा 42

बंड्या मुलगी बघायला जातो...

बंड्या :- काय गं इंग्लिश जमते का तुला?
मुलगी: इश्श्य ! तुम्ही प्रेमाने पाजली तर 'देशी' पण जमवून घेईन.

******************

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??
.
पक्या : ३ प्रकारचे..!
भूतकाळ..!
वर्तमानकाळ..!!
... ... ... भविष्यकाळ..!!!
.
गुरूजी : अरे वा.!!!
एक उदाहरण दे पाहू??
.
... पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलेल..!
आज प्रेम झालं..!!
उद्या पळवुन नेईन..!!! :D:D :P

******************
कहर पुणेरी पाट्यांचा
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत
होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्याववर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला. आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्......ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर
दुसर्याावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला. वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत झाला .
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच
त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल
नाही.'
******************

एका लहान मुलाच लक्ष कॅमेरा कडे वेधून ठेवण्यासाठी फोटोग्राफर त्या लहानमुलाला बोलतो.........
बाळा, कॅमेरा कडे बघत राहा...
इथून कबुतर निघेल बघ....
.
.
.
.
.
.
.
... ... .
.
लहान मुलगा :- फोकस अडजस्ट कर नीट..
पोर्ट्रेट मोडे वर काढ आणि म्याक्रो मोड ऑन ठेव...
रेसोल्युशन जास्त आल पाहिजे.....
साला म्हणे "कबूतर येईल इथून....." :D :D :D

******************

मुलगा : मी तुझो हात पकडू काय गो
मुलगी : नको ?
मुलगा : कित्याक गो
मुलगी : कारण तू माझो हात सोडून जाशित तेव्हा माका जास्त वाईट वाटात
.
... .
.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
मुलगा :(मनातल्या मनात)
बाप रे मी तर
अक्टिंग करी होतंय
हि तर ओवरअक्टिंग
करुक लागली .........................:)

******************
सासू : काय ग सटवे, तुला देवाने दोन दोन चांगले डोळे दिले आहेत आणि तांदूळ निवडताना दोन चार बारीक दगड पण तुला दिसत नाही का ??

.

.
... .
सून : सासूबाई , तुम्हाला देवाने चांगले ३२ दात दिले आहेत आणि काय तुम्ही दोन चार बारीक दगड नाही चावू शकत का ??

सून रॉक्स ........सासू शोक्स


******************

शाळेमध्ये असतांना टीचरला आपलं नाव ठाऊक आहे, हे ऐकून खूप आनंद व्हायचा.
पण कॉलेज मध्ये प्रोफेसरांना आपलं नाव माहित आहे, हे ऐकून तितकंच दुखः होतं.
खरं आहे ना??

******************


गुढीपाडवा शुभेच्छापत्रे

गुढीपाडवा शुभेच्छापत्रे


चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



Thursday, March 22, 2012

प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच प्रेम करत रहायचे आहे

 

दबक्या पावलाने गुपचुप येउन

कानात तुझ्या सांगायचे आहे...
गुलाबाचे लाल् फ़ुल
हळुच तुझ्या केसात लावायचे आहे...

... कानात तुझ्या सांगताना
गुदगुल्या तुला करायच्या आहे...
तुझे लक्श नसताना
एकटक तुझ्याकडे पहायचे आहे....

तुझ्याकडे पाहत, हळुच हसत
तुलाही हसताना पहायचे आहे...
हसतानाचे तुझे मधुर सौन्द्र्य
डोळ्यान्च्या कोपर्यात साठवायचे आहे..

तुझे बोलने, तुझे हसणे
मनात कैद करुन ठेवायचे आहे..
प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच
प्रेम करत रहायचे आहे...

तु पुढे चालताना मागे
तुझी सावली बनुन चालायचे आहे..
क्शणोक्शणी तुझी आठवन काढत
रोज किवता िलहायची आहे.. ♥
-अनामिक

Wednesday, March 21, 2012

तुझ्यावर जिवापार प्रेम करावस वाटत

तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत

तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत..
-अनामिक

बायकांच्या या पाच गोष्टी कधी समजत नाहीत

बायकांच्या या पाच गोष्टी कधी समजत
नाहीत …..
 * तुम्ही ना अगदी “हे” आहात ?
 ( “हे”म्हणजे काय ? )
 * तुम्ही पहिल्या सारखे
आता नाही राहिलात !!
 ... ( मग काय दुसऱ्या सारखे झालो ?)
 * मला तुमच्या कडून
हि अपेक्षा नव्हती
 ( बये मग कसली अपेक्षा होती ?)
 * खर्र सांगा … मी कशी दिसते ?
 (खर सांगून का मार खायचाय ?)
 * मी खूप स्वार्थी आहे ना ?
( हो म्हटलं तर झालच …..आपल् …)

Tuesday, March 20, 2012

आई

आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस लिहिलेले पत्र:

प्रिय आईस,

पत्ता :- देवाच...े घर.

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर'असं घेतात लोक नाव माझं.

वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.

बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.

भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली की तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.

बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.

आणि सांग की हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच... तुझाच लाडका. 
-अनामिक 

Monday, March 19, 2012

लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?


लग्न लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
... लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!
-अनामिक

Thursday, March 15, 2012

माझी शाळा

....माझी शाळा.....
शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं....
Highway जवळ
ची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं....
... शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team
होती ....
Cricket च्या वेळी ground वर
... cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन
मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हातालाटेकू
देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र....
सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामचभिजत
जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात
उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ....
Black -board वर
बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव
लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा....
प्रयेत्येक Off -period ला P.T.
साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा....
तो बर्फाचा गोळा संपवायचा....
मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही....
कधी कोणी link नाही लावायचं...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक
वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...
इतिहासात वाटतं ....
होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च
प्रमेय ...
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य...
मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य....
हिंदीतली आठवते
ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा ...
शाळेतल्या gathering चा dance...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा...
तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms
आणि वह्या पुस्तकांचा set.....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ....
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात....
desk वर pen ने त्या "pen fights"
खेळणं ....
exams मधल्या ...
रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या
जुळवणं ...
चिखलातल्या त्या football
च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं ..