#विजयखाडिलकर
जुनंच, परत एकदा,
६ फेब्रुवारी २०१५ चे विचार ...
घडंण ..
असं होऊ नये खरं तर, मुलांचं शिक्षण आणि आपल्या इच्छेनुसार त्यानां विविध छंद जोपासायला लावतानां!
आपल्या लेकाला/लेकीला अभ्यासाशिवाय अनेक खेळात, गोष्टीत प्राविण्य मिळालंच पाहिजे. हे दिवस त्याने फक्त शिकलच पाहिजे, जराही वेळ फुकट घालवता नये.
आम्हाला ह्यातल काहीही करता आल नाही इच्छा असुनही
आज आम्हाला काही कमी नाही आणि आमची कितिही खर्च करायची तयारी आहे.
आम्ही त्याची प्रत्येक डिमांड लगेच पुरी करतो, आणि आमची अपेक्षा त्यानेच पुर्ण करायचीये एकुलता एकच तर आहे!
या आणि अशा इच्छांमधे त्या लहानग्याची खरंच घुसमट होते.
आपल्याच मुलगा-सुन किंवा लेक-जावयाला आई-वडिल काही सांगतील तर 'तुमचा काळ वेगळा होता, आणि आम्ही नाहिका तुमच्याच इच्छेनुसार वागलो तेव्हां' असा प्रश्नही गर्भित असतो मुलांच्या नजरेत!
आम्ही मात्र आमच्या मुलींना दरवर्षी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणं एवढीच सक्ती केली आणि उच्च शिक्षणही त्यांच्या आवडीनुसारच दिलं.
https://www.facebook.com/vijay.khadilkar.96
0 comments:
Post a Comment