Friday, March 20, 2020

fb post 2

#फोटोकॉपी काढताना सावध रहा #fbpost

Aniruddh Datar
· Pune
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय.
आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ. 
शेवटी एका जवळच्या गल्लीबोळात एक झेरॉक्स कम चहा कम सिमकार्ड कम फोन रिचार्ज कम फॉल पिको कम परकर पोलकं कम अंडीविक्याचं दुकान सापडलं. त्याला दोन फोटोकॉपीज मागीतल्या. ह्यानी कॉपीज काढल्या आणि मशिनच्या मागच्या पिशवीमधे दोन कागद खुपसले. नेमके खुपसता खुपसता मला माझ्या पॅनकार्डची कॉपी खुपसली जातीये असा भास झाला. त्यानी माझ्या हातात माझ्या प्रती टेकवल्या. मला शंका आली म्हणुन मी त्याला पिशवी उघडायला सांगितली. तो उघडायला काही तयार होईना. म्हणे खराब झालेल्या प्रतिंची पिशवी आहे. माझी सटकली. गचांडी धरल्यावर त्यानी पिशवी उघडली. त्यामधुन माझ्या पॅनकार्डच्या दोन सुस्पष्ट प्रती निघाल्या. त्याचबरोबर इतर अनोळखी लोकांच्या पॅनकार्ड्स, ड्राईव्हिंग लायसन्स, वीजबिल वगैरेच्या जवळजवळ २५-३० प्रति होत्या.
त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले. पोलिसात जायची धमकी दिली. गयावया करायला लागला म्हणुन आत्ता सोडुन दिलाय. आता परत तिकडे गेलो की मित्राला किंवा दुसर्या कोणालातरी प्रत काढायला पाठवणार. जर त्यानी परत तसाचं प्रकार केला तर तो गेला बाराच्या भावात.
लिहायचं तात्पर्य असं की ह्या अश्या दुकानामधे फोटो़कॉपीज काढताना सावधान. आपल्या कागदपत्रांचा वापर कुठल्या कामासाठी केला जाईल ह्याचा काय भरवसा? आपल्या नावाने सिमकार्ड्स उचलुन किंवा अजुन काही कारभार करुन आपण अडकले जाणार नाही कशावरुन? इथुन पुढे मी जास्तीच्या अनावश्यक प्रती काढणार नाही आणि रिसिव्ह्ड चा शिक्का मारुन घेतल्याशिवाय कुठेही देणार नाही. एवढचं नव्हे तर फोटोकॉपी मशिनवाल्यावर जास्तीचं लक्ष राहिल इथुन पुढं माझं.
ह्या सगळ्या प्रकारावरुन आधी घडलेल्या एका प्रकाराचीही आठवण झाली. एअरटेलला मी नंबर जवळ जवळ पाच वर्ष वापरल्यावर लक्षात आलं की माझी के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हरवलीत ते. ही डॉक्युमेंट्स जमा नं केल्यास ४८ तासात फोन बंद करु असा नोटिसवजा फोन त्यांनी केला. एअरटेल सेंटर मधे ह्या प्रकाराची चौकशी करायला गेल्यावर तिथे माझ्यासारखेचं ४-५ जणं आलेले दिसले. आम्ही सेंटर मॅनेजरला के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हवी आहेत हे लेखी मागितलं. ते द्यायला तो टाळाटाळ करायला लागला. मग गरमागरमी झाल्यावर त्यानी लेखी मागणी लिहुन ४-५ जणांना त्याच्या कॉपीज दिल्या त्यानंतरचं मी ते डॉक्युमेंट्स परत दिले. खरं खोटं माहित नाही पण एक अशी गोष्ट ऐकली होती की अमहाराष्ट्रीयन मंडळी ज्यांच्याकडे निवास पुरावा नसतो त्यांना ही कागदपत्र लागतात म्हणुन जाणुन बुजुन असे प्रकार केले जातात.
तेव्हा पुढच्या वेळी अशी महत्त्वाची कागदपत्र प्रत काढायसाठी द्याल तेव्हा नक्की डोळ्यात फोडणी घालुन लक्ष द्या. दिवस खराब आहेत. Nआपल्या कागदपत्रांचा बेजबाबदार वापर झाल्यास तुम्हालाचं जबाबदार धरलं जाउ शकतं.
प्रिव्हेंशन इज बेस्ट मेडिसिन.
Forwarded as received

Related Posts:

  • post 1 “Even the so-called nationalist Muslim leaders of the Congress like Maulana Azad say openly that they will not compromise on the interests of Muslims … Read More
  • post 2 कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे नवीन पुस्तक ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’ लेखक- श्रीनिवास हवालदार *********************************************… Read More
  • Post 1गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे-  कवी आरती प्रभू  [माझ्या 'मराठीतील काव्यरंग' या नवीनतम पुस्तकातून]प्रस्तुती - श्रीनिवास हवालदा… Read More
  • post 7हरण्याची पर्वा कधी केली नाहीजिंकण्याचा मोहही केला नाही,नशिबात असेल ते मिळेलचपण प्रयत्न करणे सोडणार नाही.*हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच ग… Read More
  • post 3शिवकल्याण राजा !! 🚩🚩जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व म… Read More

0 comments: