*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरुन वडापाव विक्री *"
तुम्ही प्रवासात आहात , बस-स्टँण्ड मध्ये गाडी थांबली , कळकट ,मळकट कपडयातला पोऱ्या , थंडगार वडा आणि पाव वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो !
गरज असली की खातात कि नाही लोक ?
पण तेच तुम्ही ट्राफीक सिग्नलवर वेल ड्रेस्ड मुलं , एक बॉक्स , त्यात गरम वडा , पाव , टिश्यू पेपर , छोटी पाणी बॉटल आणि किंमत 20 रू .
कोणतं पार्सल आवर्जून घ्याल ??
गौरव लोंढे
या , मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली भन्नाट आयडीया
Traffic WadaPav या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे ( पश्चिम) मध्ये राबवत आहे .
सबकुछ हायटेक ,, स्वतःचा ड्रेसकोड , वेबसाईट, फेसबूक पेज , आणि ग्राहकाला गरम गरम देण्याची जिद्द , हे सगळं कॉम्बीनेशन एवढं भन्नाट जमलंय कि , हे स्टार्ट-अप फार लवकर ग्रो करेल .
आज त्यांची सहाच जणांची टीम हे करतेय उदया ही नक्कीच वाढणार वादच नाही !
हा व्यवसाय छोटा असला तरी यांनी खूपच जास्त मॅनेजमेंट प्रिसिंपल्स इतक्या परफेक्ट पणे पाळलेत कि , यांना कोणीच रोखू शकत नाही .
ती प्रिंसीपल्स खालीलप्रमाणे .
(1) Just in Time/zero inventory :
आजकाल कोणतीच मोठी कंपनी खूप जास्त माल स्टॉक करत नाही , त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते कि पाहीजे ते मटेरियल "अगदी त्या वेळेत " त्या ठिकाणी पोहचेल .
एखादा स्टॉल टाकून बसू शकले असते पण वेळेवर ग्राहकाच्या हातात देणे ही Just in Time स्ट्रॅटजी आहे .
*************************************
(2)Excellent Customer service :
इथे यांनी टिश्यू पेपर , छोटी पाणी बॉटल सुद्धा देऊन एक लेवल पुढे जाऊन कशी सर्वीस दिली जाते? हे दाखवून दिलय !
**********************************
(3) Attractive Packaging :
बरेच नवीन व्यावसायिक अती उत्तम प्रॉडक्ट्स बनवतात पण खर्च वाचवण्यासाठी पॅकेजींग सो-सो करतात ,
आजकाल चा ग्राहक कोणतीही पदार्थ तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने खातो , आणि मग पुढचा निर्णय घेतो .
***********************************
(4): process delegation
बऱ्याच नवव्यावसायिकांची चुक होते कि, ते एकटेच सगळी ऑपरेशन्स संभाळत बसतात , पण कित्येक बिझनेस हे फक्त टिमवर्क नेच केले जातात , यासाठी written process and delegation याचा वापर करावा लागतो
* **********************************"*
(5) Ask for Referrals :
कोणताही व्यवसाय ॲड साठी प्रचंड खर्च करतो तेंव्हा कुठेतरी त्याला लोक ओळखायला लागतात , पण हे लक्षात घ्या आजच्या जमान्यात word of mouth सारखं प्रभावी माध्यम नाही त्यामुळेच यांनी पॅकेट वरच अपील केलीये कि , तुम्ही आमची स्टोरी फेसबूक आणि व्हाट्स अपवर शेअर करा !
Smart !!
ही भन्नाट आयडीया आहे !
हा पठ्या लवकरच खूप प्रसिद्ध होणार .
चला तर मग आपण पण त्याला थोडं प्रसिद्ध करूया ! शेवटी आपला मराठी पोरगा काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करतोय .
कधी ठाण्यात गेलात आणि यांच्या कर्मचाऱ्याची भेट ट्राफीक मधे झाली तर आवश्य खरेदी करा ! आणि प्रोत्साहन दया !
ही स्टोरी होती .
*"Traffic vada pav व गौरव लोंढेची*
Fb page @ https://www.facebook.com/Gaurav4555/
Teen Haath Naka flyover ,
Bhakti Mandir ,
Paach Pakdi ,
Thane West
Maharashtra .
या आपल्या
भावाला नक्की व्हायरल करा !
🙏🙏🙏🙏🙏
Fb post @महाराष्ट्र देशा
0 comments:
Post a Comment