Monday, September 19, 2016

संगीत कानसेन


संगीत कानसेन
------------------

संकल्पना आणि लेखन : सुनील सामंत 

----------------------------






भारतीय शास्त्रीय संगीताचा कानमंत्र

----------------------------

मोफत उपलब्ध #ईपुस्तक @
-----------------

भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण त्यातलं नक्की काय ऐकायचं ते कळत नाही. सूर किती व कोणते? श्रुती म्हणजे काय? कोमल, तीव्र , शुद्ध स्वर म्हणजे काय? ताना, पलटे, आलाप, गमक, मुरकी हे काय असतं? ताल म्हणजे काय? द्रुत आणि विलंबित म्हणजे काय? राग म्हणजे काय? ठुमरी आणि ख्याल म्हणजे काय? सम म्हणजे काय? दुगुन, तिगुन, तिहाई म्हणजे काय? बेसूर म्हणजे काय? एक ना अनेक. कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न.



संगीत कानसेन : भाग २ 
------------------------------

भारतीय शास्त्रीय संगीताची आभूषणे
ताना ,आलाप ,गमक

-----------------------------------

मोफत उपलब्ध #ईपुस्तक @
--------------------


संगीत कानसेन : भाग ३ 
------------------------------



भारतीय संगीताची आत्मा
~ राग
-----------------------------------

मोफत उपलब्ध #ईपुस्तक @
--------------------


संगीत कानसेन : भाग ४ 
------------------------------



भारतीय शास्त्रीय संगीताची लय , ताल आणि ठेका
-----------------------------------

मोफत उपलब्ध #ईपुस्तक @
--------------------



संगीत कानसेन : भाग ५ 
------------------------------



भारतीय शास्त्रीय संगीताचा कानमंत्र
ख्याल , धृपद , ठुमरी वगैरे

-----------------------------------

मोफत उपलब्ध #ईपुस्तक @
--------------------


----------------------------

ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com




Wednesday, September 14, 2016

Wednesday, August 24, 2016

माणूस

#वपु  #vapu

माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो त्याला म्हणून हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदने समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते . आयुष्यातील मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं.पण नाही.एकमेकांच एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, हे आणखीन कोणाला तरी समजावं असं त्याला वाटतं . असं का ? ...ह्याला उत्तर नाही ~ व पु

Wednesday, August 10, 2016

लग्नाचा दिवस



प्रत्यक्षात  हा  अनुभव माझा असून फारच  सुखद  आहे प्रत्येक  मुलीला हा  अनुभव  येतो .इतर मुलींप्रमाणेच माझ्या लग्नाचा दिवस
माझ्या ही आयुष्यात एक  सोनेरी पहाट बनूनच आला .
  माझं लग्न  झालं आणि माहेरची माणसं सोडताना मनाला खूप  यातना झाल्या .अश्रू   गालांवरून ओघळत होते ,बोलायला शब्द उमटत नव्हते .
   सासरी  निघाले  खरी ,पण  आई , जिने आपल्याला उन्हाची झळ लागू दिली नाही ,सतत तिच्या पदराच्या सावलीत  ठेवलं ,शिक्षण  ,योग्य तिथे पाऊल उचलायला शिकवलं ,तीच आई आपल्याला परकी होते हे  आठवून मन दु:खी झाले .
    माहेरचे खेळीमेळीचं  वातावरण सोडून  सासरच्या वातावरणात यायचं म्हणजे प्रत्येक मुलीला कठीणच असतं .पण प्रत्येकाला  माहेर
सोडावंच  लागतं. सर्व बाजूला सारून कशी तरी जड अंत : करणाने मी  बस मध्ये बसले .अश्रूंना पुनः वाट मोकळी करून  दिली होती .
  बसमध्ये बसली तरी  मी रडतच होते .मनामध्ये असंख्य विचार घोळत होते . नव्या घरातील माणसं कशी असतील , ते  मला समजून  घेतील का , पण  हे  मात्र चक्क झोपले होते .बस वेगाने धावत होती .आज पासून मी नवीन आयुष्याला सुरवात करणार होते .गाडीमध्ये
भरपूर हसण्या - खिदळण्याचा आवाज कानावर पडत होता .पण माझं मन माहेरच्या माणसांत गुंतलेलं होतं.आज मी क्षणात त्यांना
परकी  झाले होते .  
   मनात वाटत होतं कि ,मी एवढी रडतेय ,पण यांना मात्र काहीच वाटतं नाही . किती शांतपणे झोपलेत हे ,अजिबात समजूतदार    दिसत नाहीत .त्यांचं  हे  वागणं  पाहून  मला जास्तच  रडायला यायला लागलं .
     थोड्या वेळाने गाडीतली सर्व मंडळी झोपी  गेली. कलकलाट थांबला .
    मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं , ते चक्क उठून बसले होते.
    त्यांनी माझ्याकडे प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि  गुलाबी पत्र माझ्या हातात दिलं .मी अगदी भांबावून गेले. काय असेल या पत्रात ,काळीज धडधड करत होतं. मी  अलगदच पत्र उघडलं .बस मध्ये लाईट चालू असल्यामुळे  मी ते पत्र वाचू  लागले .


प्रिय भारती ,
   या  मधुर समयी मी तुला फक्त एवढंच सांगेन , तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो . माहेरची माणसं सोडली आणि तू सासरच्या
गलक्यात आलीस , पण  घाबरू नकोस . मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे .
       आईच्या पदराखाली तुला आणलंय ना , पण  मी तुला माझ्या सदैव  हृदयात ठेवीन .  आपण दोघं आता नवीन आयुष्याला सुरवात करणार आहोत . अपार प्रेम मी तुझ्यावर करीन , तुझ्या चुकांवर पांघरूण घालीन . हा संसार दोघांचा असतो , तो दोघांनी मिळून करायचा असतो .मला तुझी साथ हवीय , तू साथ देशील  ना !
  तुझाच  संजय


मी  पत्र वाचलं , माझे अश्रू  पुसले .त्याच्याकडे  एकटक पाहत राहिले . मला हवा तसाच जोडीदार मिळाला होता . एका  पत्राने आमचा संसार फुलला होता . त्यांनी नजरेनेच मला जवळ येण्याचा इशारा केला . मी अगदी लाजून चूर  झाले  आणि  नकळत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्त झाले .
 भारती  पोटे , बुधवार पेठ  पुणे


गृहशोभिका मे २००७        

 

Sunday, August 7, 2016

मैत्र दिन



मी कोण सांग ना
तुझंच मन तुला देणारा...
ती सर पुन्हा मागते का
तो हळवा थेंब ओघळणारा...



मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Saturday, July 16, 2016

ज्ञानेश्वर मुळे यांचा साहित्यिक परिचय


मराठी साहित्यिक परिचय


ख्यातनाम लेखक-कवी आणि भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले .
ज्ञानेश्वर मुळे यांचा साहित्यिक परिचय :
ज्ञानेश्वर मुळे यांची साहित्य आणि विदेश सेवेतील कारकीर्द कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटावी अशी आहे. वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल्लाट (ता. शिरोळ) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल्लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी (१९८४), दूर राहिला गाव (२०००), रस्ताच वेगळा धरला (२००५), स्वतःतील अवकाश (२००६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ओरिया साहित्यिक रमाकांत रथ यांच्या 'श्री राधा' या खंडकाव्याचा त्यांनी अनुद केला आहे. 'माती, पंख आणि आकाश'(१९९८) हे त्यांचे आत्मचरित्र मराठी तरुणांसाठीचे प्रेरणादायी पुस्तक म्हणून लोकप्रिय आहे. माणूस आणि मुक्काम, रशिया - नव्या दिशांचे आमंत्रण (२००६) , ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग (२००९) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले असून ऋतु उग रही है (१९९९), अंदर एक आसमान(२००२), मन के खलिहानो में (२००५), सुबह है की होती नही (२००८) हे हिंदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे.
~ म .टा.
==============

अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे
fb page@ https://www.facebook.com/Ambassador-Dnyaneshwar-M-Mulay-553116941406057/

Friday, July 1, 2016

पालकांची शाळा


********************
पालकांची शाळा

मुलं लहान होती तेव्हा त्यांना घेऊन फिरायला निघाले की येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा माझ्यावर हमखास खिळत. मुलं तिळी आहेत हे कळल्यावर तर अर्धे लोक माझ्याकडे अनुकंपेने तर अर्धे 'काय ग्रेट बाई आहे ही' अश्या नजरेने बघत. 'तीन-तीन मुलांना कसं हो मेनेज करता एकटीने' हा प्रश्न मला हमखास विचारला जायचा, आणि ह्या प्रश्नाला माझं एकच उत्तर असायचं कायम, 'खरंतर हा प्रश्न तुम्ही माझ्या मुलांना विचारला पाहिजे, की ते तिघं कसं मेनेज करतात एकट्या आईला?'

असं मानलं जातं की आई ही मुलांची पहिली गुरु असते. काही अंशी ते खरंही आहे,  आयुष्यातले सगळे पहिले धडे आईच्या मांडीवरच तर आपण गिरवतो. पण मूल आईकडून शिकतं तेव्हढंच ते आईला शिकवतंही. मुलंही आईची गुरु असतात हेही तितकंच खरंय. रोजच्या आयुष्यातला प्रत्येक क्षणनक्षण समरसून जगताना, पडलेल्या लाख प्रश्नांची उत्तरं शोधताना, आपल्या कुतूहलाच्या तेजस्वी, लखलखीत भिंगातून आसपासच्या प्रत्येक गोष्टीकडे बघताना एखादं मूल त्याच्या आईला किती मौल्यवान धडे देत असतं! फक्त आपली शिकायची तयारी मात्र हवी! मी ह्या बाबतीत खरंच भाग्यवान आहे कारण एकाहून एक सरस असे तीन इवले गुरु माझ्या घरात आहेत! माझी मुलं आता नऊ वर्षांची आहेत. मी मुलांना काय शिकवलं हे महत्वाचं नाहीये पण ह्या नऊ वर्षात एक पालक म्हणून मी मुलांकडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझ्या तिळ्या मुलांच्या चष्म्यातून जगाकडे बघता बघता आई म्हणून माझ्याही नकळत मी घडत गेले. प्रगल्भ होत गेले. त्या प्रवासातले हे काही महत्वाचे धडे.

गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात

मुलं चार-साडेचार वर्षांची असताना एक दिवस अर्जुनने अनन्याच्या आवडत्या पुस्तकावर रंगीत खडूने आडव्या-तिडव्या रेघा मारून ते पुस्तक पार खराब करून टाकलं. अनन्याचा चेहेरा कोमेजून एवढासा झाला. तिला मनापासून वाईट वाटलं होतं. 'अर्जुन वाईट मुलगा आहे', स्फुंदत स्फुंदत ती म्हणाली. मी तिला जवळ घेऊन समजावलं की अर्जुनने मुद्दामहून तिला त्रास द्यायला म्हणून तिचं पुस्तक खराब नव्हतं केलं. 'आपण अजून एक पुस्तक आणू अस्संच. पुस्तक एक निर्जीव गोष्ट आहे राणी, आणि गोष्टींपेक्षा माणसं महत्वाची असतात'. अनन्याला कुशीत घेऊन मी समजावत होते, अर्जुन हिरमुसलं तोंड करून जवळच उभा होता. मी दोघानांही कुशीत घेऊन दुसरं कुठलंतरी पुस्तक वाचायला लागले. थोड्या वेळाने मुलं हा प्रसंग विसरून गेली आणि नव्या पुस्तकात रंगून गेली. एक समरप्रसंग चांगल्या रीतीने निभावून नेल्याबद्दल मी माझंच कौतुक केलं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मी काहीतरी लिहीत बसले होते, तेवढ्यात माझ्या खोलीतून 'खळ्ळ' असा मोठा आवाज झाला. मी धावत खोलीत गेले, माझ्या ड्रेसिंग टेबलवर असलेली नवी, कोरी-करकरीत महागडी सेंटची बाटली फुटली होती, सगळीकडे काचांचा खच, सेंटचा वास पसरलेला आणि त्या सगळ्या पसाऱ्यात भेदरलेलं तोंड करून उभा असलेला आदित! मी आधी त्याला लागलं नाही याची खात्री करून घेतली आणि नंतर मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मी अजून ते सेंट उघडलं देखील नव्हतं. 'आदित', मी कडाडले, पण पुढे काही बोलू जाणार तेव्हढ्यात कोवळ्या हातानी कुणीतरी मागून माझा कुर्ता खेचला. मी वळून पाहिलं तर अनन्या होती. 'मम्मा, आदीवर रागावू नकोस, त्याने मुद्दामहून नाही फोडली बाटली. आपण दुसरी आणू. तूच म्हणतेस ना, गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात'? माझी गुढघ्याएवढी लेक मला समजावत होती. मी मुकाट पुढे होऊन घाबरलेल्या आदितला आधी जवळ घेतलं. अनन्याने मला फार महत्वाचा धडा दिला होता की आई म्हणून मी काय बोलते त्यापेक्षाही मी काय करते हे जास्त महत्वाचं होतं. अजूनही घरी काही फुटलं, तुटलं तर मी स्वतःलाच बजावते, की गोष्टी महत्वाच्या नसतात, तर माणसं महत्वाची असतात.

तुमची दानत तुम्ही किती देताय ह्यावरून ठरत नाही तर तुम्ही काय देताय ह्यावरून ठरते.

आम्ही दुबईला होतो तेव्हाची गोष्ट, अनन्याला तिथल्या एका खेळाच्या दुकानातलं लाकडी फार्म खूप आवडलं होतं, पण त्याची किंमत फार जास्त होती. जवळ जवळ अडीचशे दिरहम. अनन्याला पैशांची किंमत कळावी म्हणून मी तिला सांगितलं की ते फार्म मी तिला पुढच्या दिवाळीला घेऊन देईन, पण त्यासाठी काही पैसे तिलाही तिच्या पिगी बँक मधून द्यावे लागतील. अनन्यालाही ते पटलं आणि तिने घरातली बरीचशी छोटी-छोटी कामं स्वतःच्या अंगावर घेतली. तिला मी महिन्याला एखादं पुस्तक विकत घ्यायला पैसे द्यायची, ते पैसे देखील ती नेमाने पिगी बँक मध्ये टाकायला लागली. चारेक महिन्यांनी तिच्या पिगी बँक मध्ये जवळ-जवळ पन्नासेक दिरहम जमा झाले होते. दिवाळीला आता महिनाभर उरला होता. अनन्या अधून मधून माझ्या मागे लागून त्या खेळण्यांच्या दुकानात जायची, त्या फार्म मधल्या छोट्या गाई-बैलांना कुरवाळून सांगायची, 'आता लवकरच मी तुम्हाला घरी नेणार आहे हां'. दुबईला आमच्याकडे मुख्तार नावाचा ड्रायव्हर काम करायचा. अत्यंत चांगल्या स्वभावाचा माणूस. हसतमुख, सुस्वभावी मुख्तारदादा मुलांना तर खूपच आवडायचा. एका शुक्रवारी सकाळी मुख्तार अचानक घरी आला. त्याची सुट्टी होती त्या दिवशी, तरीही.  त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. 'काल घरून फोन आला, गावात दोन-तीन दिवसांपासून खूप पाऊस पडतोय. सर आमचं मातीचं घर अचानक कोसळलं. घरवाले ठीक आहेत, शेजारी आहेत सध्या पण डोक्यावर छप्पर नाही. थोडी मदत पाहिजे होती पैशांची', मुख्तार म्हणाला. त्याने आम्हाला फोटो दाखवले. मुलं तिथेच होती. सगळं ऐकत होती. त्यांनाही ते फोटो बघून खूप वाईट वाटलं. आम्ही मुख्तारला जितक्या रकमेची गरज होती ती रक्कम दिली, काही उसनी, काही आमच्यातर्फे मदत म्हणून. आमचे वारंवार आभार मानत मुख्तार जायला निघाला, तेवढ्यात अनन्या त्याला म्हणाली, 'मुख्तारदादा, जरा थांब.' पळत वर जाऊन ती आपली पिगी बँक घेऊन आली आणि ते सगळे पैसे तिने मुख्तारच्या हातात ठेवले. 'माझी मदत म्हणून तुझ्या घराला', अनन्या मुख्तारला म्हणाली. एव्हढा कणखर पठाण मुख्तार, पण त्या दिवशी ढसढसा रडला, म्हणाला, 'हे पैसे मी कधीच खर्च करणार नाही'. माझ्याही डोळ्यात पाणी होतंमी आणि नवरा अवाक होऊन बघतच राहिलो. गरजवंताला मदत आम्हीही करत होतोच यथाशक्ती, पण तीन-चार महिने साठवलेले सगळेच्या सगळे पैसे दुसऱ्या कुणाच्या हातावर असेच ठेवण्याइतकी आमची दानत खचितच मोठी नव्हती.

चल, फिरायला जाऊया ना

तो दिवसच तसा होता. घरी वीज नव्हती, कामवाली बाई आली नव्हती, माझी आई जवळ नव्हती, नवरा बाहेरगावी होता आणि मुलं जेमतेम चारची होती. सगळ्या घरात पसारा होता, मोरीत खरकटी भांडी आणि पूर्ण दिवस माझ्यापुढे आ वासून उभा होता. मला रडायलाच यायला लागलं. कामाला कुठून सुरवात करावी तेच समजेना. मुलं  घरभर पळत होती आणि मी हताश होऊन त्यांच्याकडे बघत होते, एकदम अर्जुन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 'चल ना, फिरायला जाऊया', आणि एकदम माझे सगळे प्रश्न सुटले. घरचा सगळा पसारा तसाच ठेवून मी मुलांना गाडीत घातलं आणि सरळ पुणे विद्यापीठात घेऊन गेले. तिथे दिवसभर आम्ही खूप हुंदडलो, दुपारी तिथल्याच उपहारगृहात जेवलो, खेळलो आणि संध्याकाळी घरी परतलो. मुलं एव्हाना पार थकून गेली होती. मुलं झोपली आणि शांत चित्ताने मी घर आवरायला घेतलं. सकाळी जे काम मी चिडून, करवादून, कंटाळून केलं असतं, कदाचित मुलांवर ओरडलेही असते, तेच काम मी आता संगीत लावून आनंदाने करत होते, कारण माझा पूर्ण दिवस मुलांबरोबर आनंदात भटकण्यात गेला होता आणि तेव्हढी उर्जा मला पुरेशी होती.   

मुलांबरोबर अशी निरूद्देश भटकंती हा माझ्या पोतडीतला सगळ्यात मोठा पालकत्वाचा महामंत्र! बालमानसशास्त्र असं सांगतं की जे पालक त्यांच्या मुलांबरोबर आवर्जून वेळ घालवतात त्यांची मुलं त्यांच्या अडनिड्या वयात सहसा वाईट सवयींच्या आहारी जात नाहीत. पण मुळात आपल्या मुलांबरोबर भरभरून वेळ घालवणं, त्यांची कोवळी स्वप्नं त्यांच्या डोळ्यात उमलून येताना बघणं, स्वतः मूल होऊन मुलांच्या खेळत रममाण होणं हा किती आल्हाददायक अनुभव असतो! मुळात, पालक म्हणून आपल्या हातात जेमतेम पहिली दहा-बारा वर्षेच काय ती असतात, त्याच्यानंतर आपण वेळ काढू म्हटलं तरी मुलांना आपल्यासाठी वेळ नसतो, इतकी तीआपल्या शाळा, अभ्यास, खेळ, छंदवर्ग, मित्र मंडळी इत्यादी व्यापात गर्क असतात. हाती आहे तो क्षण बोटांच्या फटीतून निसटून जायच्या आत त्याची सोन्याची आठवण घडवायची एवढंच आपल्या हातात असतं. मुलं फार भरभर मोठी होतात, कधीतरी पंख पसरून उडून जातात आणि आपण मात्र उघड्या बाटलीतल्या अत्तरासारखं सुगंधी आठवणी मागं ठेवून भर्रकन उडून गेलेलं त्यांचं बालपण हुंगत राहतो! घरकाम नंतरही होऊ शकतं, ऑफिसचं काम एक दिवस उशिरा झालं म्हणून जग चालायचं थांबत नाही, पण मुलं मात्र दिवसागणिक मोठी होत राहतात. शक्य असेल तर मुलांबरोबर फिरायला जावंच.

भावना कुणाच्या जपायच्या

अवी, माझा मित्र एकदा घरी आला होता. मी मुलांची ओळख करून दिली.  अवीकडे एकटक रोखून बघत अनन्याने खडा सवाल केला, ' अवीकाका ता? अवीआजोबा का  नाही'? मला क्षणभर काय बोलावं ते सुचेचना! वयाने माझ्याइतकाच, पण सुटलेलं पोट आणि अकाली पांढरे झालेले केस ह्यामुळे अवी दिसायला बराच पोक्त दिसायचा, पण ह्या बयेने त्याचा पार आजोबाच करून टाकला होता! अवी गेल्यावर मी तिन्ही मुलांना पुढ्यात बसवून त्यांचं बौद्धिक घ्यायला सुरवात केली. 'असं धाडकन कुणाला विचारू नये बाळा', मी म्हटलं. 'का पण'? आदिने विचारलं,  'कारण वाईट वाटतं लोकांना.' मी समजावणीच्या सुरात म्हटलं. 'पण मम्मा, तूच तर सांगतेस, प्रश्न विचारणं चांगलं असतं. यु शुड ऑलवेस आस्क क्वेस्चन्स, अर्जुन म्हणाला. 'कारण, काही प्रश्न अवघड असतात राजा, लोकांना वाईट वाटतं'  तो विषय तिथेच संपला.

त्या प्रसंगानंतर दोन-तीन महिन्यांनी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. आसपासच्या गावातली बायका-पोरं चहा, मातीच्या गडव्यात लावलेलं घट्ट दही, भाजलेल्या शेंगदाण्याच्या पुड्या, मक्याची कणसं असं काहीबाही विकत होती. एक बाई आमचा पिच्छा काही सोडेना! ' अवं ताई, घेवा की चणे -फुटाणे, गरम हैती बघा' तिची अव्याहत भुणभुण सुरु होती. सौम्य शब्दात तिला कितीदा तरी सांगून बघितलं, पण ती काही ऐकेना. शेवटी माझा पारा चढला, 'नको मला तुमचे चणे-फुटाणे, जा बघू तुम्ही इथून' मी तिच्यावर खेकसले. तेवढयात मुलांनी माझी बाही खेचली. 'मम्मा, का ओरडतेस त्या आजीवर? घे ना थोडे चणे-फुटाणे? तिला वाईट वाटलं असेल ना. किती वर चढून आली ती आजी, पाय दुखले असतील ना तिचे?', आदित म्हणाला.  मी मुकाट चार पावलं खाली उतरून त्या आजीची माफी मागितली आणि त्यांच्याकडून चणे-फुटाणे विकत घेतले. 

राग कसा आवरायचा

काही माणसं जन्मजात आनंदाची कवच कुंडलं अंगावर लेऊनच ह्या जगात येतात. माझा मुलगा, आदित अश्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी घडली नाही तरी तो सहसा फार चिडचिड करत नाही किंवा खूप वेळ फुगून बसत नाही. त्याचा राग जास्तीत  जास्त दोन मिनिटं टिकतो, नंतर परत त्याच्   या गोबऱ्या गालावरची खळी डोकवायला लागते. मी त्याला विचारलंही होतं एकदा, की तू सदैव इतका आनंदी कसा असतोस? 'सोप्पं आहे मम्मा, मला खूप राग आला न की मी मनातल्या मनात मला आवडलेलं एखादं पुस्तक आठवतो आणि ते वाचायला लागतो, माझा राग पळून.   जातो लगेच', तो शांतपणे म्हणाला. मला स्वतःला राग आवरणं फार कठीण जातं पण आदितकडे पाहिलं की मला स्वतःचीच लाज वाटायला लागते आणि मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करते.

आजकाल सुजाण पालकत्व हे खरोखरच एक आव्हान होऊन बसलंय. मुळात मूल होण्याअगोदर आपण पालकत्वावर फार विचार करत नाही आणि मुलं झाली की ह्या विषयावर विचार करायला वेळ मिळत नाही, बरं मुलांच्या वाढीच्या एका टप्प्यात बरेच धक्के खाऊन आपण स्थिर होतो न होतो, मुलांच्या वाढीचा दुसरा टप्पा सुरु होतो. त्यांच्या पालकांकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतात आणि त्या नवीन साच्यात स्वतःला घडवण्याची पालकांची नव्याने धडपड सुरु होते. आजकाल 'मुलांना चांगल्या रीतीने कसं शिकवावं' ह्या विषयावर ढीगभर कार्यशाळा असतात, पुस्तकं असतात पण मुलं चांगली घडवायची असतील तर पालकांना स्वतःला आधी एक चांगला पालक म्हणून घडवावं लागेल. मी पालक म्हणून, एक आई म्हणून घडतेच आहे, कारण मुलं मोठी झाली तरी पालक मात्र लहानच राहतात! 

- शेफाली वैद्य

Wednesday, June 15, 2016

वपु

व. पु. -- रंगपंचमी …
तुमचा जन्म नवा असतो आणि जन्माबरोबरच तुम्ही घेऊन येता ते मन नवं.
त्या मनाने काय पहायचं, काय टिपायचं, किती हरळून जायचं, किती जाळून घ्यायचं, किती कशाला समोर जायचं आणि किती वेळा पाळायच, हे सगळ सगळ एकदाच, कायमसाठी ठरवलेलं असतं आणि एकदा हे सगळं आयुष्याचं ठरलं कि मग उरते ती नीव्वळ अंमलबजावणी.

Friday, May 20, 2016

मराठी बोल

दोन मराठी माणसं एकत्र आली की मराठी  सोडून इतर भाषा बोलायला सुरवात करतात.... भले तोड़की मोड़की हिंदी असो वा English ... मराठी बोलायचा आग्रह नसतो मुळी ...  दोघातल्या एकाचा देखील..

इतर राज्यात कशाला महाराष्ट्रात राहणारी पर राज्यातील लोकं एकमेकांना भेटली की स्वत : च्या भाषेत  बोलायला सुरवात करतात .. इथे राहून ही मुलांना न चुकता मातृभाषा शिकण्या साठी class देखील लावतात..  ~  विद्या

#मराठी_बोल

दादा कारखानीस : एक आगळे व्यक्तिमत्व

ह्युस्टन, टेक्सास येथील दादा कारखानीस ह्यांचे नांव मुंबई-पुणे व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, आणि ऑस्ट्रेलिया येथील जुन्या सी. के. पी. समाजात लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा सर्व थरातील, वयाच्या आणि व्यवसायाच्या व्यक्तींत आपुलकीने मिश्किलपणे वागून मिसळण्याचा आणि मदतीचा हात सदैव पुढे करण्याचा स्वभाव.

ह्युस्टन, टेक्सास येथील दादा कारखानीस ह्यांचे नांव मुंबई-पुणे व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, आणि ऑस्ट्रेलिया येथील जुन्यासी.के.पी.समाजात माहित नसलेली व्यक्तीविरळाच. तसेच न्यूयॉर्क, आणि ह्युस्टन येथील इतर मंडळीतही ते दादा, भाई, भाईकाकाया नांवाने परिचित आहेत.याचे कारण म्हणजे त्यांचा सर्वथरातील, वयाच्या आणि व्यवसायाच्या व्यक्तींत आपुलकीने मिश्किलपणे वागून मिसळण्याचा आणि मदतीचा हात सदैव पुढे करण्याचा स्वभाव. नुकत्याच शिकागो येथे पार पडलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनांत त्यांना "जीवन गौरवपुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. वास्तविकत: त्यांनी केलेल्या मराठी भाषेची, आणि समाजाची सेवा लक्षात घेऊन त्यांना साहित्य आणि समाजकार्य ह्या दोन्ही वर्गात मिळून बृहन महाराष्ट्र मंडळाने त्यांना केव्हांच सन्मानित करावयास पाहिजे होते. त्याकरता दादांचे समवयस्क आणि जुने स्नेही रमेश तथा दादा प्रधान ह्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ १२५ सह्यांचे निवेदन ह्यावर्षीच्या अधिवेशनाच्या कार्यकारिणीला पाठवून दिले. ह्या निवेदनाला दादांच्या सर्व परिचित व्यक्तींनी भरघोसपाठींबा दिला.त्यांत मुंबई-पुण्याचे वंदना गुप्ते, प्रशांत दामले, जयंत सावरकर, विजय केंकरे इत्यादी नामवंतकलावंतांचासमावेश होता. ह्या निवेदनावर चर्चा होऊन त्यांना "जीवन गौरव पुरस्कार" देण्यात आला. बृ. म. मं. च्या इतिहासातील हापहिला उपक्रम.

गेल्या शनिवारीच त्यांना "ह्युस्टन मराठी मंडळाने" त्यांच्यासमाजकार्याबद्दलआणिमराठीभाषेच्या
सेवेबद्दलतेथीलबऱ्याचवर्षांपासूनस्थायिकअसलेल्याव ह्युस्टन मराठीमंडळातप्रारंभापासून
कार्यरत असलेल्या जेष्ठनागरिकडॉ.सिंधुताईहर्डीकरयांच्याअध्यक्षतेखालीगौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हासमारंभ घडवून आणण्यात ह्युस्टन मराठी मंडळात कार्यरत असलेले व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीर करंदीकर आणि दादांचे जुने सहकारी प्रमोद मेहता यांचा मोलाचा भाग होता.
आपल्या आभार भाषणात ते म्हणाले....
"माणूस जन्मभर ऋणी असतो, कुणाचा न कुणाचा तरी! प्रथम जन्मदात्यांचा, मग असतो गुरुजनांचा आणि शिषण संस्थेचा, नोकरीत शिरल्यावर वरिष्ठांचा. मग ऋणफेडायचंअसतंते समाजाचं आणि शेवटी जन्मभर ज्या मातीत राहिले त्या मातीचं. हे ऋणफेडतांना जे सुख मिळते, त्याची तुलना कशाशीही करता येणे शक्य नाही.

http://m.maharashtratimes.com/international/global-maharashtra/-/articleshow/10075208.cms

Thursday, May 19, 2016

तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो..

तुझी आठवण ..........


कधी न येई ओठी माझ्या नाव तुझे ............ पण,
डोळ्यांमधील हजारो हाका तुझ्याच साठी
वादळातही खचे ना ज्याचा धीर कधीही ....... पण,
बुडते माझे जहाज तुझ्याच साठी

कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
दिसूनही मी दिसलो नाही ,
जवळ तुझ्या मी होतो इतका,
बघुन घे तू नजर फसावी,

असा तुझ्या आसपास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो........
कुठेतरी मग भरकटलेला....
धीर समजलो ज्या हाकेला,
केवळ तो आवाज निघाला,
सदैव स्वप्ने बघणारयाचा,
असा कसाच का भ्रमनिरास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला....
रात्र काल एकटीच होती चांद तिला भेटलाच नाही,
हायाय या साध्या विरहाचा त्रास किती पण दवास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला...


Saturday, May 14, 2016

क्या बात है

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार
मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली तर
"क्या बात है" ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर
"क्या बातहै"..!!!

काही लोक स्वार्था साठी शोधतात
मला पण
निस्वार्थीपणे कोणी शोधत आलं तर
"क्या बात है"...!!!

मन मारून काळीज कोणीही घेऊन जाईल
माझे पण
मन जिंकून काळीज नेणारा कोणी भेटला तर
"क्या बात है" ...!!!

सोबत असेपर्यंत तर सगळ्यांना मी हसवत
ठेवीन पण
मी गेल्यानंतरही ते हसत राहिले तर
"क्या बात है" ...!!!
#अनामिक

Friday, May 13, 2016

नामस्मरण

तरुण वयात नामस्मरण करावे.
नक्की वाचा -
तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मूले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सलसलते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी व आपल्या  देवाची शक्ति प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते.म्हातार पनि नामस्मरण होत नाही कारण त्यानी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करन्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोहचते. पन दैविशक्ति त्यांना मिलत नाही. तर ही शक्ति तरुण वयातच मनुष्याला मिळते. नामस्मरण हे तरुंनांना जीवनात प्रगति करण्यासाठी एक अमृत असते.त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ति मिलते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते.त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधि फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृतु येईल हे सांगता येत नाही. पण नामस्मरनाने खुप काही समस्या जीवनात सुटु शकतात. हल्लीच्या मुलांना नेट टीवी मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धि स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्या मुले वाइट विचार मनात येतात. बारीक सारिक गोष्टींवरून चिड़तात. लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसर्यांचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ट आहे संस्कार कमी आहेत अशी ह्यांची विचारसरनि असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वताच्या आत्महयाला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसर्यांच्या पुढे जाने खुप पैसा कमविने हेच ह्यांचे ध्येय असते.पण मन ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे विचलित होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जान्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. नामस्मरनाने एक वेगळीच दैवीशक्ति प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाइट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते. कारण मनात नामाची माल जपली जाते.तरूण मुले वाइट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसेनामस्मरण वाढते तस तसे दैविक शक्ति वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाइट प्रसंग आला कि देव त्यांचे रक्षण करते. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे सरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर makeup ची गरज भासत नाही.तर आपोआप तेज येते. तरुण मुले आनखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होते.चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.देवालाही सूंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो या गोरा पण त्याचे सूंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपन आता कोणी पाहिले आहे. मृतु कधि येईल सांगू शकत नाही आज मी लेख लिहिते उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदातरि नामस्मरण करा कारण जीवनातला खरे  अमृत तेच आहे.
~ संग्रहित लेख