Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Thursday, March 22, 2018
Friday, January 12, 2018
Wednesday, March 1, 2017
कविता
अतिशय सुंदर कविता :
भाग्यवान होती आमची पिढी जिने मोबाइल शिवाय मैत्री अनुभवली.
काॅलेजला जाताना एखाद दिवस रिकामा असायचा.
रोजच्या न विसरणारया गोष्टीमध्ये मोबाइल नसायचा.
९ ते ५ काॅलेजनंतर ते विश्व संपायचे.
काॅल्स आणी मेसेजेस न करताही दुसरया दिवशी अचूक भेटायचो.
कुणी नाही आलं तर १ रुपया घेऊन पिवळा डब्बा गाठायचो.
अड्डा बदलला तर तशी बाकीच्यांच्या गाडीवर चिट्ठी सोडायचो.
दिवसभर प्रत्येकाची तेव्हा तोंडाची टकळी चालू असायची.
कुणी गेम्स किंवा whatsapp अशी विस्कळीत स्थिति नसायची.
गप्पांमधले पॅाजेस तेव्हा गाण्यांनी भरुन निघायचे.
मन, कान आणी डोळे दर ५ मिनीटांनी फोन नाही शोधायचे.
भेटल्यावर तेव्हा खर्या अर्थाने एकमेकांची सुखदुःखे कळायची.
आता दिवसभर whatsapp करुनही दुःखे स्वतःकडेच ठेवायची.
मोठमोठ्याने टाळया देऊन हसणे आता smilyवरच भागते.
Technology व satellite असुनही wavelength जुळणे क्वचितच होते.
खरेच भाग्यवान होती आमची पिढी जिने
मोबाइल शिवाय मैत्री अनुभवली.
आताचे विशेष दुःख हेच की ही कविता मित्र मैत्रिणीला whatsapp वरच ऐकवली!!
Saturday, March 10, 2012
Monday, March 5, 2012
Saturday, March 3, 2012
माझे प्रेम असंच आहे
माझे प्रेम असंच आहे
सागरासाठी धावणाऱ्या सरीतेसम
एका थेंबासाठी आसक्त चातकासम
दुधावरल्या घट्ट मुलायम सायेसम...
माझे प्रेम असंच आहे
किनाऱ्यास भेटण्या आतुर लाटेसम
धरतीस आलिंगन देणाऱ्या धारेसम
श्रावणात नाचऱ्या मोर पिसाऱ्यासम...
माझे प्रेम असंच आहे
अक्षरांना शोभा देणाऱ्या ओळीसम
गीतास मधुर करणाऱ्या सुरांसम
पावसातल्या भिजरया आठवणीसम ..
देव पेडणेकर (०१/०३/२०१२-१3.५०)
Friday, March 2, 2012
आनंदाचे गीत स्फ़ुरावे सरणावरती जाता जाता
खंत नसावी, ताण नसावा, श्वासांवरती, जाता जाता
आनंदाचे गीत स्फ़ुरावे सरणावरती जाता जाता
धगधगणारी आग शमावी दाह नुरावा शीतलतेने
त्या राखेतुन बाग फ़ुलावी, दरवळ भवती, जाता जाता
जे असते ते भोगुन घ्यावे, सोडुन द्यावे, विसरुन जावे
अर्पण सारे येथे ईथले, ओंजळ झरती, जाता जाता
प्राणपणाने प्राणार्पण हो, जीवनधारा ही सरताना
... व्याकुळ व्हावे अंबर सारे, व्याकुळ धरती, जाता जाता
"त्या" वाटेच्या ह्या वळणावर आज नव्याची नीव धरावी
ब्रम्हांडातुन शून्य उरावे? सागर भरती, जाता जाता
सुरुचि नाईक
८/०२/१२
Monday, February 27, 2012
कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …
कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम….
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …
कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...
कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….
कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….
कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….
कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …
कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….
कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजेप्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"
खरच..!! प्रेम नेमक काय असतं..!!!
प्रेम नेमकी काय असत..???..
कवी : चैतन्य मोहिले
Sunday, February 26, 2012
Thursday, February 23, 2012
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
दूर जरी तू तिथे हितगुज मी साधतो
अंतरीची ओळख सखी पाउल इथे रेंगाळते
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तू तिथे तृप्तीचे श्वास घ्यावेत
... ... अन त्या श्वासांनीही इथे मी तृप्त व्हावे
आयुष्याची वाटचाल एकटयानेच चालायची असते
हा विचार करायलाही मला सोबत तुझी हवी असते
आपले कुणीतरी असावे थोडेसे गालात हसणारे
रडल्यावरही रागावणारे आणि नकळत डोळे पुसणारे
तुझे आश्वासक डोळे खूप दिलासा देऊन जातात
तुझ्या पाउलवाटेवरहि मी तुझा सोबती आहे
हे खरे खरे सांगून जातात...
-अनामिक
Saturday, February 18, 2012
मामा तुझं गाव
मामा तुझं गाव..
लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं
दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय
इथे शेजारीच राहतो माझा मामा
आणि अलीकडे पलीकडे अश्या दोन मावश्या
एवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि
तेवढीच दूर त्याची गोडी गेली
लहानपणी आठवतंय,
मामाचं गाव सोडून जाताना
त्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला
उर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला
त्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची
कडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा
आणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा
खरं सांगू मामा,
खूप खूप आठवण यायची तुझी
जेव्हा मैलोनमैल लांब होतास
आणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही
आठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही
दुराव्यातला गोडवा तो हाच का
उगाच आलास इतक्या जवळ तू मग
लांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या
पण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या
अगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या...!!!!
-अनामिक












