Monday, April 13, 2026

आठवण

बेवारस, बापाचं नाव माहीत नाही अशा लक्ष्यासाठी लहानपणी आई मधु कांबीकर अंगाई म्हणते. ती चित्रपटाच्या शेवटी दुःखाच्या क्षणी पुन्हा दोन कडव्यांनी मी बांधली. एकूण तेरा दिवस बॉम्बे स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्डिंग केलं. आशाताईंचं दररोज येणं. दहा ते पाच. माझी सगळ्यात अधिक गाणी आशाताईंनी आणि रवींद्र साठेंनी गायलेली आहेत.

तिकडे दूर काचेच्या स्टुडिओत आशाताई गाताहेत. आम्ही सांगता येत नाही इतके आनंदी. रेकॉर्डिंगच्या घरात शेवटच्या दोन ओळी थांबल्या. आता रिटेक नाही, असे म्हणतानाच हे काय ? आम्ही ताईंकडे गेलो. डोळ्यांत अश्रू. म्हणाल्या, 'कवी इतकं इतकं छान दुःखाचं गाणं लिहायचं नसतं.'
**************************
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी

आयुष्याला नको काजळी काळी
ईश्वरा तूच सांभाळी

झुलता झोका जावो आकाशाला
धरतीच्या टिळा भाळाला.

**************************

Fb page : ना.धों.महानोर 

0 comments: