Thursday, May 7, 2026

भावमेघ पुस्तक प्रकाशन

नमस्कार, 10 जानेवारी 2026 रोजी माझ्या भावमेघ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. माझ्यासाठी हा सोहळा एखाद्या अपत्यजन्मा सारखा खूप महत्वाचा होता..नवीन ओळख मिळवून देणारा आहे. खरंतर पोस्ट ला थोडा दोन तीन दिवस उशीरच झाला आहे, पण ही phase माझ्यासाठी खूपच नवीन आहे..नव्याने स्वतःशी ओळख झाल्यासारखे वाटते आहे..माझा आनंद, माझे भारलेपण तुमच्या समोर मांडायचे आहे म्हणून ही पोस्ट..

सारस्वतांच्या सोबतीने
सोहळा कवितांचा रंगला
रंगवूनी रसिक मनांना
अंतर्नाद जणू निनादला
कापरापरी उडून वेळ
कसा अचानक संपला
पण स्मृतींच्या रूपाने
मनावर कायम ठसला

असेच काहीसे  वाटते आहे...
देव कधीकधी अशा क्षणांचे दान पदरात देतो, वाटतं खरंच आपण पात्र आहोत का ह्या सगळ्याला... शनिवार पासून सगळीकडून कौतुकाची, प्रेमळ शब्दांची पखरण माझ्यावर होत आहे...मन इतक भरून आलं आहे.
त्याच भरल्या मनाने आईला फोन केला, तिला विचारलं, " मला खूप दडपण आलं आहे... कारण माहित नाही , ह्या सगळ्यासाठी खरंच मी योग्य आहे का.. " तेव्हा तिचे उत्तर फार महत्वाचे होते, "आपण चांगले माणूस असल्याची ही पावती असते, ती स्वीकारून पुढच्या प्रत्येक पावलावर त्याची जाणीव ठेवून जबाबदारी वाढवणारी  असते ही कौतुकाची प्रेमाची थाप..आज तुला ह्या प्रसंगात तुझ्या ज्या चुका , उणिवा किंवा कमतरता दिसत आहेत त्या पुढच्या वेळी तू दूर करण्याचा प्रयत्न कर. पण हा क्षण अभिमानाने जग, तो तुझा स्वतःचा आहे."

मी लहानपणा पासून आईबाबांना कोणतही काम करताना सचोटी आणि  प्रामाणिकपणे करताना पाहिलं आहे..ते अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे. तुमच्या सगळ्यांच्या शब्दांनी खूप भारावून गेले आहे. ... धन्यवाद सर्वांचे.. देवाचे सर्वात जास्त आभार कारण मी ह्या सर्व सोहळ्याचा भाग असण्याची सुतराम शक्यता नव्हती.

मी साधारण कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्या भावना कवितेत मांडते आहे, फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये माहित असलेली ही गोष्ट, मी साधारण 2013 पासून फेसबुक, ब्लॉग आणि विविध social media platform वर हळूहळू मांडायला लागले. मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या नाहीत..बऱ्याचश्या कविता मुक्तछंदात आहेत.. माझ्या मनातील विचार मांडायचा केलेला प्रयत्न आहे..माझ्या नवऱ्याने दिपक सावंत Deepak Sawant ह्याने फार आग्रहाने आणि कौतुकाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.. माझा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह..ह्याआधी माझ्या कविता 3 वेगवेगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून छापून आल्या आहेत, एक दोनदा कथाही छापून आल्या आहेत..

गीतकाव्य ह्या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान सतीश दादा आणि परेश दादा ह्यांनी सुद्धा माझ्या पुस्तक निर्मितीसाठी आग्रह धरला होता. त्यांचेही आभार. Sateesh Ranade  Paresh Koli
माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझ्या धाकट्या लेकीने प्राची दिपक सावंत( वय वर्ष 13) हिने काढले आहे..thank you Prachi.. Love you प्राची आणि पूर्वा..

पुस्तकाची उत्तम प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक Satish Solankurkar  सोळांकुरकर सरांनी लिहिली आहे त्यांचेही आभार... आणि पुस्तकाच्या पाठी लिहिलेली मा प्रा कविवर्य अशोक बागवे सरांची पाठराखण म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे.. Ashok Bagwe सर धन्यवाद...

गीतकाव्य आणि भावनांची चंची ह्या दोन काव्यसंग्रहासोबत पुण्यात 10 जानेवारीला भावमेघ चे प्रकाशन झाले.. अंतर्नाद काव्यमंच ह्यांनी Velvet Kavisha Publications  Varsha Vishal Thukrul  सोबत फार सुंदर सोहळा आयोजित केला होता..दोन्ही संस्थांचे आभार..

आणि माझी आई Shilpa Samant , माझा दादा Harshad Samant आणि माझे सगळे जिवलग जे मनात इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत त्या सगळ्यांचे आभार.. माझ्या बाबांना मी सर्वात जास्त miss करते आहे..त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत..ते जाणवतात.🙏
आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतकाचेही आभार, सदिच्छा पाठीशी असल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही..

आणि भावमेघ बरोबर प्रकाशित झालेल्या भावनांची चंची या काव्यसंग्रहाच्या कवयित्री Saru Pawar ताई तुमचेही अभिनंदन..आणि गीतकाव्य ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट 26 कवी कवयित्रींचेही अभिनंदन...
आणि माझे माहेरचे सर्व सामंत कुटुंबीय, आजोळचे नाईक कुटुंबीय आणि सासरचे सावंत कुटुंबीय ह्या सर्वांचे आभार

माझ्या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी नक्की कळवा. वाचून आवर्जून अभिप्राय द्या..
इतक्या उघडपणे अभिमानाने माझ्या कविता मिरवताना फार छान वाटलं..धन्यवाद @Deepak Sawant.
मेघना

https://www.facebook.com/meghanadeepaksawant




0 comments: