Friday, May 15, 2026

मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!


मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!

 डॉ.आनंद नि मी आम्ही दोघे महाविद्यालयीन मित्र. असंख्य वेळा भेटलेलो. अगदी पहिल्यापासून. समोरच्या व्यक्तीवर जीव लावून प्रेम करणारा. निखळ   आनंदाच्या बिया पेरीत  , स्वतःची दुःखे दूर ठेवून ,"जगाला प्रेम  अर्पावे" ही उक्ती जगणारा सर्वांचा मित्र, डॉ.आनंद नाडकर्णी! सर्वार्थाने  अजातशत्रू असलेले हे व्यक्तिमत्त्व ! स्नेहसंमेलनापासून ते वक्तृत्वस्पर्धेपर्यंत एकत्र प्रवास  महाविद्यालयीन  काळात झाला. त्यांचे वडील हे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते डॉ.म द.नाडकर्णी. अत्यंत तत्वनिष्ठ आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. त्यांच्या सत्वगुणांचा वारसा त्यांच्या बुद्धिमत्ते बरोबर आनंदला मिळाला होता. 
पुढे 'वेध' च्या माध्यमातून डॉ.नाडकर्णी यांनी लक्षावधी मनांना सावरण्याचे कार्य केले. अहंकाराचा, पदाचा आणि  सर्वस्पर्शी  प्रतिभेचा अंशभर अहंकार नसलेला, केवळ आनंद देणे हाच धर्म मानणारा आमचा मित्र आज मात्र ह्या जगाला दुःख देऊन गेला.
खरा विज्ञान आनंदयोगी हरपला! त्यांच्या अनेक मनोवैज्ञानिक पुस्तकांच्या निमित्ताने आणि वेध या संस्थेच्या रूपाने आनंद आपल्यात कायम असणारच आहे. अत्यंत व्यथित मन झाले आहे,ह्या माझ्या विचारवंत मित्राला निरोप देताना..माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रवीण दवणे 

0 comments: