Friday, May 15, 2026

अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी

*अथांग मनाचा समुद्र..*

आज मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. 

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने महाराष्ट्राने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. 

मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर हजारो लोकांना जगण्याची नवी दिशा दिली. 

मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे योगदान अमूल्य राहिले. 

लेखन, व्याख्यानं, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आणि व्यसनमुक्तीच्या कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवला. 

त्यांची भाषा अभ्यासपूर्ण असूनही अत्यंत साधी आणि माणुसकीने भरलेली होती. म्हणूनच ते फक्त डॉक्टर नव्हते, तर अनेकांसाठी विश्वास देणारे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना मनःपूर्वक आदरांजली.

*“काही माणसं आयुष्य संपल्यानंतरही त्यांच्या विचारांमधून आणि कार्यातून सतत जिवंत राहतात…*

डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यापैकीच एक.”

आपलं मानसशास्त्र परिवारातर्फे या अथांग मनाच्या समुद्राला भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹

@राकेश वरपे

#dranandnadkarni 

0 comments: