Thursday, April 28, 2011

पैसा झाला मोठा-एक विदारक सत्य

पैसा झाला मोठा !! 

आज कालच्या कलियुगा  मध्ये माणसांपेक्षा पैशाची किम्मत जास्त झाली  आहे !!
म्हणून तर नात्यां मधला ओलावा कमी झाला आहे !!
माणुसकी आणि नात्यां पेक्षा पैसा मोठा झाला हीच ह्या युगाची व्यथा / शोकांतिका  असावी!!


उखाणे..........त्याच्या आणि तिच्यासाठी

उखाणे..........त्याच्या आणि तिच्यासाठी

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

... आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप

पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप

बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ

सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?

हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास

एक होति चिऊ, एक होता काऊ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?


लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे


कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!


आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान


सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन


शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि


केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत


नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .

दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ----रावाचि मि सौभाग्यवति.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे


श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

****************************************************************************************************

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे


निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान

काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !


खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..


उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम


पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला


मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

Wednesday, April 27, 2011

अंधश्रद्धा निर्मुलना साठी फेसबूक वर केलेला हा एक खटाटोप!!

अंधश्रद्धा निर्मुलना साठी फेसबूक वर केलेला हा एक खटाटोप!!

                    

माणुस कर्माने मोठा होतो !! पण समाजसेवा केल्याने 
कोणी संत आणि देव होत नाही  हे तितकच
                                                         खर  आहे !!





शेवटी प्रत्येकाचा व्ययक्तिक प्रश्न आहे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तो !! मी फ़क्त माझ मत व्यक्त केल आहे !! अंध श्रद्धा निर्मुलना साठी  फेसबूक चांगला माध्यम आहे अस मला तरी वाटत !














विनंती : हिन्दू धर्म जाणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ,हिन्दू धर्माचे ग्रन्थ  उपयोगी पडतात..संत आणि भोंदू यामधला फरक नक्की समजायला सोपेही  करतात!!
मराठीतली म्हण : एकावे  जनाचे करावे मनाचे !!

Sunday, April 24, 2011

आपल्या सर्वांच्या लाडक्या ' सचिन ' ला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.


आपल्या सर्वांच्या लाडक्या ' सचिन ' ला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.







Saturday, April 23, 2011

काही मजेशीर व्याख्या

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, बघा आवड्तायेत का?

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या,
बघा आवड्तायेत का?

... अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा
April 23 at 1:53pm

Friday, April 22, 2011

आई-अक्षरवेल


आई !!

आई  तुझ्या गर्भातच स्वर्ग आहे !! 
जरी तू असलीस दूर ..
तरी तुजी माया सदैव मी हृदयाशी बाळगुण  आहे!!!

आयुष्याच्या शेवटच्या क्षण पर्यंत आयुष्य जगायला शिकीन हेच एक वचन देते  !!!
जमलच तर तुझ्यासारखे दुसर्‍यांना चार क्षण सुखाचे देण्याचा प्रयत्न करीन!!
शेवटी आयुष्य खुप सुंदर आहे..... हसत हसत जगायचा की कण्हत कण्हत ते प्रत्येकाने ठरवायचा असत !!!

---विद्या 

Thursday, April 21, 2011

साथीला आता तु नाहीस-विरह

विरह



साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु.....

तुझ्या पासुन दुर होण,
माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन
विरह सहन करण आता मला शक्य नाही....।।

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर...
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ...

मनाला बांध घातला होता
हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली होती
अन आसवांनी दगा दिला होता..

नज़र ना लागो मला कुणाची
म्हणून तू माझी नजर काढून गेली .........
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण
म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली

अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही....
तरीपण माझ्या प्रश्नाना
तू कधि उत्तर दिले नाही....

कधि तू कधि मी
एकमेकांशी भांडू ....
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू.....

जर तुला मला आजमवायच होत
तर फक्त तुज्या गाहिर्‍या डोळ्यांनी पाहायच होत....
अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो
त्यात एवढ का लोभस हसायच होत....


मी डोळे बंद करताच
तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते.....
उघडतच डोळे निघून जातेस
म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते....

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असलेलेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..

बोटांना माझ्या आता
वेगळं राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ....
-अनामिक

" कविचे खुप खुप आभार !! 
खरच काळजाला भिडणारी कविता आहे !!"

Wednesday, April 20, 2011

सूर्यफुल-सचिन आचरेकर

 सूर्यफुल


रोज ते सूर्यफुल सूर्याकडे बघायचे..
सूर्यासोबत आपली दिशा बदलायचे...

काळ्या ढगात सूर्य लपला..
की ते पण रूसायाचे..

सूर्याकडे बघून सगळेच डोळे मिटतात..
पण सूर्यफुल नजरेला नजर द्यायचे..
सूर्याची कीराणे अंगावर झेलायचे..
आणि सुखद भावनानी..फुलायचे...

एक दिवस सुर्या उगवला...
पण त्याला सूर्यफुल नाही दिसले..
सूर्याच्या किरणानी पण फुलला शोधले....

शेताताले ते सूर्यफुल नेले होते माणसाने...
तेलाच्या घाण्यात...तेल बनवण्यासाठी...
सूर्य मात्र रडत होता त्या फुलासाठी....

Wednesday, April 13, 2011

Tuesday, April 12, 2011

Monday, April 11, 2011

महाराष्ट्रा मधील मराठी भाषेची शोकांतिका ...

महाराष्ट्रा मधील  मराठी भाषेची शोकांतिका !

चेनईहून पाँडिचेरीसाठी निघालो आणि तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचे महत्त्व का टिकून आहे, याचा साक्षात्कार मला प्रवासादरम्यान झाला. तमिळनाडूमध्ये कोठेही काम करा; तमीळ आल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जादा पैसेही मिळत नाही. तेव्हा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमीळ शिकण्यावाचून तुम्हाला गत्यंतरच नाही, ही गोष्ट उत्तर प्रदेशहून आलेल्या एका भैय्या मुलाकडून मला समजली. तेव्हा मला धक्का वगैरे काही बसला नाही. पण जे काही ऐकले होते ते प्रत्यक्ष अनुभवल्याचा साक्षात्कार झाला.

सोनू असं त्या मुलाचं नाव. वय साधारण पंचवीस-सव्वीस असेल. सोनू हा मूळचा उत्तर प्रदेशचा. रामपूर किंवा तत्सम कुठल्या तरी खेड्यातला. दोन वर्षांपूवीर् तो मुंबईमध्ये फनिर्चर बनविण्याच्या धंद्यात कारागीर म्हणून लागला होता. तिथं त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीचे दोनशे रुपये मिळायचे. पण चेन्नईमध्ये तितक्याच कामाचे त्याला साडेतीनशे रुपये मिळतात. त्यामुळे त्यानं मुंबई सोडून चेन्नईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भैय्या लोकांची खूप गदीर् असल्यामुळे तिथं जास्त पैसे मिळत नाहीत. पण चेन्नईमध्ये कारागीर लोकांची कमतरता असल्याने इथं आम्हाला जास्त भाव मिळतो, असं सोनू सांगतो.

चेन्नईतही कारागिरांचे दोन प्रकार आहेत. ज्यांना तमीळ येते, अशा कारागिरांनाच तमीळ ठेकेदार कामावर ठेवतात. तमीळ ठेकेदारांकडे काम केले तर आम्हाला दिवसाला साडेतीनशे रुपये मिळतात. गैरतमीळ (म्हणजे हिंदीभाषक) ठेकेदाराकडे काम केले, तर मुंबईप्रमाणेच दोनशे रुपये रोजाने काम मिळते. त्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील, तर तमीळ भाषा शिकावीच लागते. तमिळनाडूत येऊन जर मुंबईचाच भाव मिळणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग, असा सवाल सोनू उपस्थित करतो.

तमिळनाडूमध्ये आल्यावर तमिळ शिकला. मग मुंबईमध्ये असताना मराठी शिकला होता का, हा माझा प्रश्न ऐकून तो चक्रावूनच गेला. मी मूर्ख म्हणून असा प्रश्न विचारतो आहे, की काय असाच त्याचा चेहरा झाला होता. सोनू म्हणाला, साहेब, मुंबईमध्ये मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे आम्हाला तिथे भाषेचा प्रॉब्लेम कधीच आला नाही. आम्ही आमच्याच प्रांतामध्ये आहोत, असे आम्हाला वाटायचे. त्यामुळे महाराष्ट्रात असताना किंवा मुंबईमध्ये असताना मराठी शिकण्याचा प्रश्नच आला नाही. तिथे मराठी न शिकताही आम्हाला नोकरी आणि पैसे मिळत होते. मात्र, इथे तसे नाही. त्यामुळे तमीळ आम्हाला शिकावीच लागली.

काही महिन्यांपूवीर् तमिळनाडूमध्ये राजस्थानी लोकांचे एक संमेलन झाले होते. त्या वेळी त्यांनी राजस्थानी भाषेतील गाणी आणि संगीत जोरजोरात लावले होते. त्या वेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि हा मुद्दा करुणानिधी यांच्यापर्यंत गेला. त्या वेळी करुणानिधी यांनी त्यांना सज्जड भाषेत इशारा दिला होता, 'तुम्हाला गाणी ऐकायची ऐका, काम करायचे आहे करा. तुम्हाला कोणी अडविणार नाही. पण जेव्हा भाषेचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला तमीळ आलीच पाहिजे. बोलायचे मात्र तमीळमध्येच.' बऱ्याच दिवसांपूवीर् वाचलेला हा किस्सा नुसता डोक्यात होता. सोनूच्या निमित्ताने त्याचा थेट अनुभव आला.

सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स, दिनांक ६ एप्रिल २०११

मराठी हास्यकट्टा 26

तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
... गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
**********************
कार..

अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.

तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
... ' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'

अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
**********************
संपतराव आपल्या
पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज अजूनं माझ्या पॅंटच्या खिशातले काही
पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
.
पत्नी : कमाल आहे तुमच्या
... अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून
तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
.
संपतराव : तू नक्कीच खिशात हात
घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
**********************
वकील : चोरी करताना स्वताच्या बायको मुलांचा विचार तुझ्या मनात नाही आला?

चोर : विचार आला होता साहेब, पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचाच समान मिळत होत.

**********************
पु.ल. देशपांडे ह्यांचे काही मजेदार किस्से

एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!”

**********************
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले “अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!”
**********************
वाऱ्यावरची वरात’चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले… ‘प्रयोग संपेपर्यंत थांब!’ लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, ‘उद्या याची ‘वरात’ निघणार आहे, पण तो आजच ‘वाऱ्यावर’ स्वार होऊन आला आहे’…आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
**********************
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले “गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये.” यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
**********************
एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले…..पु लं नि आशीर्वाद दिला …….
‘कदम कदम बढाये जा’
April 11 at 9:06pm

Sunday, April 10, 2011

फरक कुठे पडला आहे

फरक कुठे पडला आहे….


लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो |
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो |
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो |
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो |
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे |
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे |

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो |
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो |
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली |
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली |
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे |
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे |

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो |
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो |
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो |
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो |
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे |
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे |

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो |
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो |
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला |
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला |
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे |
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे |

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा |
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा |
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो |
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो |
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे |
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे |

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो  |
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो  |


Saturday, April 9, 2011

Friday, April 8, 2011