Showing posts with label Chhatrapati Shivaji Maharaj. Show all posts
Showing posts with label Chhatrapati Shivaji Maharaj. Show all posts

Wednesday, November 2, 2011

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज


दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा !!
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
असो आमुचा मुजरा माझा श्रीशिवरायाला!!
जय भवानी जय शिवाजी..

Thursday, January 20, 2011

शिवकल्याण राजा




।।शिवकल्याण राजा।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

Monday, July 5, 2010


शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा
घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी
बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!



!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!
!!! शंभू राजांना मानाचा मुजरा !!!!


मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान
मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे

Friday, February 19, 2010

शिवाजी महाराज जयंती



शिवाजी   महाराज  जयंती 


सिंहाच्या जबड्यात,घालुनी हात,मोजीन दात..ही जात मराठ्यांची!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..


















Thursday, October 9, 2008


छत्रपती शिवाजी महाराज !!!

ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला,
पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला........... ज्या काळी स्वातंत्र्याचा
विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला
स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी।

हे दुर्दैव म्हणव लागेल कि, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यापासून, दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्याच्या घोड्याच्या टापा गेल्या त्या शिवबाचे वारस आपण पण आज किती जनांना महाराजांचा इतिहास माहित आहे............ अगदी कमी...........

ज्यांनी अख्ख आयुष्य या मातीसाठी बहाल केल, वयाच्या अगदी १६ व्या वर्षापासून ५० पर्यंत फक्त स्वराज्य आणि स्वराज्य हाच विचार केला............

२२ हजारांची फौज घेवून आलेला अफझल खान, ३२ हजार फौझ घेवून आलेला सिद्धी जोहर, ६० हजारच्या आसपास फौज घेवून उतरलेला शाहिस्तेखान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. या सगळ्यावर मात केली....... एक हिंदू राजा
पण औरंग्याचा चाकर मिर्झा राजा १ लाख फौज घेवून उतरला, पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव
होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य
देखील केला............ राजे आग्र्यामध्ये कैद असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला,

बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच
लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ??? महाराजांकडून............

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...........
कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं.

महाराजाविषयी थोडेशे............ .

अधिकारकाळ- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक- जून ६, १६७४
राज्यव्याप्ती- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी- रायगड
पूर्ण नाव- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या- गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म- फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू- एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी- छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील- शहाजीराजे भोसले
आई- जिजाबाई
पत्नी- सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती- छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे- भोसले
राजब्रीदवाक्य-'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.
शिवकल्याण राजा।।
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना
१६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात
पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५०
वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या
नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या
पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या
नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.

शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???

त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा
जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना
अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला
कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत
लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना
अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये
मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या
वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.

पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड
२७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा
आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन
'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे
हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान
महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या
इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...

शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९
ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त
करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली
गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून
असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक
पैलू.

शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही
कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९
मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी
दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा
नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या
प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित
ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि
युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.


Sunday, September 21, 2008

मराठी कविता

एकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडादले,
"अरे मावल्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"

महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी राजगडअ वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!
मी म्हणालो ,"महाराज, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!

महाराज विचलित झाले,
म्हणाले,"चल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्राची राजधानी पहुयात",
महाराजान्सोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटआत पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकी