Wednesday, July 11, 2007

मॅगसेसे अवॉर्ड मिळवणारे महाराष्ट्रीय
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

मॅगसेसे अवॉर्ड हे आशियातले नोबल प्राइज म्हटलं जातं. समाजसेवा, सरकारी नोकरी,
सामाजिक नेतृत्व, पत्रकारिता आणि कला तसेच नवं नेतृत्व या विभागांमधे हे अवॉर्ड
दिलं जातं. आजवर महाराष्ट्राला आपलं कार्यक्षेत्रं बनवलेल्या अकरा जणांना हा
पुरस्कार मिळाला आहे.

*मॅगसेसे अवॉर्ड मिळवणारे महाराष्ट्रीय*

विनोबा भावे (१९५८) – सामाजिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार

सी. डी. देशमुख (१९५९) – सरकारी सेवेसाठीचा पुरस्कार

रजनीकांत आणि मॅबेल आरोळे (१९७९) - सामाजिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार

आर. के. लक्ष्मण (१९८४) – पत्रकारितेसाठीचा पुरस्कार

बाबा आमटे (१९८५) – समाजसेवेसाठीचा पुरस्कार

बानू जहांगीर कोयाजी (१९९३) – समाजसेवेसाठीचा पुरस्कार

पांडुरंगशास्त्री आठवले (१९९६) - सामाजिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार

जोकीम अर्पूथम (२०००) – पत्रकारिता, साहित्य आणि सृजनशील कलेसाठीचा पुरस्कार

डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे (२००८) – सामाजिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार
भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीय
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

भारतरत्न हा आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार. आतापर्यंत सहा मराठी
माणसांना हा पुरस्कार मिळालाय. त्यात महाराष्ट्रात संपूर्ण कारकीर्द करणा-या
जे. आर. डी. टाटांना जोडलं तर हा आकडा सात होतो.

*भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रीय *

शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे १९५८

महामहोपाध्याय पां. वा. काणे १९६३

आचार्य विनोबा भावे १९८३

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९९०

उद्योजक जे आर डी टाटा १९९२

गानसम्राज्ञी लता मंगेशकर २००१

पंडित भीमसेन जोशी २००८
महाराष्ट्रभूषणांची मांदियाळी
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण हा राज्यातला सर्वोच्च
पुरस्कार. आतापर्यंत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलंय.

*महाराष्ट्रभूषण विजेते *

१९९६ पु. ल. देशपांडे

१९९७ लता मंगेशकर

१९९९ विजय भटकर

२००१ सचिन तेंडुलकर

२००२ भीमसेन जोशी

२००३ अभय आणि राणी बंग

२००४ बाबा आमटे

२००५ रघुनाथ माशेलकर

२००६ रतन टाटा

२००७ रामराव कृष्णराव पाटील

२००८ नाना धर्माधिकारी

२००९ सुलोचना


राजीव खेल रत्न पुरस्कारविजेते महाराष्ट्रीय
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा खेळांतला सर्वात मोठा पुरस्कार आतापर्यंत
सचिन आणि अंजली वेदपाठक या दोन मराठी खेळाडूंना तो मिळालाय. पण त्यात कर्नल
मोतीवाला आणि धनराज पिल्ले या दोन मुंबईकरांनाही महाराष्ट्रीय म्हणून पकडता
येईल.

*राजीव खेल रत्न पुरस्कारविजेते महाराष्ट्रीय खेळाडू *

कर्नल होमी मोतीवाला ( यॉचिंग) १९९२-९३

सचिन तेंडुलकर (क्रिकेट) १९९७-९८

धनराज पिल्ले (हॉकी) १९९९-२०००

अंजली वेदपाठक (नेमबाजी) २००२-२००३
साहित्य अकादमी पुरस्कारविजेते मराठी साहित्यिक
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

साहित्य अकादमी हा दरवर्षीचा महत्त्वाचा साहित्यविषयक पुरस्कार. मराठीतल्या
अनेक दर्जेदार साहित्यकृतींना या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांची ही यादी.
याशिवाय साहित्य अकादमीची फेलोशिप मिळवणा-यांची यादीही सोबत आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक. कंसात त्याचं वर्ष आणि पुढे
त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९५५) - वैदिक संस्कृतीचा इतिहास

बा. सी. मर्ढेकर (१९५६) - सौंदर्य आणि साहित्य

चिंतामणराव कोल्हटकर (१९५८) - बहुरूपी

ग. त्र्यं. देशपांडे (१९५९) - भारतीय साहित्य शास्त्र

वि. स. खांडेकर ( १९६०) - ययाति

द. ना. गोखले (१९६१) - डॉ. केतकर

पु. य. देशपांडे (१९६२) - अनामिकाची चिंतनिका

श्री. ना. पेंडसे (१९६३) - रथचक्र

रणजित देसाई (१९६४) - स्वामी

पु. ल. देशपांडे (१९६५) - व्यक्ती आणि वल्ली

त्र्यं. रा. शेजवलकर (१९६६) - श्री शिवछत्रपती

ना. गो. कालेलकर (१९६७) - भाषाः इतिहास आणि भूगोल

इरावती कर्वे (१९६८) - युगांत

श्री. ना. बनहट्टी ( १९६९) - नाट्याचार्य देवल

न. र. फाटक (१९७०) - आदर्श भारतसेवक

दुर्गा भागवत ( १९७१) - पैस

गोदावरी परुळेकर (१९७२)- जेव्हा माणूस जागा होतो

जी. ए. कुलकर्णी १९७३ काजळमाया

वि. वा. शिरवाडकर १९७४ नटसम्राट

रा. भा. पाटणकर १९७५ सौंदर्य मीमांसा

गो. नी. दांडेकर १९७६ स्मरणगाथा

कवी अनिल १९७७ दशपदी

आरती प्रभू १९७८ नक्षत्रांचे देणे

शरच्चंद्र मुक्तिबोध १९७९ सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य

मंगेश पाडगावकर १९८० सलाम

लक्ष्मण माने १९८१ उपरा

प्रभाकर पाध्ये १९८२ सौंदर्यानुभव

व्यंकटेश माडगूळकर १९८३ सत्तांतर

इंदिरा संत १९८४ गर्भरेशीम

विश्राम बेडेकर १९८५ एक झाड आणि दोन पक्षी

ना. घ. देशपांडे १९८६ खूणगाठी

रा. चिं. ढेरे १९८७ श्री. विठ्ठलः एक महासमन्वय

लक्ष्मण गायकवाड १९८८ उचल्या

प्रभाकर उर्ध्वरेषे १९८९ हरवलेले दिवस

आनंद यादव १९९० झोंबी

भालचंद्र नेमाडे १९९१ टीका स्वयंवर

विश्वास पाटील १९९२ झाडाझडती

विजया राजाध्यक्ष १९९३ मर्ढेकरांची कविताःस्वरूप आणि संदर्भ

दिलीप चित्रे १९९४ एकूण कविता – १

नामदेव कांबळे १९९५ राघववेळ

गंगाधर गाडगीळ १९९६ एका मुंगीचे महाभारत

म. वा. धोंड १९९७ ज्ञानेश्वरीतील लौकिक दृष्टी

सदानंद मोरे १९९८ तुकाराम दर्शन

रंगनाथ पाठारे १९९९ ताम्रपट

ना. धों. महानोर २००० पानझड

राजन गवस २००१ तणकट

महेश एलकुंचवार २००२ युगांत

त्र्यं. वि. सरदेशमुख २००३ डांगोरा एका नगरीचा

सदानंद देशमुख २००४ बारोमास

अरुण कोलटकर २००५ भिजकी वही

आशा बगे २००६ भूमी

डॉ. गो. मा. पवार २००७ म. विठ्ठल रामजी शिंदेः जीवन व कार्य

श्याम मनोहर २००८ उत्सुकतेने मी झोपलो

वसंत आबाजी डहाके २००९

याशिवाय महामहोपाध्याय पां. वा. काणे यांना १९५६ साली हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र
या इंग्रजी पुस्तकासाठीही पुरस्कार मिळाला आहे.

*साहित्य अकादमी फेलोशिप मिळालेले मराठी साहित्यिक*

१९७०- वि. स. खांडेकर
१७७१ - काका कालेलकर
१९७३ - वा. वि. मिराशी
१९७९ - आत्माराव रावजी देशपांडे
१९८९ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
१९९४ - वि. भि. कोलते
१९९७ - विंदा करंदीकर
२००० - रा. ना. दांडेकर
२००७ - रवींद्र केळेकर


ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी लेखक
- महापॉलिटिक्स रिसर्च ब्युरो

ज्ञानपीठ हा देशातला सर्वात मोठा साहित्य पुरस्कार आजपर्यंत अवघ्या तीन मराठी
साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती देणारी ही
यादी

*ज्ञानपीठ विजेते मराठी साहित्यिक*

१. *वि. स. खांडेकर*
पूर्ण नावः विष्णू सखाराम खांडेकर
वर्षः १९७४
पुरस्कारः ययाति या कादंबरीला

२. *कुसुमाग्रज*
पूर्ण नावः विष्णू वामन शिरवाडकर
वर्षः १९८७
पुरस्कारः नटसम्राट या नाटकाला

३. *विंदा करंदीकर*
पूर्ण नावः गोविंद विनायक करंदीकर
वर्षः २००३
पुरस्कारः अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला

यांच्याशिवाय प्रसिद्ध मराठी आणि कोंकणी लेखक रवींद्र केळेकर यांनाही २००७
सालचं ज्ञानपीठ मिळालंय.

Sunday, July 1, 2007

जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस

--------- --------- ------
तू झाडावर चढू शकतोस का ?
संजीवनी आणू शकतोस का ?
छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?
नाही ना?

... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!


********* ********* ********* *****
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
... का?

..अंगात मस्ती , दुसरं काय ?

********* ********* ********* *****
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,
असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती
प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते !!

********* ********* ********* *****
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड
पुरवणं अशक्य व्हावं!!!

********* ********* ********* *****
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर
त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ?
उत्तर : चीनी कम!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* *
तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!

********* ********* ********* *****
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो, प्रकाश आहे का?

नाही.

मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
********* ********* ********* *****

'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,''
ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...
'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सर
म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''

********* ********* ********* *****

*पुण्याहून** **पत्र*

प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या
रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे.
त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते
ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात
दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा
करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी
बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ?
अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका.

--------- --------- ------

नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला
आहे.