Showing posts with label Marathi Charolya. Show all posts
Showing posts with label Marathi Charolya. Show all posts

Sunday, September 27, 2015

चारोळ्यांचा स्टोरी board

चारोळ्यांचा स्टोरी board 



नुसतं दिसणं पुरेसं असतं !
बोलायची गरज नसते !!
अशी नजरभेट मग कितीवेळ !
मागल्यादारी
मी आठवत बसते !

=================
वेड्या क्षणी भास होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगाच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा


=================

आता आपण भेटलोतर
मी आधी बोलणारच नाही तुझ्य़ाशी
एरवी असं जमत नाही पण
यावेळी मी वाट पाहीन जराशी....
~चंद्रशेखर गोखले
=================
जेंव्हा डॊळ्य़ाना नजर
थोपवता येत नाही
तेंव्हा नजरेवर सगळं
सोपवता येत नाही...

=================

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या
म्हणून गूपीत तुला कळले.

=================
माझी गोष्ट मला सांगताना
मी जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही ...

=================
चंद्राला माझं घर
तुझ्यामुळे माहीत
कारण हल्ली मी त्याच्या सोबत जागतो
तुझ्या स्वप्नांसहीत........

=================
 तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही..
=================
एकांतात स्वता:ला आरशात पाहणं
हा अनुभव साधा नाही
तसे आपण साधे असतो
पण मनातला चोर सीधा नाही.....

=================
तिन्हिसांजेला...
तळ्याकाठी...
कोणी खोळंबतं
कुणासाठी............
===========
नसती उत्तरं द्यावी लागतात
वेड्यासारखं वागल्यावर
पण वेड्यासारखच वागायला होतं
पाऊस पडायला लागल्यावर..........
चंद्रशेखर गोखले

Posted by  : विद्या 

Wednesday, March 7, 2012

चारोळ्या



आयुष्यात खुप काही हव असत
हव तेच मिळत नसत
हव तेच मिळालं तरी कमी असत
कारण चान्दन्यानी भरून सुद्धा
आकाश नेहमी रिकामच असत.

---------------
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!
---------------
नजरेत नजर मिसळून बघ
सख्या शब्दांची तुला खाण दिसेल.
एक-एक शब्द उघडून बघ
इंद्रधनूची कमान हसेल .
 ---------------
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात...
. एक पुढे नि एक पाय मागे..
पुढच्याला गर्व नसतो....
मागच्याला अभिमान नसतो...
कारण त्याला माहित असत.....
क्षणात हे बदलणार असत...
याचंच नाव जीवन असत .......

--------------
आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, दुसऱ्यासाठी जगा.
दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
यासाठी आपल्या काळजातील "आई' जपून ठेवा
* सिंधुताई सपकाळ *
--------------
लिहता लिहता जपावे ते अक्षर मनातले
रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले
बोलता बोलता गूंफावे ते शब्द ओठातले
हसता हसता विसरावे ते दु:ख जीवनातले
--------------
एक तरी नात असाव, मनापासून मनाला पटणार,
मैत्रीच्या पलिकडे, प्रेमाच्या अलीकडे,
रुनानुबंध जपणार....!!!

Tuesday, September 14, 2010


चारोळ्या



क्षण वेचावेत असे की
मन हरवून जावे
हरवलेल्या मनातून
क्षण साठवीत यावे
--**--
मी कमी बोलतो म्हणून
शब्द कागदावर उतरतात
बोलायला गेलो तर
वेडे ओठातूनच परततात
--**--
मनामध्ये असू द्यावा
एक आठवणींचा कप्पा
म्हणजे हव्या तेव्हा मारता येतात
दूर गेलेल्यांशी गप्पा
--**--
तू अस पाहिलास की
वाटलं पाऊस पडायला हवा
मी अंग चोरताना
तुझा धिटाइचा स्पर्श घडायला हवा
--**--
तू माझ्या जवळ येतेस
पण मनापर्यंत पोचत नाहीस
तिथे मुक्याने प्राजक्त बरसात राहतो
तो तू कधी वेचत नाहीस


--**--


खपली देखील एकेकाळी
जाख्मेचाच भाग होती
फरक एवढाच की तेव्हा
तिथे वेदनेला जाग होती



----**--------

दुरून गावे फारच
सुंदर आणि सुबक दिसतात
गल्ली बोळातून फिरताना कळते
की ती किती विस्कटलेली असतात
-----********-------------
आपण त्याला महत्व द्यावे
ज्याला आपण आवडतो
नाहीतर आपण आपल्या आवडीसाठी
संपूर्ण आयुष्य दवडतो
-----********-------------
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशेब करून तर बघा
किती जगलो या एवजी कसे जगलो
हा एक प्रश्न मनाला विचारून तर बघा

Monday, July 5, 2010

Monday, June 14, 2010


पाऊसातिल ओल्या चारोळ्या !!






गडद गार हिरव्या झाडा मागे , 



वा कधी पडक्या वाड्या मागे , 

हळूच ती खुणावे मला,सहवास तिचा आवडे मला 
या निशेच्या राती ,झिम्म चीम्म पाउस गती 
दे मला तुझी सोबती .ती झुळूक राणी



कातर वेळचा
गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
................****.......................
मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.
................****.......................
जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.
................****.......................
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.
................****.......................
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......
................****.......................
तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.

................****.......................
पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.
................****.......................
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.
................****.......................
तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.
................****.......................
नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.
................****.......................
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा.
................****.......................
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.
................****.......................
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
................****.......................
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.



पाऊस पडत असताना…
चहुकडे दाटलेला रंग हिरवा
त्यातच हवाहवासा धुंद गारवा
चिंब भिजण्याचा बहाणाही नवा
कातरवेळी हया सख्या तु मला जवळ हवा…


पाऊस पडत असताना
बेभान होतो वारा
त्यात तुझी साथ हवी
जसा लाटाना हवा असतो किनारा


पाऊस पडत असताना…
पाउसाकडे दुरून पाहायच नसत
ते बरसणारे थेंब अलगद झेलत
ओल्या निसर्गात हळूवार विरघळत
पाउस होउन चिंब भिजायच असत …


पाऊस पडत असताना…
तु समोर आलास की नेहमी मी चिंब भिजते
तुला जरी म्हणत असले पाउसाची मजा घेते
खरतर त्या पाउसात माझे अश्रु लपवीत असते

Saturday, May 22, 2010

प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते, दुखा:त जरी रडलो तरी, सुखात हास्य असते !!विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो, ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो... !!

आंबा खातांना, लिहित होतो चारोळी! ठसका लागला आणि, घशात अड़कली आठोळी!!

गोट्या : काय हो तुमच्या कडे "मारुती" चे स्पेअर पार्ट्स विकत मिळतात का??दुकानदार : हो...गोट्या : मग मला एक "गदा" द्या...

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुडला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे..

घन बरसतात...मन तरसतात... काही गोष्टी आठवतात...काही विसराव्याशा वाटतात...मनातील शब्दाँना वाटा फुटतात.पण अश्रु डोळयातच गोठतात.पाऊस तोच...भावनाही त्याच... खंत एकच...कोनाचीतरी कमी.



आपल्या संस्कृतीत शुभमुहूर्त साडेतीन, आज अक्षय तृतीया. संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. 'ऋतूंचा कुसुमाकर' वसंत ऋतू व चित्रविचित्र अशा सृष्टी सौंदर्याने नटलेला चैत्राच्या सांगतेचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया...!! अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Wednesday, April 28, 2010