Tuesday, February 28, 2012

मराठी चारोळ्या



नात्यामध्ये गुंतायचा नसतं,,
नात्याला आपण गुंफायचा असतं..!!
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,,
कोळ्या सारखाच मात्र मुक्त फिरायचं असतं..!!

......................................

झरे आणि डोळे यांना वाहने फक्त माहित असते
फरक एवढाच कि ,
झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे ......
कुणाच्या तरी"आठवणीत"
.....................................

जीवनाच्या वाटेवर
कऴयाँचे बंध फुटून जातात.
वाहून जाते सहवासाचे पाणी.
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरुन राहतो
कारन भीजत राहतात त्या "आठवनी"...!

.............................................

जे जुडते ते नाते जी जडते ती सवय
जी लागते ती ओढ जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो सहवास
आणि ज्या निरंतर राहतात त्या "आठवनी"...!!

Monday, February 27, 2012

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की



"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम….

कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजेप्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"
खरच..!! प्रेम नेमक काय असतं..!!!
प्रेम नेमकी काय असत..???..

कवी : चैतन्य  मोहिले 

Sunday, February 26, 2012

निसर्ग कविता


मनातल्या पहाटेला पारिजात फुले
पाखरांचे थवे गंधवेडे झाले
मनातल्या उन्हात झाडे बहरली
आशेची पाखरे वर उडू लागली
मनातल्या पानोपानी दवबिंदू झुले
सोनेरी किरणात त्याचे मोती झाले
मनातल्या उन्हात वायूलहर झुले
मंद गंधाचे दर्वळ दूरदूर पसरले
मनातले ऊन असेच राहू दे कोवळे
मध्यान्हीच्या तीव्र धगीपासून मोकळे....!!!
-अनामिक

Saturday, February 25, 2012

प्रेम म्हणजे


प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला तरी
मनाला त्याची खंत नाही
प्रेम म्हणजे बंधन
... प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून इतरांसाठी सुवासणारं चंदन
कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला
कधी कधी ती भेटचं घडावी लागत नाही
प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या चेहऱ्यावर
उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो
प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते
-अनामिक

Friday, February 24, 2012

आता तरी हसून घे


आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

माहीत आसते सर्वाना फुलणारे
फूल हे सुकनारेच असते
किती ही ते जपले तरी

कोमेजनारच असते
आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काही बरोबर आणलेल नसत
काही बरोबर नेता येत नाही
इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला
क्षणभर सुख ही देता येत नाही
देण्यात ही सुख आसते
ईतके तरी समजावून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

काहीच आपल्या हातात नसत
काहीच आपण करत नाही
किती ही योजना आखल्या
तरी तसे काही घडत नाही
कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे

कोणावर तरी प्रेम कर
आपला त्याला मानून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे

तुला काय वाट ते तूच
सारे करत आसतेस
नशिबात जे आसते तसेच
सारे घडत असते
मीळतय जे आत्ता तुला
ते तर उपभोगून घे

काळजी सोड नशिबवर स्वत:वर हसून घे
शहाणपण ठेव बाजूला
मनप्रमाणे जगून घे

आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे

कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे.....
-अनामिक 

Thursday, February 23, 2012

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
दूर जरी तू तिथे हितगुज मी साधतो

अंतरीची ओळख सखी पाउल इथे रेंगाळते
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो

तू तिथे तृप्तीचे श्वास घ्यावेत
... ... अन त्या श्वासांनीही इथे मी तृप्त व्हावे

आयुष्याची वाटचाल एकटयानेच चालायची असते
हा विचार करायलाही मला सोबत तुझी हवी असते

आपले कुणीतरी असावे थोडेसे गालात हसणारे
रडल्यावरही रागावणारे आणि नकळत डोळे पुसणारे

तुझे आश्वासक डोळे खूप दिलासा देऊन जातात
तुझ्या पाउलवाटेवरहि मी तुझा सोबती आहे

हे खरे खरे सांगून जातात...
-अनामिक

Sunday, February 19, 2012

शोध बापातल्या 'बाबाला'

शोध बापातल्या 'बाबाला'

(अनेकदा आई स्वत:च्या भावना शब्दांतून व्यक्त
करते पण व...डिलांना ते फारसे जमत नाही त्यामुळे
बहुतेकदा आईच सर्वश्रेष्ठ ठरली जाते पण बाबाही तितकेच महत्वाचे असतात .
सायकल ,पोहणे या सारख्या गोष्टी आईपेक्षा बाबा जास्त
शिकवतात ,,,पण कितीस लक्षात घेतलं जात
हे ..???
त्यांच रागवण दिसत पण प्रेम करणं नाही ...विशेषता तारुण्यात प्रवेश करणारया मुलांच्या (मुलगे)नि त्यांच्या वडिलांच्या नात्य...ात दरी पडताना दिसून येते बऱ्याचदा...याच उद्देशाने मुलाना उद्देशून लिहिली आहे ही कविता )

पहिला स्पर्श तुझा,
त्याला पुलकित करतो
मग केवळ तुझ्याच ,
भविष्यासाठी जो जगतो
तो बाप असतो ...!!!

शब्दांत व्यक्त होण
जमत नाही ज्याला
तू आजारी असताना
वेदना होते पण काळजाला
कारण तुझीच चिंता असते रे बापाला ...!!!

नापास झाल्यावर दिलाही
असेल जरी पाठीत धपाटा
सांग पण त्याने कधी
झाला का रे तुझा तोटा ..???
म्हणूनच बापाला समजू नकोस 'छोटा' ...!!!

पहिला आलास शर्यतीत तेव्हा 'माझा छावा 'म्हटला असेल खुशीने त्यानेच नाही तुला, सायकल शिकवली मोठ्या हौशीने तू होताना 'पुरुष' धीर दिलाच असेल
'ना'त्याने ...!!!

चोरून ठेवले असेल
पापाणितल्या 'पाण्याला'
नि पाठीवर हात,
तुझ्या पहिल्या पगाराला
सार्थ जन्माचे तेव्हा वाटले असेल त्याला ...!!!

वर काटे असले तरी गरयासारखे
गोड हृदय असते रे बापाला
गरज असते 'आधाराची '
कधी कधी त्याही 'आधाराला' म्हणूनच न झिडकारता शोध बापातल्या 'बाबाला' 
-अनामिक 

Saturday, February 18, 2012

मामा तुझं गाव



मामा तुझं गाव..
लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं
दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय
इथे शेजारीच राहतो माझा मामा
आणि अलीकडे पलीकडे अश्या दोन मावश्या
एवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि
तेवढीच दूर त्याची गोडी गेली

लहानपणी आठवतंय,
मामाचं गाव सोडून जाताना
त्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला
उर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला

त्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची
कडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा
आणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा

खरं सांगू मामा,
खूप खूप आठवण यायची तुझी
जेव्हा मैलोनमैल लांब होतास
आणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही
आठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही

दुराव्यातला गोडवा तो हाच का
उगाच आलास इतक्या जवळ तू मग
लांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या
पण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या
अगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या...!!!!
-अनामिक

Friday, February 17, 2012

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....!



1)"बघतोस काय ? मुजरा कर .....!"

2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!

3) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

... ... 4)''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

6) १३ १३ १३ सुरूर !

7)"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर"

'अहो, इकडे पण बघा ना...'

9) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'

10) थांब लक्षुमी कुंकू लावते!

11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?

12)"लायनीत घे ना भौ"

13) चिटके तो फटके!

14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

15) अयोध्या,बेळगाव् ,कारवार्,निपाणि ,इंदौर्,गुलबर्ग ा,न्यू जर्सी,ह्युस्टन, सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

16)"बघ माझी आठवण येते का ?"

17)"नाद खुळा"

18)"हाय हे असं हाय बग"

19) आई तुझा आशिर्वाद.

20)"सासरेबुवांची कृपा"

21)"आबा कावत्यात!"

22) पाहा पन प्रेमाणे

23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.

24)"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..

28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

29) गेले ते दिवस राहिल्या त्याआठवणी

30) हेही दिवस जातील

31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा

32) घर कब आओगे?

33) १ १३ ६ रा

34) सायकल सोडून बोला

35) हॉर्न . ओके. प्लीज

36)"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"

37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं

माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा

38) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--

सुसाईड मशिन

मिसगाईडेड मिसाईल

मॉम सेज नो गल्स

39) एका ट्रक च्या मागे लिहले होते:

राजू, चिंटू , सोनू ....!

अणि खाली लिहले होते .....

बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

40) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले:"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"

खाली लिहिले होते....

"ड्रायवर शिकत आहे"(बारीक़ अक्षरात)

41) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे

उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल

42) एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

Thursday, February 16, 2012

वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे



वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे
तुझ्या नाजूक चेहऱ्यावरती स्मिथ हास्य फुलवावे.

करताच स्पर्श तुझ्या अंगी रोमांच उभा राहावा
तुझ्या गुलाबी ओठांचा हळूच स्पर्श व्हावा.

देण्यास आलिंगन हात तुझे पुढे यावेत
आनंदाचे क्षण मिठ्ठीत तुझ्या घालवावेत.

हळूहळू मिठ्ठी तुझी सैल होताना
अश्रू येतात डोळ्यात मी दूर जाताना.

घडेल का असे आवचित कधीतरी
बनूनी वारा मी फिरावे तुझ्या संगती...!!! ♥
- अनामिक

Wednesday, February 15, 2012

जीवन हे मोजकच असतं


जीवन हे मोजकच असतं, 
ते हसत हसत जगायचं असतं, 
जुळलेलं नातं कधी तोडायचं नसतं, 
सुख दुःखाने आयुष्य हे भरलेलं असतं, 
कुठं काही हरवतं तर कुठं काही सापडतं, 
त्यातुनच हरवलेलं शोधायचं असतं, 
पाठ फिरवुन घाबरायचं नसतं, 
कारण आयुष्य हे आयुष्य 
असतं ते सगळ्यांनी जगायचचं असतं। 
-अनामिक

Monday, February 13, 2012

आईचे प्रेम

♥ आईचे प्रेम ♥

जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ......
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
...बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
पण ....... आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस, माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू नाही शकला का :)