Showing posts with label HINDUISM. Show all posts
Showing posts with label HINDUISM. Show all posts

Sunday, March 13, 2011

हिन्दू धर्माचे १६ संस्कार

हिन्दू धर्माचे १६ संस्कार  


माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय,संस्कारीत,विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम,चारित्र्यसंपन्न,सुसंस्कारीत पुरुष निर्माण व्हावे.त्याद्वारे,चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत,बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) :

गर्भाधानो पुंसवनस्सीमन्तो वैष्णवोबलिः।
जातकं नाम निष्क्रामोऽन्नप्राशनं चोलकर्म च॥
उपनीती महानाम्नी महाव्रतमनुत्तमम्।
उपनिषच्च गोदानं समावर्तनमेव च।
विवाहश्चेति संस्काराः षोडशैताः प्रकीर्तिताः॥

गर्भाधान:

गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होउन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतती होते, असा समज आहे.

या दिवशी स्त्रीला सुशोभीत आसनावर बसवितात,ओवाळुन औक्षवण करतात.तिने चांगले दागीने,फुलमाला,(गजरा)इ.परीधान करावे.नंतर, पतीशी मिलन करावे.

पुंसवन :
कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसर्‍या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.

अनवलोभन
:
पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे.हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर चौथ्या महिन्यात करावा.


सीमंतोन्नयन:

जातकर्म:
 पित्याने, कन्या/पुत्र झालेला असे ऍकताच त्या काली अंगावरच्या वस्त्रासहित सचैल स्नान करावे आणि नाभीच्छेदनापुर्वी हा संस्कार करावा असे मत आहे.

नामकरण:
जन्मदिवसापासून १०वे/१२वे दिवशी अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. अन्यथा शुभदिवशी, शुभवारी, शुभयोगावर नामकरण करावे.नक्षत्राच्या अवकहडा चक्राप्रमाणे, जन्मनक्षत्राचे चरणाक्षर घेउन,त्यावर सुरु होणारे नाव, मुलाच्या उजव्या कानात तर मुलीच्या डाव्या कानात सांगावे. त्यावेळेस मंगल वाद्ये वाजवावित. हे जन्मनाव होय. व्यावहारीक नाव वेगळे.ते शुभ असावे. देवतावाचक, नक्षत्रवाचक, इ.चांगले नाव ठेवावे. नावात ऋ,लृ हे स्वर वर्ज्य करावे. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे.

सूर्यावलोकन:

निष्क्रमण:

अन्नप्राशन:
जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे.देवतांची पूजा, होम करून व दही,मध,तुप यांनी युक्त अन्न/ खिर बालकाला द्यावी.

वर्धापन:
जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.

चूडाकर्म:
चूडाकर्म हा हिंदू सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. यास मुंडनसंस्कार असेही म्हटले जाते.मुलाच्या वयाच्या पहिल्या किंवा तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करण्याचा संकेत आहे. या संस्कारामागे शुचिता आणि बौद्धिक विकास ही संकल्पना आहे. या संस्कारामुळे जन्माच्या वेळी उगवलेले डोक्यावरील अपवित्र केस काढून टाकले जातात. नऊ महिने आईच्या गर्भात राहिल्याने जन्मतः उगवलेले केस दूषित मानले जातात. चूड़ाकर्म संस्कारामुळे हे दोष दूर होतात. वैदिक मंत्रोच्चारांसोबत हा संस्कार संपन्न होतो.

अक्षरारंभ:
बालकाला वयाचे पांचवे वर्षी उदगयनात सुर्य असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा.योग्य दिवशी व वारी, शुभ योग,शुभ पक्ष इ.बघुन सुरुवात करावी. या वेळी,गणपती,लक्ष्मी,नारायण,सरस्वती,आपला वेद,गुरु, ब्राम्हण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे.सर्वप्रथम,ओम् कार लिहुन मग दुसरी अक्षरे लिहावी.

उपनयन:
मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होउन स्वत:च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे. धर्म/जातींविषयी निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहे.

समावर्तन:
यास सोडमुंज असेही म्हणतात.उपनयनास जो काल प्रश्स्त आहे, त्याकाली समावर्तन करावे.


हिंदू धर्मात विवाहास सोळा संस्कारांतील एक संस्कार मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू विवाह या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नीं‍ यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नीं‍दरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व ध्रुव तार्‍यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्नीं‍मधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.

हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास चार आश्रमांत (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.

अंत्येष्टि:
द्वि व त्रिपुष्कर योग,पंचक,इ.कुयोग बघुन,त्यानुसार,संमतविधी करून दहनविधी करावा.वर्ज वार व वर्ज नक्षत्रे बघून अस्थीसंचय करावा.त्यानंतर दहा दिवसाचे आंत,तिर्थात नेउन टाकव्या.नंतर, श्राध्दविधी करावा.

Saturday, September 11, 2010

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी 


आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.


पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली

Friday, September 10, 2010

विठोबा

विठोबा


विठोबा म्हटले की दोन्ही होत कमरेवर ठेवून वीटेवर उभे असलेले सावळे ध्यान
डोळ्यापुढे येते. पण या संकल्पनेला छेद देणारी चार हातांची आणि मिशी असलेली
विठ्ठलमूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान येथे आहे. संशोधकांच्या अभ्यासाचा
विषय ठरलेली ही अनोखी विठ्ठलमूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती असल्याचे
सांगितले जाते.
.....................

ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाश्यापासून अवघ्या १२ मैलावर
एक छोटेखानी गाव आहे, टाकळीभान नावाचे. या गावात एक साधेसुधे विठ्ठलमंदिर आहे.
पण यातील मूर्ती थेट यादवकाळाशी नाते सांगणारी. विठ्ठल या देवतेच्या उगमाचा शोध
घेणारी... जगभरातल्या इतर मूर्तीपेक्षा संपूर्णतः वेगळी.
या मूर्तीमध्ये विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कमरेवर आहेतच. पण तिला आणखी दोन
हात असून त्यातील एका हातात शंख तर दुस-या हातात चक्र आहे. एवढेच नाही तर या
विठ्ठलाला मिशाही आहेत. विठ्ठलाचे विष्णूरुपात घडणारे हे दर्शन अन्यत्र कुठेच
का होत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
यादवकाळात भानू नावाच्या राजाची टाकळीभान ही राजधानी होती. मुळातच
गवळी-धनगरांचा लोकदेव असणारा हा विठ्ठल या यादवकुलीन राजाचे कुलदैवत. या भानू
राजाला विठ्ठलाने विष्णूरुपात दर्शन दिले अशी लोककथा मंदिराचे पुजारी राजेंद्र
भागवत सांगतात. मंदिरातील पुजेची जबाबदारी असणारी त्यांची ही सातवी पिढी आहे.
पण मंदिर त्याच्याही आधीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अहमदनगरच्या वस्तुसंग्रहालयाचे संचालक असणा-या सुरेश जोशी यांनी या विठ्ठलावर
संशोधन केले. ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनीही आपल्या पुस्तकात या
विठ्ठलमूर्तीचा उल्लेख केलाय. ते म्हणतात, की गवळी-धनगरांचा लोकदेव असणा-या
विठ्ठलाला यादवकुळातील राजांनी विष्णु-कृष्णरूप प्राप्त करून दिले. त्यामुळे
विठ्ठलस्वरुपाच्या घडणीच्या विचारात टाकळीभानच्या चतुर्भुज मूर्तीचा अभ्यास
महत्त्वपूर्ण ठरतो.

विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती माळ असून जानवेही कोरलेले आहे. कमरेवर मेखला असून
तिने दुटांगी धोतर नेसले आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर शाळुंकेसह शिवलिंग आहे.
त्यामुळे शिव-विष्णूच्या समन्वयाच्या प्रक्रियेत ही मूर्ती घडली असल्याचे
स्पष्ट होते. पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे इथे मकरकुंडले नाहीत. तसेच पंढरपूरात
जशी रुख्मिणी रुसून लांब राहिली आहे, तशी इथे नाही. इथे ती विठ्ठलाच्या बाजुलाच
उभी आहे. या सा-या वैशिष्ट्यांमुळे विठ्ठलाच्या आद्यमूर्तींमध्ये या मूर्तीचा
संदर्भ टाळता येत नाही.


सर्वात मुख्य म्हणजे ज्या संतांच्या रचनांनी आपण विठ्ठलाची उपासना करतो त्यातील
अनेक संतांनी विठ्ठलाच्या या चतुर्भुज रुपाचे वर्णन केले आहे. त्यामुळे हे
चतुर्भूज रूप संताना माहित होते असे म्हणण्यास जागा आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
संत भेटी अजि मज ।
तेणे जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थळी सहज ।
दोन्ही सुक्ष्मी वाढल्या ।।
संत नामदेव म्हणतात,
चतुर्भुज विठ्ठल । कै देखोन डोळा ।।
भक्तांचा जिव्हाळा । जीव माझा ।।
संत बंका महाराज म्हणतात ,
कर कटावरी । पाऊले साजरी ।।
शंख चक्र करी । मिरवले ।।
संत तुकाराम म्हणतात,
शंख चक्रांकित भूषणे ।
जडीत मेखला चिद्ररत्नाने ।
पीतांबरी उटी शोभे गोरेपण ।
लोपले तेणे रवितेज ।।
संतांनी वर्णलेल्या या रुपाची विठ्ठलमूर्ती असेल की हे त्यांच्या भावविश्वातील
विठ्ठलाचे वर्णन आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. पण तरीही हा चतुर्भूज विठ्ठल
काहीतरी वेगळे सांगत टाकळीभानमध्ये वर्षानुवर्षे उभा आहे एवढे मात्र निश्चित.
पंढरपूर्वकाळात महाराष्ट्र-कर्नाटकात विठ्ठलोपसना सुरू होती. परंतु अशा
प्रकारचे चतुर्भूज रूप कुठेही आढळत नाही. मध्य प्रदेशातील भेलसे येथे उदयगिरी
लेण्यात अशा प्रकारची एक मूर्ती सापडते. इ.स.४१०-१६ च्या आसपासची ही भेलसे
येथील मूर्ती विठ्ठलाशी कसे नाते सांगते हे अद्याप उलगडलेले नाही. पण
विठ्ठलाच्या उत्क्रांतीत पंढरपूरचे महात्म्य वाढत गेले आणि हे चतुर्भूज ध्यान
लोप पावले असे मत जोशी यांनी व्यक्त केले आहे.


विठ्ठल या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नाही. त्याच्या पंढरपूरनिवासाआधी तो
कसा उत्क्रांत झाला त्याचा शोध अद्यापही संपलेला नाही. त्यामुळेच विठ्ठलाचा
अभ्यास करणारे अनेक देशी-विदेशी संशोधक या मूर्तीचा अभ्यास करताहेत. कदाचित या
अभ्यासातून विठ्ठलाच्या या रुपाचे कोडे उलगडू शकेल.
नाम्याची खीर चाखणारा, चोखोबाची गुरे राखणारा, जनाईचे दळणकांडण करणारा आणि
कोट्यवधी वारक-यांचे श्रद्धास्थान असलेला विठोबा सर्वत्र दोन हातांच्या मानवी
रुपात दर्शन देतो. पण इथेच असा त्याच्या परमेशरुपात का बरं उभा आहे ? याचे
संशोधन फक्त विठ्ठलाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासावार प्रकाश टाकेल.
कारण शेवटी दगडातला देव त्याला घडवणा-या माणसाची गोष्ट सांगतो, हे विसरता येत
नाही.

Thursday, September 9, 2010


सिद्धिविनायक, प्रभादेवी


महागणपती, टिटवाळा

 
पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्यभाविकांचं श्रद्धास्थान आहेइथे आल्यावर लग्न जुळतं अशी एकसार्वत्रिक श्रद्धा आहे.


उद्यान गणेश, शिवाजी पार्क


गिरगाव गणेश, फडकेवाडी

मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहावर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचंश्रद्धास्थान.

वजिऱ्याचा गणपती, बोरिवली


बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका 
शिलेत हास्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिकाभक्तांच्या गर्दीचंठिकाण.

वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व



मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवतगेली सत्तर वर्षअंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय.

फडके रोड मंदिर, डोंबिवली

                                    
पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिरतुलनेने 
खूपच नवं असलंतरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.

 फडके रोड मंदिर, डोंबिवली


डोंबिवलीचं हे ग्रामदैवतयाच्या साक्षीने मराठी माणसाने डोंबिवलीतसाहित्य-संस्कृतीची ध्वजा फडकवलीनववर्षाच्या प्रसिद्धस्वागतयात्रेची सुरुवात इथूनच.