Monday, March 28, 2011


पहाट नहाली दवाच्या कुशीत, रात्र विरघळे रेशमी मिठीत |
लडीवाळ पणे म्हणालीस की झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर,दूर जाणे तरी मला ना मंजूर ||

Sunday, March 27, 2011

सांजवेळ आहे सखे


सांजवेळ आहे सखे...

ही सांजवेळ आहे सखे, भेटायला ये न जरा...
माझ्यासवे पावसात, भिजायला ये न जरा..||

आभाळाची लाली तुझ्या गाली जेव्हा उतरेल..
लाजताना पाहून तुला संध्याही लाजेल...|
गालांवर जो रक्तिमा, रानामध्ये पसरेल....
रक्तीम्याच्या सान्निध्यात, भेटायला ये ना जरा....||
सांजवेळ आहे सखे...

आवेगाने अशी ये, जशी उसळवी लाट...
किनार्याशी तेव्हा तुझी घडेल भिजलेली भेट...|
भिजलेले अंग तुझे भिजवेल माझी वाट....
प्रेमाचिया वाटेवर सोबतीला ये ना जरा...||
सांजवेळ आहे सखे...

भेटू दोघे असे काही, भिजू दोघे असे काही...
वियोगाच्या काळाची, थांबेल होणे लाही लाही...|
भेटू असे जसे काही, पुन्हा भेट होणे नाही...
अशा क्षणी आता सखे, येच भेटायला जरा...||
सांजवेळ आहे सखे...
-अनामिक 

Thursday, March 24, 2011

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा मनस्थितीत असणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास...
-अनामिक

Monday, March 21, 2011

मराठी हास्यकट्टा 27

मराठी मुलाचे मुलीला प्रपोज ..

मुलगा : शब्द तुझे, गीत माझे....
जीवन गाणे गाऊ का ?

मुलगी : गाल तुझे, हात माझे....
कानाखाली लाऊ का ?

*********************
एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
पहिली बाई : तुम्ही गहू कसा आणला?
दुसरी बाई : पिशवीतून आणला.
पहिलीबाई : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई : चुलत भावाने आणला.

*********************

एकदा एक माणूस समुद्रा काठी उभा असतो.
एक प्रचंड मोठी लाट येते आणि त्या माणसाला म्हणते - चल माझ्या बरोबर....
आणि तो जातो.......का ?
कारण....पाण्याला कधी नाही म्हणू नये.

*********************
एकदा एक तरुण हॉटेल मध्ये जातो. त्याला तिथला वेटर विचारतो............. 'साहेब, काय आणू ? साधा डोसा ,मसाला डोसा, पेपर डोसा....? गृहस्त : सध्या तरी मला फक्त आडोसा हवाय, माझ्या दोन मैत्रिणी एकदम मला शोधताहेत!
*********************
पुणेरी झटका
एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि
एका पुणेरी माणसाला विचरतो - अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ?
पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल.

*********************

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.
साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.
बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय.. काहीच कळत नाहीय.

*********************

बाबा-आजचा पेपर कसा सोडवलास ?
मुलगा-पहिला प्रश्न राहून गेला,
तिसरा प्रश्न येत नव्हता,
चौथा प्रश्न सोडवायचा विसरून गेला,
पाचवा प्रश्न दिसलाच नाही...म्हणून तो पण राहिला.
... ......बाबा रागाने...,
आणि प्रश्न दुसरा ???
मुलगा-बास......फ़क्त तोच चुकला !!!!!

*********************
एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.
यक्ष : सांग बाळा...कुठच्याही तीन इच्छा सांग.
नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला हवा.
यक्ष : तथास्तु.
नेपाळी : त्यात एक खूप-खूप श्रीमंत माणूस राहावा.
...नेपाळी : आणि त्या बंगल्याचा गुरखा म्हणून फक्त माझी नेमणूक व्हावी.

*********************
पु . लं. देशपांडे यांचे विनोदी किस्से

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

*********************
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."
*********************

Sunday, March 20, 2011

होळी

रंगपंचमी !! 

लाल,गुलाबी,निळा ,पिवळा
राधे यात तुझा रंग खुळा
ये अशी भिजून जा माझ्यासवे
रंगवतोय तुझ कृष्ण निळा

...लपशील अशी कुठवर सखे
न खेळता होयील विरंगगुळा
नको करू वोढाताण अशी
तुटून जायील तो हिरवा चूडा

जा कृष्णा मज नको छेडू
तू निळा माझा रंग गोरा
गोपिका माझ्यासंगे
आम्ही जिरवू तुझा तोरा

उधळू रंग असे कृष्णा
तू करशील पोबारा
रंगणे तुझे आम्हाकडून
बघेल गोकुळ सारा

जा जा राधे तू पळशील कुठवर
आज ना सोडणार तुला
प्रेम रंगाचे रंग घेवून मी
ये अशी झुलवू हा प्रेम झुला

ना ना कृष्णा तू सोड मला
पहा नको करू हा गुन्हा
राहू दे प्रेम रंग असाच आपला
मी गोरी राधा तू निळा कान्हा.
-अनामिक

मुलीचें जिवन..

मुलीचें जिवन..


मला आजही आवडते
ती नववारी साडी..........

मस्त नटून मिरवायला
कानात बुगडी घालून
... ... आवारात हिंडायला
नाकात नथनी सारखी-सारखी
बाजूला सारून बोलायला
गळ्यात तो लक्ष्मी हार
रुबाबात चमकत फिरायला
कपाळी छान कुंकू भरायला
आणि समारंभात घुटमळायला
सारखे पाहुण्यांच्या पुढे पुढे
करायला आजही आवडते
केसांत अबोली माळून
अबोलतेनेच हसायला ..........

मला आजही आवडते
ती नववारी साडी................
        देव पेडणेकर(१६/०३/२०१२--११.१५)

Saturday, March 19, 2011

मनः शांती - संत एकनाथांची एक कथा

मनः शांती - संत एकनाथांची एक कथा

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .

एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.

काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.

जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"

तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."

एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,

"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."

Sunday, March 13, 2011

पु . लं. देशपांडे यांचे विनोदी किस्से

त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
------
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ." --------

एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी
सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही
ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
--------

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी
सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं
मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना!
आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही
माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती
'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!" -------------
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी

सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं
मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना!
आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही
माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं
असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती
'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

----------
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत.

हिन्दू धर्माचे १६ संस्कार

हिन्दू धर्माचे १६ संस्कार  


माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय,संस्कारीत,विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम,चारित्र्यसंपन्न,सुसंस्कारीत पुरुष निर्माण व्हावे.त्याद्वारे,चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत,बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) :

गर्भाधानो पुंसवनस्सीमन्तो वैष्णवोबलिः।
जातकं नाम निष्क्रामोऽन्नप्राशनं चोलकर्म च॥
उपनीती महानाम्नी महाव्रतमनुत्तमम्।
उपनिषच्च गोदानं समावर्तनमेव च।
विवाहश्चेति संस्काराः षोडशैताः प्रकीर्तिताः॥

गर्भाधान:

गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होउन स्त्री चे गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे.रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतती होते, असा समज आहे.

या दिवशी स्त्रीला सुशोभीत आसनावर बसवितात,ओवाळुन औक्षवण करतात.तिने चांगले दागीने,फुलमाला,(गजरा)इ.परीधान करावे.नंतर, पतीशी मिलन करावे.

पुंसवन :
कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसर्‍या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.

अनवलोभन
:
पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे.हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर चौथ्या महिन्यात करावा.


सीमंतोन्नयन:

जातकर्म:
 पित्याने, कन्या/पुत्र झालेला असे ऍकताच त्या काली अंगावरच्या वस्त्रासहित सचैल स्नान करावे आणि नाभीच्छेदनापुर्वी हा संस्कार करावा असे मत आहे.

नामकरण:
जन्मदिवसापासून १०वे/१२वे दिवशी अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. अन्यथा शुभदिवशी, शुभवारी, शुभयोगावर नामकरण करावे.नक्षत्राच्या अवकहडा चक्राप्रमाणे, जन्मनक्षत्राचे चरणाक्षर घेउन,त्यावर सुरु होणारे नाव, मुलाच्या उजव्या कानात तर मुलीच्या डाव्या कानात सांगावे. त्यावेळेस मंगल वाद्ये वाजवावित. हे जन्मनाव होय. व्यावहारीक नाव वेगळे.ते शुभ असावे. देवतावाचक, नक्षत्रवाचक, इ.चांगले नाव ठेवावे. नावात ऋ,लृ हे स्वर वर्ज्य करावे. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे.

सूर्यावलोकन:

निष्क्रमण:

अन्नप्राशन:
जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे.देवतांची पूजा, होम करून व दही,मध,तुप यांनी युक्त अन्न/ खिर बालकाला द्यावी.

वर्धापन:
जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.

चूडाकर्म:
चूडाकर्म हा हिंदू सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. यास मुंडनसंस्कार असेही म्हटले जाते.मुलाच्या वयाच्या पहिल्या किंवा तिसर्‍या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करण्याचा संकेत आहे. या संस्कारामागे शुचिता आणि बौद्धिक विकास ही संकल्पना आहे. या संस्कारामुळे जन्माच्या वेळी उगवलेले डोक्यावरील अपवित्र केस काढून टाकले जातात. नऊ महिने आईच्या गर्भात राहिल्याने जन्मतः उगवलेले केस दूषित मानले जातात. चूड़ाकर्म संस्कारामुळे हे दोष दूर होतात. वैदिक मंत्रोच्चारांसोबत हा संस्कार संपन्न होतो.

अक्षरारंभ:
बालकाला वयाचे पांचवे वर्षी उदगयनात सुर्य असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा.योग्य दिवशी व वारी, शुभ योग,शुभ पक्ष इ.बघुन सुरुवात करावी. या वेळी,गणपती,लक्ष्मी,नारायण,सरस्वती,आपला वेद,गुरु, ब्राम्हण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे.सर्वप्रथम,ओम् कार लिहुन मग दुसरी अक्षरे लिहावी.

उपनयन:
मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होउन स्वत:च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे. धर्म/जातींविषयी निरपेक्षता/उदासीनतेचा हा प्रभाव आहे.

समावर्तन:
यास सोडमुंज असेही म्हणतात.उपनयनास जो काल प्रश्स्त आहे, त्याकाली समावर्तन करावे.


हिंदू धर्मात विवाहास सोळा संस्कारांतील एक संस्कार मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू विवाह या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नीं‍ यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नीं‍दरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व ध्रुव तार्‍यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्नीं‍मधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.

हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास चार आश्रमांत (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे.

अंत्येष्टि:
द्वि व त्रिपुष्कर योग,पंचक,इ.कुयोग बघुन,त्यानुसार,संमतविधी करून दहनविधी करावा.वर्ज वार व वर्ज नक्षत्रे बघून अस्थीसंचय करावा.त्यानंतर दहा दिवसाचे आंत,तिर्थात नेउन टाकव्या.नंतर, श्राध्दविधी करावा.

Saturday, March 12, 2011

Tuesday, March 8, 2011

जागतिक महिला दिन

                                                       जागतिक महिला दिन विशेष!!
 
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचं आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पसार झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.

Sunday, March 6, 2011

Wednesday, March 2, 2011

महाशिवरात्र

                                                                                 महाशिवरात्र !!
                    || श्री जटाशंकर प्रसन्न ||



'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.

'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो.

गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबो‍धले जाते.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो.

शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.

सौजन्य:महाशिवरात्र 
 मराठी शुभेच्छापत्रे 

Tuesday, March 1, 2011

खंत

खंत

आसवांचे केव्हढे उपकार झाले ,
मारेकरी कणवेस साक्षीदार झाले !

( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र
कणवेस पात्र ठरला !)

जाधवांचे दु:ख जाणावे कसे?
साथ ते सोडून .....दावेदार झाले !

( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले,
आणि हात जायबंदी असल्याने समोर बंदूक असूनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही हा
आपल्याच त्या साथीदारांचा दावा असल्याची खंत आजही जाधवांच्या डोळ्यात जाणवते !)

बघ पुन्हा झाले निखारे शांत आता ,
कालचे ते शेंबडे....."सरदार" झाले !

( ज्या कारणासाठी असमर्थपणे राजीनामा द्यावा लागला , तेच आज परत त्याच पदावर
आले ! लोक पण हे सारे विसरले , एकदा "शहीद" अशी पदवी दिली आणि हारतुरे घातले की
आपले - माझे-तुमचे सार्‍यांचेच कर्तव्य संपले , इतकीच आमच्या निखार्‍यांची धग
असावी ना?)

चिलखते चोरीस केंव्हाचीच गेली ,
बार म्हणुनी फुसकेसुद्धा.....दमदार झाले !

(काही स्पष्टीकरण आवश्यक आहे का यावर?)

अफझल्या बघ आपल्या गुर्मीत आहे
रुतंबरा सारखे ...."गद्दार" झाले !

( आमची माणसे मारून अफझल अजून जीवंत आहे आणि चिथावण्या दिल्या वगैरे आरोप ठेवून
आमचीच माणसे साध्वी रुतंबरा सारख्या लोकांना जातीवादी आणि गद्दार ठरवले जाते
आहे !)

हाय ! झाकोळून गेले तेज अन.....
चेहेरे पुन्हा, अळणी , कसे ?.....चवदार झाले !

( जे शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी काय गमावले ? चार पैसे
फेकून सगळीकडे या मागे राहिलेल्या माणसांची जाहिरात करून आपलीच पाठ थोपटत सारे
वर्तमान्पत्र वगैरे तथाकथित "मीडिया"वाले मात्र "थंडा"वले ! )

दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
....स्मारकांचे बस् इथे हक्क्दार झाले !

(छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम रयतेसाठी , एका दीन माणसासाठी कधीही "राजा"
असून ऐश्वर्याचा उपभोग घेतला नाही ! अश्या या "श्रीमंत योगी" महाराजांचे "
स्मारक" बनवण्यासाठी कोट्यानोकोटी रुपये खर्च करणे ....हा एव्हढाच हक्क आता
छत्रपतींचा एका साध्या रहाणीच्या भारतीय माणसावर राहिला हा केव्हढा
दैवदुर्विलास !)

उदय गंगाधर सप्रे-ठाणे