Tuesday, January 29, 2013

गडद जांभळं भरलं आभाळ

                                                              
 गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अरुण इंगळे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)

Monday, January 28, 2013

ई साहित्य कथा विभाग


ई साहित्य कथा विभाग 


शो-पीस (कथा संग्रह) ~ अरुण वि देशपांडे 
October 29, 2012
------------------------------
अनंतराव एक लोकप्रिय हेडक्लार्क म्हणून विख्यात होते. याचे रमाबाईंना भारी कौतुक होते ... त्यापेक्षा काकणभर जास्त अभिमान होता.
नवर्याच्या आवडींना जपणे, लक्षात ठेवून त्या पुरवणे, - असा प्रेमळ स्वभाव असणार्या रमाबाईंनी इथल्या नव्या नव्या वातावरणात पलटी का मारली असेल? अनंतरावांना काही कळेनासे झाले.
Download 
 ईबुक  @ http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/e_book_showpiece.pdf



------------------------------

विषामृत (कथा संग्रह) ~ आनंदिनी
July 28, 2013 



या सर्व कथा यातील पात्रे काल्पनिक आहेत. पण त्यातील नाती जसे सासू सून , नवरा बायको , आई बाळ , त्यातल्या पक्क्या गाठी , त्यातले प्रेम काल्पनिक कसे असू शकते.. 



------------------------------


------------------------------

वाचकांच्या प्रतिक्रिया :


मराठी कथा फारच छान आहे, कथा एकदम दर्जेदार आहे
---संजय गोखले
------------------------------

पुस्तक वाचायला साधारण विस मिनिटे लागली .प्रयत्न चांगला आहे अजून कथेत सकसपणा आणता आला असता .पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा 
---आनंद खेर
------------------------------




“आभास हा” : लेखक मंदार कात्रे. 
October 1, 2013
------------------------------
हे मंदार कात्रे अर्ध्याहून अधिक काळ परदेशात असतात. आणि परदेशी नोकरीच्या आकर्षणात मराठी मुलांची कशी कशी फ़सवणूक होते त्याचे सत्य अनुभव म्हणजे हा कथासंग्रह” आभास हा”. 

------------------------------
Ebook download @ http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhas_haa.pdf

--------------------------------------------------
वाचकांच्या प्रतिक्रिया :

नमस्कार
आपला कथासंग्रह आभास हा नुकताच वाचला ,मला मनापासून यातल्या कथा पात्रे
संवाद आणि प्रसंग आवडले . आभास हा कथेतील चंदू किंवा चकवा कथेतील आशिष
म्हणा किंवा वेंकट अय्यर या व्यक्ती समाजात आजूबाजूला दिसत असतात जाणवून
येतात . पण भूलभुलैया मधील विश्वकर्मा ,सलील देशमुख डॉन कथेचा नायक
,अवलिया चंदू या खरोखरच फार भयानक भीषण वाटाव्या अशा प्रसंगातून गेलेल्या
दिसतात . नातेवाईक मित्र मंडळी परदेशात स्थायिक असतात नोकरी करत असतात पण
अस काही घडत असेल याची वरवरदेखील कधी कल्पना येत नाही ,पेपरमधून अधून
मधून अशा गोष्टी वाचायला मिळतातच "नार्वे सरकारने लहान बाळ ताब्यात घेणे
,ऑस्ट्रेलिया चीन मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्रास" पण हे सगळ वाचले
जाते आणि सुटून जाते . आपल्या या साऱ्या कथांमधून हे प्रसंग प्रत्यक्ष
अनुभवणारी व्यक्ती कोणत्या विचारसरणीतून कोणत्या मानसिक स्थितीतून जाते
आहे हे खरच समजून येते . वाचताना प्रत्येक कथेशी एक भावनिक नाळ जोडली
जाते . शेवटी जात पात धर्म लिंग भाषा रेहन सेहन वेश देश या साऱ्या सीमा
ओलांडून पुढे गेले तरी आयुष्य नावाची गोष्ट समोर येत राहते आणि त्याला
न्याय "चांगुलपणा आणि माणुसकी " नावाचीच गोष्ट देत राहते ,आपल्या कथा
वाचताना मला पुन्हा पुन्हा हेच जाणवले .
आपले मनापासून अभिनंदन आणि सदिच्छा

----कविता मोकाशी ,मिरज
---------------------------------------






अंतरीच्या गूढगर्भी
December 12, 2013


लेखक ~ संकल्प आभाळे. 
कथासंग्रह
________________________________________
वाचकांच्या प्रतिक्रिया :

संकल्पच्या कथांबद्दल प्रसिद्ध कवी संदिप खरे म्हणतात, “ संकल्पच्या कथा या जगण्याला संवेदनशील हातांनी स्पर्श करणार्या कथा आहेत. आयुष्यातल्या बारिकसारिक घडामोडींचा, नातेसंबंधांचा आणि अनुभवांचा त्या वेध घेऊ पहातात. ... आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी आणि जिवंत मनाने संकल्प पहातो...”
________________________________________
Ebook download @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/sankalpa_abhale_11_dec_cute.pdf
________________________________________


#esahity

ध ध ध ध धमाल विनोदी #कथासंग्रह
January 28, 2014
भव्य दिव्य अवाढव्य : विजय काचरे
____________________________
Ebook download http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/bda_bhavy_divy_awadhavya.pdf
_____________________________

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
Subscribe More Ebook @ esahity@gmail.com
ई साहित्य प्रतिष्ठानची सर्व ई पुस्तके विनामूल्य असतात.

Saturday, January 26, 2013

Monday, January 14, 2013

मकरसंक्रांत SMS

मकरसंक्रांत SMS

                  

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!


हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


मांजा, चक्री…
पतंगाची काटाकाटी…
हलवा, तिळगुळ, गुळपोळी…
संक्रांतीची लज्ज्त न्यारी…
पतंग उडवायला चला रे….!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


आठवण सुर्याची,साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,मणभर प्रेम,
  गुळाचा गोडवा,ऋणानुबंध वाढवा...!!!
       !!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!







Tuesday, January 8, 2013

RIght TO Recall - राईट टू रिकॉल प्रस्तावित कायदा


राईट  टू रिकॉल प्रस्तावित  कायदा
(RIGHT TO RECALL) 


RIGHT TO RECALL - MARATHI.pdf

मराठी भाषांतर : विद्या