Tuesday, January 31, 2012

लव्हलेटर.....

लव्हलेटर.......

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं
लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं

सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं


वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युटबर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं


५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचंसगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!
लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं

लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं

तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं.

Sunday, January 29, 2012

Monday, January 16, 2012

कारण हे वयच असं असतं

कारण हे वयच असं असतं....


कारण हे वयच असं असतं....
 पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते..
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते....
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात...
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात...
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं.....

कुठून येतं फुलपाखरू??
कुठे निघुन जातं ??
चिमटीत उरतो रंग
तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं....
भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....कारण हे वयच असं असतं....

सप्तरंगी स्वप्नांचे दिवस..
वाऱ्यासारखे निघून जातात..
जगाने दिलेल्या जखमांवर..
हळूवार फुंकर घालतात..
जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..?
कारण हे वयच असं असतं..
-अनामिक

Friday, January 13, 2012

मराठी हास्यकट्टा 44

नाद खुळा Google चा ::
सोनू -आज मला खूप मार पडला.
मोनू- का?
सोनू- शेजाऱ्यांचा मुलगा हरवला.
मोनू- मग तू काय केलं?
सोनू- मी त्यांना सांगितलं गुगलवर सर्च करा सापडला तर डाउनलोड करा!

******************

नवरा बायकोला :

ना कजरे कि धार

ना मोतियोके हार

ना कोई किया सिंगार

फिर भी कितनी सुंदर हो
:
:
:
बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून
******************
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो पण आता त्याने नामी युक्ति काढलिय तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो " दया दरवाजा तोड दो " आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो.. :)

******************
एक चित्ता सिगारेट ओढत होता !
१ उंदीर म्हणाला -"माझ्या बंधू सोड हि नशा , माझ्या सोबत ये , बघ हे जंगल किती सुंदर आहे ."
चित्त्याने विचार केला ,आणि उंदरा सोबत निघाला .
पुढे हत्ती ड्रग्स घेताना दिसला
उंदीर -"हत्ती माझ्या मित्र सोड हि नशा ...."
हत्ती सुद्धा सोबत निघाला
पुढे १ वाघ विस्की चा पेग बनवत होता ,
उंदीर त्याला तेच म्हणाला ...
वाघाने ग्लास बाजूला ठेवला , उंदराच्या ५ -७ कानाखाली वाजवल्या ..
हत्ती -"अरे उंदीर चांगला सांगतोय का मारलेस बिचार्याला ?"
वाघ -"हा जेव्हा जेव्हा देशी पितो ...तेवा असेच बोलतो , ३ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय मी याच्यासोबत !!!"

******************
बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.
******************

प्राध्यापक साठे घाईघाईने वर्गात आले आणि पुस्तक उघडून त्यांनी विचारले, ‘तर मी काल कुठ आलो होतो ?’
‘इथच या वर्गात सर !’ एका मुलाने उत्तर दिले.

******************
"मुलगा- तुझी खुप आठवण येत होती. म्हटलं फोन करुया...
मुलगी- अरे सोन्या, आताच आपण तासभर बोललो ना.. ...
मुलगा- आयला... परत तुलाच फोन लागला...??"
******************
एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन.
.
.
.
.
परीक्षा.. .. .. ..
दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात..

******************

******************

******************

Thursday, January 12, 2012

मराठी हास्यकट्टा 38

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची
उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल."
सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"
प्रगणक," होय."
सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."
आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "
******************
शाळेतल्या आणि कॉलेजच्या जीवनातील
फरक:
शाळेत उशीर झाला तर शेवटच्या बेंचवर
बसावं लागत होत..
आणि कॉलेजला उशीर झाला तर
पहिल्या बेंचवर बसावं लागत.......
:)
******************
राहुल बाबा यूपी के एक स्कूल मे "नौटंकी विजिट" पर गए ..
बच्चो से पूछा टीचर कहा है ?
बच्चे - टीचर तो कभी आते ही नही है ..
राहुल - फिर स्कूल कैसे चलता है ?
बच्चे - जैसे आप देश चला रहे है !!
******************
एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत बसला होता.
समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,
काय रे हीच का आपली संस्कृती ?
मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.
******************
एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत बसला होता.
समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,
काय रे हीच का आपली संस्कृती ?
मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.
******************
एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..
प्रवासी : कोणते स्टेशन आहे ?

स्टेशन वरचा माणूस : अरे टवळ्या , बाहेर येऊन बघ की स्वत : .. आळशी नुसता
बसल्या जागी पाहिजे सगळं .. डोळे फुटले का तुझे ?
....
.
प्रवासी : अरे वा पुणे आलं की !
******************
पुणेरी झटका
एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि एका पुणेरी माणसाला विचारतो - अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ?
पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल.
******************
विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!
******************
सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि
, कॉलेज कसं ' विधानसभेसारख' वाटत
आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि
त्याला बिनविरोध "आमदार" झाल्यासारख वाटत,
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि
मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत' आणि
लग्नाला एक वर्ष झालं कि मग
.
.
.
.
.
.
.
.
.
आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं
******************

Wednesday, January 11, 2012

मराठी हास्यकट्टा 39

बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.
गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ
५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर
खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.
बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय.
उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.
******************
वर्गात संगीताचा पिरेड चालू असतो

बाई : सांगा पाहु मुलांनो तुमच आवडत संगीत वाद्य कोणत ?


:
बंड्या : मधल्या सुट्टीची घंटा बाई
**************
कंजूस मालक : जा २ होटल मधून ३-३ तंदूरी घेवुन ये.....
नोकर : साहेब ६ एकाच होटल मधून का नको....
.
.
... .
.
.
.
.
कंजूस मालक : माकडा वेगले वेगले आणलेस तर चटनी आणि कांदा जास्त
भेटेल.....:D

*******************

मास्तर : गण्या आलास का तू शाळेत ....???
गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय ना म्हणजे आलोय शाळेत ...
मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात का मास्तर बरोबर ...??
...
गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर आईटम सकाळपासून फेसबुक वर नाही आली म्हणून डोकं दुखतय ,, जाऊ का परत घरी ...??? :D

**********************

गुरुजी - सांग रे बंड्या पंचवीस
भागिले तीन किती ?
बंड्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी - शाब्बास..!! आणि बाकी..?
.
.
.
बंड्या - बाकी....मजेत... टकाटक

**********************
धुरी मास्तर : पोरानो मका सांगा बघुयात बिरबल ह्यो कोण होतो..
शाळेतील पोरं (एकत्र) : नाय माहित सर ?
धुरी मास्तर : गधड्यानो अभ्यास केलो असतो तर माहित झाला असता ..
बाबलो (मध्येच बोलता ): सर तुमका माहित हा काय रमलो चव्हाण, अमित कुबल आणि उलो आंबेरकर कोण आसात ते ?
धुरी मास्तर : माहित नाय रे, कोण आसात हे ?
बाबलो : एकदिवस तरी मुलीवर लक्ष दिला असतात तर माहित पडला असता
**********************
सोनीवरच्या सीआयडी सीरियलचा पुणेकरांवर प्रभाव-
घराच्या दारावरची पाटी...

तुम्ही सीआयडीमधून आला असाल, तर घराची चावी शेजारी आहे..
ओळखपत्र दाखवून शेजाऱ्यांकडून घ्यावी...
उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडू नये..
**********************
एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये
देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते.

दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी
रेड लाईट भागातील एका बाईकडे होता..
... तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला

घरी आल्यावर पोपट म्हणतो.. "वा नवीन घर, नवीन बाईसाहेब "
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात
तेव्हा पोपट म्हणतो.."वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली"
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं.

संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो..
तेव्हा पोपट म्हणतो.." हाय पक्या, इकडे पण "..
**********************
नवरा : बायका एका दिवसाला ५० हजार शब्द बोलतात आणि पुरुष फक्त २५ हजार!
बायको : कारण पुरुषांना एक गोष्ट दोनदा सांगावी लागते !
नवरा : काय?

**********************
शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.

**********************
न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं...!!
**********************
जर कुणी तुमच्या तोंडावर दार बंद केलं आणि आतून कडी लावली...

...

..

तर..

त्याला दाखवून द्या की कडी दोन्ही बाजूंनी लावता येते.


**********************
एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन.
.
.
.
.
परीक्षा.. .. .. ..
दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात..

**********************
"मुलगा- तुझी खुप आठवण येत होती. म्हटलं फोन करुया...
मुलगी- अरे सोन्या, आताच आपण तासभर बोललो ना.. ...
मुलगा- आयला... परत तुलाच फोन लागला...??"
**********************
कॉलेजची ती पहिलीच भेट होती,
पहिल्याँदा भेटणारी ती अगदिच ग्रेट होती,
त्यानंतर तिलाच भेटण्याची सवय लागली होती,
दररोज जातायेता तीची भेट होतहोती,
चमकत्या ज्योतीसारखी ती दिसत होती,
चुकून आली उशिरा तर काळजी वाटत होती,
ती तर आमच्या गावची बस होती.. :)

Sunday, January 8, 2012

मराठी हास्यकट्टा -40

सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.

तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.

तुला कोणतं खातं हवं?

सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.....
************************
शाळा VS कोलेज

शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पेन,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;)

... ... शाळा:वर्गात येण्याआधी "टीचर ,मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .

शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कोलेज:मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना"

शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"

शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते

शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी

Saturday, January 7, 2012

मराठी हास्यकट्टा 41

कोंबडी कोणी पळवली…???

कोंबडी कोणी पळवली…???
मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर
शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.
... ... पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का?
याची तपासणी चालू आहे.
दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.
अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे
हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर,
मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.
रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर
कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?
अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे… ही.. चांगली गोष्ट
नाही. मी सरकारला… अनुरोध.. करेन की…. त्यांनी लवकरात
लवकर… त्या कोंबडी चोराचा छडा.. लावावा.
अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल
तर याद राखा.
लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल
जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||
राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर,
कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय
मी स्वस्थ बसणार नाही.


उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक
खुपसू नये.
आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत
असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये...

Wednesday, January 4, 2012

जीवन हे असच असतं


मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
... आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं.

एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...

जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं....
-अनामिक 

Tuesday, January 3, 2012

पहाट

पहाट
साखर झोपेत असतानाच दार वाजल खटखट
उघडूनपाहतो तर काय समोर उभी होती पहाट
झोपतोस काय ?उठ बाहेर ये सृष्टी बघतेय वाट
वर बघ आकाशी सूर्यदेवांनी पसरलाय ताम्रपट
बागेमध्ये उमललेल्या मस्त फुलांना हळूच बघ
... मखमली ओल्याशार गवतावर अलगद टाक पाय
मायेने फिरव त्याच्यावर हात ,बाळाच्या जावलावर
हात फिरवल्याचा मिळतोय न आनंद .............
चिमण्यांचा चिवचिवाट,अन पक्ष्यांचा किलबिलाट
ऐकून तृप्त करू घे कान ,चल लवकर सृष्टी बघतेय वाट
दूरवरून येतेय बघ कानावरऐकू येतीये मंदिराची घंटी
अरे ऐकतोस काय नुसता देणा तुही साथ वाजवत टाळी
कुठेतरी गात आहे,देवाच्या सृष्टीचीच भाग असणारी "लता"
..........................................................रामाची भूपाळी
ताजा -तवान्या श्वासाने भरून घे तुझ पोट ,दिवस भर
तन मन दिवसभर मग राहील कस प्रफुल्लीत .......
ये बाहेर ये सृष्टी बघतेय रे वाट ........................
-अनामिक

Monday, January 2, 2012

प्रेम करावसं वाटलं..

जानेवारीत तिला पाहिलं,
आणि..?????
प्रेम करावसं वाटलं..
फेब्रुवारीत ती दिसल्यावर,
मित्रांनी तिच्याजवळ लोटलं..
... मार्च मध्ये ती माझ्याकडे पाहुन गोड हसली,
एप्रिल मध्ये म्हटलं पोरगी हसली, म्हणजे
फसली..
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो,
जुनमध्ये फक्त तिच्याचं विचारांनी वेढलो गेलो..
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायचं ठरवलं,
ऑगस्ट मध्ये तीला बिनधास्त फिरवलं,
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो.
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो,
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं..
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचचं
राहुन गेलं,
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं..
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं,
त्यावर ती म्हणते कशी,
बारा महिने एकत्र फिरलो..
हे काय कमी झालं,
अरे वेड्या, आता नविन बॉयफ्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं..?????

आयुष्य फार सुंदर आहे

आयुष्य फार सुंदर आहे


एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की
सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले
दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं
आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.

खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या

वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी
राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?

जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत
राहतं.
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा
असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .

शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी
होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं
लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी...
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी...
महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा
पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण,
असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू-

१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?

हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं
नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.

आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू-
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता
येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या
एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं
.

क्षणभर विचार करा.
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण, हा मेल ज्यांना
आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....

आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत
सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत
तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.

पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही.
पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं
होतं.

धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...

" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला
मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून
चालत गेले.

ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून
मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज
आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत
महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.

आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं.
त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित
इतरांचंही...

मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही

. नाही का ?

जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा