Friday, July 6, 2012

सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी


सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी
ओठान्तले मोती नकळत, शब्दांत ओविले मी

अश्रूतला सूर मज, कळला उशिरा जेव्हा
डोळ्यांच्या ओल्याव्यास आधी ,खूप तुडविले मी

परतीच्या वाटेला मी, पाठ फिरविली अशी
मग दूर जाता -जाता असे,मार्ग हरविले मी

आज पावेतो आयुष्याचे, गूढ सुटेना मजला
आता नकळत जाळ्यांचे, फास सोडविले मी

जे पाश मजला हवे ,त्यांनीच दूर लोटिले
मग ती बंधने इथे, कधी न जुळविले मी

आजचाच चंद्र हा, अर्धाच इथे दिसतो मज
कधी काळी पुनवेत त्याचे, वर्तुळ घडविले मी

नितळ निर्झर निरंतर, वाह्तोच हा रोज झरा
घालून बांध आज तयाच्या ,सुरास अडविले मी

इथे सारेच नियम माझे ,तरीही अनघाच आज
चिरीमिरी आयुष्यात, प्रारब्धासहि फितविले
-रजनीकांत दुसने 

Thursday, July 5, 2012

का मोगरा उशाला, तू माळतेस आता



का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता

मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता
...
गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता
-रजनीकांत दुसने

Wednesday, July 4, 2012

मराठी चारोळ्या

मराठी चारोळ्या

सागराच्या लाटांची एक ,
वेगळीच गम्मत असते 
जेंव्हा आपण जातो किनार्यावर,
तेंव्हा ती स्वागत करते आणि 
जेंव्हा आपण निघतो किनार्यावरून,
तेंव्हा ती"परत या माझ्या भेटीला"
असे नकळत सांगून जाते

****************************
पावसाच्या सरी..
पसरल्या सार्‍या अंगणी.
ओल्या मातीत भिजलेल्या...
ओल्या तुझ्या आठवणी...

****************************
ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो..

****************************
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला.....
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला....

****************************
... संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला....
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...

****************************
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि ..
मन तुटायला हि वेळ लागत नाही 
वेळ लागतो फक्त ...
ते गुंतलेले मन आवरायला आणि
तुटलेले मन सावरायला

****************************
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखावावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानि मी चिंब भिजुन जावे.

****************************
 -अनामिक
  ****************************

Tuesday, July 3, 2012

तुझ्या विना

तुझ्या विना ..............!!!!!!!!


भास का हा तुझा होत असे मला सांग ना .......
लागती ओढ का सारखी अशी सांग ना...........
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना ...
तुझ्या विना ..............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगना जीव हा गुंतला
झाले आता जरी...होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना...
तुझ्या विना ...........!!!!!!!!
तुज्याविना ..............!!!!!!!!

वाटे जरी माझी तुझी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे... नाते मला हवे..
जीव तुटतो का हा असा रे सांग ना...
तुझ्या विना .............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

तुझ्या विना...
गीतकार - अमोल पठारे
संगीतकार - नीलेश मोहरीर
गायक - वैशाली सामंत, मंगेश बोरगावकर

Monday, July 2, 2012

आई


आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥
-अनामिक

Sunday, July 1, 2012

शाळा


शाळा 
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी
-अनामिक