Saturday, July 30, 2011

आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर

प्रेम पत्र
आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर

प्रिय सुनिता,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
...तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
किरण उर्फ बंड्या

पुन्हा नवी सुरूवात....

 पुन्हा नवी सुरूवात....
    - शशांक नवलकर


पुन्हा नवी सुरूवात....
आयुष्याची नवी सुरूवात....
प्रथम करावी की शेवटी....

नेहमी काहीतरी वेगळंच ठरतं
श्वासही थांबतातच शेवटी...
पण अगदी शेवटालाही......

नवीन श्वासो-श्वास...चालूच
खरच म्हणतो कधी कधी...
संपवावं सारच काही....

पण काहीना काही सूरू होतंच...
प्रत्येक ओळीचा शेवट....
एक नवी सूरूवात असतेच...

पण मग नवी कविता सुचणार कशी...

Friday, July 29, 2011

काही सायबर म्हणी

काही सायबर म्हणी

१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्‍हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!

Thursday, July 28, 2011

दारू चढल्यावर ची खास वाक्य

दारू चढल्यावर ची खास वाक्य
१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
४. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
५. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
...६. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
६. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
७ . तुला काय वाटत मला चढली आहे?
८. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
९. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१०. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
११ . यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१२. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१३ . कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१४ . तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है
१५.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१६. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१७ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
१८. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
१९. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि

Wednesday, July 27, 2011

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ...

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या सदरातील चोकॅलेत
काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे.

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल
घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श.
१५ वर्षाची मुलगी ...:- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले
गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा.

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी
त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट.

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल
घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी.

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा
केलेला स्वयंपाक.

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच
असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद.

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या
जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन..

Tuesday, July 26, 2011

काही मुलींचे नखरे !!!

तो- काय खाऊया?
ती- काहीही चालेल.
तो- पावभाजी आणि व्हेजपुलाव खाऊ या?
ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात.
तो- मग नुस्तंच चहा-ब्रेडसँडविच?
ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!..
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?
ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.
ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..
तो- मग कॉफी शॉप मध्ये तरी जाऊ या.
ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.
तो- मग तुच सांग, काय करू या?
ती- काहीही. तुच ठरव..!!.
तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.
ती- काहीही. तुच ठरव.
तो- बसनं जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी. अन कस कसले वास येतात त्या बसमध्ये.
तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.
ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?
तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.
ती- किती दुष्ट तु? रिकाम्यापोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक. मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तुच ठरव..!

Monday, July 18, 2011

मराठी हास्यकट्टा 24

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!

*******************
चंगू : अभ्यासाच्या प्रवासात आपण फक्त चालत राहायचं असतं.. चालत राहायचं असतं..

मंगू : असं का रे?

चंगू : कारण ' वाट ' तर लागलेलीच असते...

*******************

एक मुलगी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवर उभी असते.
तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"

*******************
शिक्षक : अशी कल्पना करा की, तुम्ही कोट्यधीश आहात आणि तुमचे आत्मचरित्र लिहा.

शिक्षक : गंपू, तू का लिहित नाहीस?

गंपू : सेक्रेटरीची वाट बघतोय!!
*******************
गुरुजी - बाळू काल तुझ्यासोबत ते सभ्य गृहस्त कोण होते ?
.
.
.
.
... .

बाळू - गुरुजी ते कोणी सभ्य गृहस्त नव्हते ते माझे वडील होते.
*******************
संता : वहिनींचं नाव काय रे?
बंता : गुगल कौर

संता : का रे?

बंता : अरे कारण तिला एक प्रश्न विचारला की ती किमान दहा उत्तरं देते.
*******************

गंपू : डॉक्टरसाहेब, तुमची नर्सच्या हाताला गुण आहे.
तिचा हात लागताच मी खडखडीत बरा झालो.
डॉक्टर : माहिती आहे मला... थप्पडीचा आवाज बाहेर ऐकू आला...

*******************
मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!' तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'

उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?'
*******************
बागेतल्या बाकावर एक माणूस कुत्र्यासह बसला होता. गंपू त्याच्याजवळ गेला.

गंपू: तुमचा कुत्रा चावतो का?

माणूस: नाही.
...
गंपू येऊन बाकावर बसतो न बसतो तोच तो कुत्रा त्याला चावतो.

गंपू: तुम्ही म्हणालात तो चावत नाही.

माणूस: हा माझा कुत्रा नाही!
May 22 at 7:32pm

Sunday, July 17, 2011

अमृतवेल -वि . स . खांडेकर

अमृतवेल -वि . स . खांडेकर


प्रत्येक मनुष्याचं जीवन हे एका वेली सारखं असत,वेल, अशी वेल कि ज्यावर गुणदोषांची फुले बहरलेली असतात,जशी जशी वेल वाढत जाईल तसं तसं एक एक गुणदोषांच फुल वाढत जात,करुणा,प्रीती,नम्रता,स्वाभि​मान,क्षमा,प्रेम,निस्वार्थत​ा, या गुणांच्या वर अहंकार, गर्व, स्वार्थ,वासना,अभिमान,राग,आत्मप्रौढी,अहंमपणा,मोह,द्वे​ष अशा दोषांच कवच नकळत असे बनत जात असते.

त्या कवचांमुळे माणूस स्वतःला हळूहळू हरवून बसतो,त्या साधारण वेलीच रुपांतर मग एका विषवल्ली मध्ये होते आणि त्यालाच माणूस खंर जीवन मानायला लागतो,त्या वेलीवर गुणांच्या भोवती असलेल्या दोषाच्या कवचालाच तो खंर फुल मानून त्याचा सुगंध घेत राहतो.तो स्वतःला बाह्य जगात हरवून बसतो.

पण जीवनात कधी कधी काही अशी वादळ येतात कि त्या वेलीला गदगदून हलवून टाकतात, त्या वादळात दोषांची ती कुचकामी कवच गळून पडतात, त्याचं ते तकलादू आवरण त्या वादळाची सामना करायला असमर्थ ठरते.मग ती वेल पुन्हा स्वतःला शोधायचा प्रयत्न करते,मनुष्याचे त्या उघड्या पडलेल्या गुणांकड लक्ष जाऊन त्यांचा तो अर्थ जाणण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा त्याला ती जीवन रुपी वेल नव्याने कळू लागते, उमलू लागते,माणूस स्वतःला सापडण्याचा प्रयत्न करू लागतो, मग या वेलीवर करुणा उमटते,मैत्री फुलते, मनुष्य आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो.

तेव्हा त्या वेलीच रुपांतर अमृतवेलीत होत.

आणि एकदा तीच रुपांतर अमृतवेलीत झालं कि त्यावर आलेल्या गुणांच्या फुलांना कुठल्याही कवचाची आवश्यकता भासत नाही कारण ती फुलं कुठल्याही वादळात टिकून राहतात.

"रागच कवच फुटून क्षमा बहरते, स्वार्थ जाऊन निस्वार्थ भावना येते,गर्व संपतो नम्रता येते, अभिमान जाऊन स्वाभिमान,द्वेष जाऊन करुणा,वासना जाऊन प्रीती येते तेव्हा त्या वेलीला एक नवीन अर्थ प्राप्त होतो, तो अर्थ अमृतवेल असतो."

Tuesday, July 12, 2011

काही मराठी विनोदी संभाषण

बोलणारा(उघड):साहेब देव्याच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला.
ऎकणारा(मनात):(मग काय गावभर पेढे वाटू?)

बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन हिरो होंडा मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?)

बोलणारा(उघड):साहेब ५ वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(लेका तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ?)

बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)

बोलणारा(उघड):ही माझी बायको, पल्लवी
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे साल्याची.)

बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वैताग साला.)

बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे?उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)

Monday, July 11, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास


पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करा...वा लागला.... त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्यदैत्याला मारले. ही जी शक्तीदेवीतीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
व्रताचा शास्त्रोक्त विधी :
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहावे. एकादशीला प्रातःकाळी स्नान करावे, उपोषण करावे, तुलसी वाहून श्रीविष्णूपूजन करावे व रात्री हरिभजनात जागरण करावे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे.

आषाढी एकादशी
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.
आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ? तुळस :
तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो. तुळशीची मंजिरी मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्‍या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते. मंजिरींचा हार :
श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
सौजन्य : https://www.facebook.com/ayushyawar.bolu.kahi.vny.cmyk

Sunday, July 10, 2011

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!


हाक वारीची आली, पावलं निघाली
वरसाची ताटातूट, जिवाला लागली

सोबती झाले गोळा, गळाभेट झाली
भारावली मनं, पालखी घेतली.

जनाई मुक्ताई, सोबत माऊली,
नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,

भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली
केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली.

टाळ मृदुंगाचा दंगा, हरी नामाचा गजर.
झुले पालखीची झूल, उते प्रेमाचा बहर.

अबिर गुलालाचा रंग, अभंगाचा जोर.
पाहाया पांडुरंग, मन जाहले अधिर.

चालू पंढरीची वाट, खेळू फुगडी रिंगण.
शेवट विसावा, चंद्रभागेचे अंगण.

नाम्याच्या पायरी, भक्तीचं लिंपण.
सावळ्या पाऊली, कैवल्य शिंपण.

हात जोडूनि मागतो, देवा विसर न व्हावा.
जन्म घडो पुन्हा पुन्हा, व्हावी वारीची सेवा.

पुढे परतुनी येऊ, आता निरोप असावा.
जनी विठ्ठल दिसावा, मनी विठ्ठल रुजावा.

- अनामिक

मराठी लोकांचं हिंदी

मराठी लोकांचं हिंदी..
खाली काही उदाहरणे आहेत.
१)"घरोघरी मातीच्या चुली" मधला वंदना गुप्ते यांचा एक dialog
"जरा संभाळके लेके जाणा,उसमे कांच का भांडी हे ||
देखा......पड गया ना.....
sorry ,क्या sorry ?
पेहले काय को झक माऱ्या?"

२)अगं रुपाली,हा दिनू कुठे बसतो?
रुपाली:"अरे..........दिनू ना..........वो एधरही बसता हे ||"

३)गुप्ता काकी: "अरे आपके घर मे जो मेहमान आये हे ना.....वोह कौन हे?"
कुलकर्णी काकी :"अरे,वोह..............मेरा भाचा और मेरा चुलता आया हे."

४) सलून मध्ये गेलेला मराठी माणूस म्हणतो,
"अरे भैया,केस जरा बारीक बारीक काटना.....
मेरा केस लवकर लवकर वाढता हे....."

५)शर्मा काकांशी भांडणारे जोशी काका
"भांडो ना.......अब भांडो............
अब क्यू गप्प हो गये?"

६)रात्री राणे काकांकडे गप्पा मारायला आलेले मिश्रा काका
"अरे राणेजी..............झोप गये क्या?जरा बात करनी थी आप से"

७)"पेहले एक वाडगा लो,उसमे अंडा फोड के डालो
बाद मे एक कांदा सुरी से बारीक बारीक काट के उसमे डालो,
बाद मे उसमे चिमुटभर मीठ और मसाला डालो,
अभी अच्छे से सब मिलके तवे पे सब पसराके डालना
हो गया आपका Omlet तयार"

मराठी हास्यकट्टा 20


चिंटू : आजोबा तुम्ही बदाम खाता काय ?
आजोबा : नाहीरे चिंटू …मला दाताच नाहीत .
चिंटू : मग हरकत नाही …हे तुमच्या जवळ ठेवा , शाळेतून आल्यावर घेईन मी .
********************
गुरुजी(Sir) : तुम्ही रोज 8 तास तरी झोपले पाहिजे .

.
.
विद्यार्थी (एका सुरात ): कसे शक्य आहे गुरुजी ? महाविद्यालय (College) फक्त 5 तासाचं असते ना!!
********************
तेवढ्यात समोरून जोशी
काकू येतात.
.
.
.......
...
जोशी
काकू (बोबड्या आवाजात) - आलेले काय
जाले बालाला ललायला?? तुला काय
पाहिजे??चोकलेट, बिस्किटे, गोल्या...
खेलनी?? काय पाहिजे तुला??.
.
.
चिंटू- "बस एक सनम चाहीये
आशिकी के लिए!!! "
********************
मुलांच्या शाळेजवळ “Drive Slowly” असा board असतो ,
पण मुलींच्या शाळेजवळ नसतो ..
का बरे ?
-
-
... -
-
कारण वाहने तिथे आपोआप हळू चालतात !! ........ :)

********************
TC: आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या .

आजीबाई : मी student आहे .

TC: ठीक आहे.. कोणत्या शाळेत ?
... ...
आजीबाई : ते कशाला सांगू ?

TC: माझ्या आजीचे admission करायचे आहे . .... :)
********************
एक साधू रेल्वेने फुकट प्रवास करीत असतो . Ticket checker त्याला हटकतो .

Ticket checker (साधूला ): Ticket दाखवा .

साधू : मी तर प्रभू राम जिथे जन्माला आले तिथे जातो आहे … ticket कशाला पाहिजे !

Ticket checker: असे म्हणतोस ! तर माझ्या सोबत चल … मी तुला जिथे कृष्णाचा जन्म झाला तिथे घेऊन जातो !
********************
राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"

"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.
********************
कविता :
सूर्य कोणाला झाकत नाही ,
डोंगर कोणाला वाकवत नाही ,
"मराठी " असल्याचा अभिमान बाळगा ,
कारण मराठी माणूस "बायकोला " सोडून ...
... कोणाच्या बापाला घाबरत नाही ....

काही अपवाद असू शकतात !! :)
********************
कधी लाजते
कधी रागावते
कधी हसते
कधी रडते
जिला माझे समजलो
...ती आता दुसर्या सोबत फिरते..
Fakt joke ahe!
********************
मालवणी jokes :
मालवणी मुलगा :-माझा तुझ्या वर प्रेम आसा ..!!
मुलगी : असलो मार खातलास ना
माझ्या हातचो कि
मालवणाक जाऊन पडतलास..!!
मुलगा : वायचं आसती मार हा..
माका कणकवलीक जाऊचा असा..!
July 27 at 4:43pm
********************
खतरनाक पीजे..! :O
असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.....?
.

.
म्हातारा........ :D :D :P

********************
एकदा झंप्या एका डॉन विरुद्द अब्रू
नुक्सानाची केस करतो
.
.
.
... ....
पुढच्या दिवशी डॉन चे पेहेलवान
झंप्याच्या घरी जातात
आणि त्याला धमकावतात, "केस मागे घे,
नाहीतर.... "
.
.
.
.
मग झंप्या खिश्यातून कंगवा बाहेर काढतो आणि केस मागे घेतो.
********************
नवरा बायको डिस्कव्हरी बघत असतात. टीव्हीवर एक म्हैस दिसते.

नवरा : बघ, तुझे नातेवाईक!

बायको : अय्या.... सासुबाई!
********************
संता : ओय बंते...बायकोचं आणि तुझं भांडण मिटलं का रे?
बंता : अरे मग काय...माझ्यासमोर शेवटी तिने गुडघे टेकले ना.
संता : अरे वा...काय म्हणाली काय ती गुडघे टेकून?
बंता : हेच की...चला, बेडच्या खालून बाहेर या आता, मी नाही मारणार तुम्हाला.
July 10 at 1:03am

Saturday, July 9, 2011

मराठी हास्यकट्टा 21

शंभूराव : बबन्या, तू बारावी पास झाल्यानंतर मी तुला मोटारसायकल द्यायची कबूल केली होती ना?
बबन : हो बाबा.
शंभूराव : (चिडून) गाढवा...मग तू फेल कसा काय झालास?
बबन : अहो बाबा...मी वर्षभर मोटारसायकल चालवायची प्रॅक्टिस करत होतो ना.
********************
एक पुणेरी हिंदी पाटी...
"यहा गाडी पार्क करोंगे, हमारे नाक मे दम करोंगे तो टायर मे हवा कम पाओंगे - हुकुमसे "
********************
एका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल

दाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का ?'

तो माणूस म्हणतो , ' हो !' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ?' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं !'
********************
गंपू गणिताच्या पेपरला वर्गात डान्स करत असतो.

झंपू : काय रे, नाचतोयस का?

गंपू : बाईंनी सांगितलंय, प्रत्येक स्टेपला मार्क असतात!!
********************
न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं.

बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.

नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं?
...
बायको : नाही तर काय?

नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.
July 2 at 11:31pm
********************
आजोबा : गंपू, माझी कवळी आण.

गंपू : पण स्वयंपाक झाला नाहीए अजून...

आजोबा : माहितीए.... मला समोरच्या चिंटूच्या आज्जीला स्माइल द्यायचीय....
June 24 at 8:25pm
********************
बंटी : तू आज माझ्याबरोबर डिनरला आली आहेस हे जर मन्याला कळलं तर तो नाराज नाही ना होणार?

प्रीती : छे...बिलकूल नाही. आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहोत आणि त्यासाठी आतापासूनच पैसे वाचवायचं आम्ही ठरवलंय.
********************
आजोबा : गंपू, माझी कवळी आण.

गंपू : पण स्वयंपाक झाला नाहीए अजून...

आजोबा : माहितीए.... मला समोरच्या चिंटूच्या आज्जीला स्माईल द्यायचीय....
********************
गंपू : तू तर म्हणत होतास की, लग्न झाल्यावर घराचा स्वर्ग झाला..

झंपू : हो, आणि मी स्वर्गवासी!!
********************
शिक्षक : काय रे गंपू, तुझी आणि झंपूची उत्तरं अगदी एकसारखी कशी काय?

गंपू : काय करणार सर? प्रश्नपत्रिका पण सारखीच होती!!
********************
शिक्षक : काय रे, तू पेपर कोरा का सोडलास?

विद्यार्थी : पण टापटिपीचे पाच मार्क तर मिळतील ना?

Wednesday, July 6, 2011

"पुणेरी " संस्कृतीचे आक्रमण "मॅकडोनाल्डसवर" झाले तर ?

"पुणेरी " संस्कृतीचे आक्रमण "मॅकडोनाल्डसवर" झाले तर ?
1.आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2.ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
3.दोन माणसात तोंड पुसायचे तीन ...कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4.कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
5.टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6.टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7.कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
8.गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
"पुणेरी " संस्कृतीचे आक्रमण "मॅकडोनाल्डसवर" झाले तर ?
1. आमचे येथे बर्गर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा: ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ: ११ ते ११.०५)
9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
- हुकूमावरून

Sunday, July 3, 2011

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

बालपणीच्या   कविता 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार,
शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
हॆलो हॆलो करायला छोटासा फोन

बिस्किटांच्या गच्चीवर मोर शानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्याच्या फुलातून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

कित्ती कित्ती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
-अनामिक