Wednesday, May 27, 2020

बातमी

भारतीय राज्यघटनेचे प्रकरण चार - विशेष निदेशक तत्त्वे : अनुच्छेद ३५०-क प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरविणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वत:ला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. असे असता प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाले असून ते तात्काळ थांबवावे.
#मराठीशाळावाचवा
#मातृभाषेतूनशिक्षण

#मराठीएकीकरणसमिती


विचार

हे आहेत खरे #कोरोनायोद्धा ! 🙏 अन्नदान श्रेष्ठ दान!
....

व्यवसाय करता करता मराठीपणा कसा जपावा यात उत्तम उदाहरण. #मराठीबोलाचळवळ

रांगोळी

परभणी जिल्ह्यातील, जिंतूर येथील 'ज्ञानेश्वर बर्वे पाटील' यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री गजानन महाराजांची साकारलेली अप्रतिम कलाकृती...👌👌👌 
🌺🌺🙏🙏जय श्री गजानन🙏🙏🌺🌺

Fb page @ #गणगणगणातबोते

Tuesday, May 19, 2020

देशभक्त नथुराम गोडसे जयंती

आज देशभक्त  #नथुराम_गोडसे यांची जयंती...

 नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१०
ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे
झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट
ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती.
त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने
फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती.
आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे
प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक
टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे
लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध
झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
 धार्मिक आणि अलौकिक आवडी
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक
म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात.
या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब
आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत
असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६
व्या वर्षापासून संपून गेले .
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय
स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग
घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच
सोड्ले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक
पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता,
पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर
टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर
अभ्यास केला होता .

 ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील
बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४०
मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम
यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद
गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे
यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.  (वाद सुरू आहे फक्त दोन गोळ्या नथुराम जींच्या पिस्तूल च्या होत्या तिसरी नाही)
गांधींच्या खुनाचा खटला
नथुराम गोडसेंवर मोहनदास
गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात
चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध
शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले
चालविण्यात आले होते .
गांधीहत्येचे कारण
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन
भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई
केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे
न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च
न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५०
कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग
हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात
यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास
गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव
यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे
आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण
देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण
गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात
संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर
जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम
यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये
मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ
जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २०००
हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न
करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण
आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल
रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर
प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ
म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य
समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू
मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज,
महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट
राष्ट्रभक्त म्हटले होते.
7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर
मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन
प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट
हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल
असूनही समर्थन दिले होते.
8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये
चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय
घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज
तिरंगी केला गेला.
10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष
बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे
आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे
बहुमताने निवडूनआले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे
हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
12. १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल
भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय
अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच
म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
13. जवाहरलाल
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर
पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित
केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच
वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने
व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर
दबाव आणला.
14. पाकिस्तानातून आलेले हिंदू
निर्वासितांनी जेव्हा मशिदीत
तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला,
वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर
राहण्यास भाग पाडले.
15. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर
अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न
देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे
हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास
सरकारला बाध्य केले.

 फाशीची कार्यवाहि होण्यापुर्वि काहि मिनिटे
आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधु श्री दत्तात्रय
यांच्या कडे आपली अंतिम
ईछ्चा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड
हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले
त्या साठी कितिहि वर्षे लागोत..
कितिहि पिढ्या येवो जाओ तो पर्यंत
माझ्या अस्थिचे विसर्जन करु नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे
यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर
अस्थि कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडॆ
सोपवण्यात आला नव्हता..
...जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थि व
रक्षा कुंभ रेल्वे पुलावरुन खाली वहाणा~या नदित
फेकुन दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने
हि घटना एका दुकादारास सांगीतली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने
हि बातमी हिन्दू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन
शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्यकर्त्यांना घेवुन
नदिवर गेले.. व तो अस्थि व रक्षा कुंभ
सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय
कॉलेज चे एक प्रोफ़ेसर ओमप्रकाश कोहल
यांच्या कडे सुपुर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल
व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जावुन सुपुर्द
केला...
पुढे हा अस्थि-कलश १९६५ मधे नाथूराम
गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से
यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते
शिक्षा भोगुन जेल च्या बाहेर आले..
१५ नोव्हेंबर १९५० ते आज पर्यंत
प्रत्येक १५ नोव्हेंबर ला गोड़से
यांचा "#हुतात्मा_दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे
यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस
पुष्पहार घातला जातो व
त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत
तितके दिप प्रज्वलीत केले जातात व भारत
मातेची आरति केली जाते..व नंतर उपस्थित
सर्वलोक गोडसे यांच्या अखंड
भारताच्या स्वप्ना साठी काम करित राहु
अशी शपथ घेतात....
आजहि नथुराम गोडसेंच्या अस्थींचे
अद्याप विसर्जन झालेले नाही आहे.
त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत #सिंधू_नदी_अखंड_हिंदुस्तानातून_प्रवाहित_होत_नाही_तो_पर्यंत_माझ्या_अस्थी_विसर्जित_करण्यात_येवू_नये, भले
त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील
तो पर्यंत त्या पिढी दर पिढी हस्तांतरित
करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे
व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस)
इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक
केला जातो.

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५
नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये
फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, 

" जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप
केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर
मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो". 

 नथुरामजी यांना विनम्र अभिवादन..!!
#जय_हिन्दूराष्ट्र!🚩

Saturday, May 9, 2020

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

या लेखाचा संपादित अंश आजच्या eSakal मधे प्रसिध्द झाला आहे.

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर
 -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी
भ्रमणध्वनी : 9960487995

सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... वाचन हा तसा एकमेव आनंद त्या
काळात उपलब्ध होता. अर्थात्, त्या वेळेच्या आमच्या पिढीला आजही हाच ‘एकमेव आनंद
वाटतो’ हे कदाचित आमच्या पिढीचे माहिती आणि तंत्रज्ञान युगातले अज्ञान असावे.  असेल ते
असो - पण आजही वाचनाचा आनंदच खरा आनंद वाटतो! त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी
तर रेडिओ ऐकणेही चैनीची बाब होती. साथीला होती ती ग्रंथसंपदा! ती सुद्धा ग्रंथालयाच्या
कपाटात! खरे तर त्या काळी अभ्यासक्रमाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर वाचन करणे म्हणजे शुद्ध ‘उडाणटप्पूपणा'च होता! तो उडाणटप्पूपणा आमच्या पिढीने भरपूर केला. स्वत:चे एखादे आवडते पुस्तक असणेही दुरापास्तच! अशा काळात आमच्या गळतग्यासारख्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात माझ्या हाती ‘पॅपिलॉन’ पडले! पुस्तक नावापासूनच आगळेवेगळे. हेन्री शॅरियर नावाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फ्रेंच व्यक्तीचे आत्मचरित्र. मराठीत त्याचा अनुवाद करणारे श्री. रवींद्र गुर्जर! इतकाच तपशील ज्ञात होता. पुस्तक एका झपाटलेल्या आघाशीपणाने वाचून काढले. पुन्हा वाचले, पुन:पुन्हा वाचले... ह्या प्रवासात हे पुस्तक परभाषेतली अनुवादित पुस्तक आहे हे देखील विसरून गेलो. लक्षात राहिले ते पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर!

तसा आजच्या दृष्टीने तो स्वस्ताईचा काळ होता असे म्हणतात. (आम्हाला ही स्वस्ताई कधी
भेटलीच नाही. प्रत्येक काळ आम्हाला महागाईचाच वाटतो!) चांदोबा 50 पैसे आणि अमृत
(मासिक) 1.50 पै. इतके स्वस्त!. ते सुद्धा विकत घेणे कठीणच होते! सत्यकथा लायब्ररीत बसून आधी मुखपृष्ठावरून हात वगैरे फिरवून मग उघडायचे! आपण सत्यकथा वाचतो म्हणजे कुणी मोठे ज्ञानी आहोत असे वाटे! अशा काळात पॅपिलॉनने झपाटले होते!

वाटावळणांचा प्रवास चालूच राहिला. वाचनातही अनेक संस्मरणीय ठिकाणे भेटली; पण
त्यावेळेच्या पॅपिलॉनच्या वाचनाचा ठसा मात्र अमीट राहिला. नोकर्‍या बदलत-बदलत
अखेरीस गोव्यात शिक्षक झालो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोवा-कोकण भागात भ्रमंतीही झाली. एक-दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणात- देवरुखला जाण्याचा योग आला. आयोजकांनी आम्हा पाहुण्यांची सोय एकत्र केली होती. बदलापूरचे ‘ग्रंथसखा’चे शिल्पकार श्री. श्याम जोशी प्रमुख पाहुणे होते. आदल्या दिवशीच्या रात्रीच्या वेळी आम्ही शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. श्याम जोशींनी आपल्याबरोबर आलेल्या स्नेह्यांची ओळख करून दिली. शांत, मितभाषी असे एक गृहस्थ श्याम जोशींच्या मागून पुढे आले. श्याम जोशी म्हणाले, ‘‘हे पुण्याचे प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर!’’ - झाले माझ्या डोळ्यांसमोरून
पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ झपाट्याने सरकू लागला. ‘पॅपिलॉन’ आणि ‘रवींद्र गुर्जर’ हे अद्वैत
असे अचानक नजरेसमोर साकारावे, त्या आश्‍चर्याच्या धक्क्यात मी होतो.

बघता-बघता पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे अंतर तुटले आणि गुर्जरांशी खूप वर्षांची मैत्री असावी,
तशा गप्पा झाल्या. स्वत:विषयी अत्यंत कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व, पण वाचन प्रवासात
‘पॅपिलॉन’नंतरही ते अनेक ठिकाणी भेटतच होते. तो सारा आलेख आठवत राहिलो. नंतरच्या
वाचनयात्रेत गुर्जरांची किती तरी पुस्तक वाचनात आली. ‘पॅपिलॉन’चा दुसरा भाग म्हणून
‘बँको’, पुझोचे 'गॉडफादर’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅपलीन’, ‘सेकंड लेडी’, ‘आईनस्टाईन’, ‘हाईनरिश
श्लीमान’वर लिहिलेले ‘सुवर्णयोगी’ अशी किती तरी...! नव्याने झालेल्या या भेटीला संवादांचे
धुमारे फुटले. रवींद्र गुर्जर हे अत्यंत साधे, सरळ, शांत, मितभाषी, पण सतत काही ना काही
उपक्रमांत गुंतलेले आढळले. वास्तविक पाहता त्यांचे शिक्षण बी.ए. (गणित), बी. जे.
(वृत्तपत्रविद्या), एम.ए.पीएच्.डी. (पुरातत्त्व) अशा वैविध्याने साकारले आहे. आयुर्वेद रसशाळा, विशाल सह्याद्री पुरवणी संपादक, संतकृपा/धर्मश्री प्रकाशन, डेक्कन कॉलेजमध्ये  पुरातत्त्व विभाग - संगणक विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे; पण खर्‍या अर्थाने ते रमले ते अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या कामात. गेली चाळीस वर्षे ते ‘गायत्री साहित्य’ हे प्रकाशन चालवितात. या माध्यमातून कथा, कादंबर्‍या, धार्मिक, संस्कृत- अनुवाद. अशी सुमारे 100 हून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इंग्रजी वाचनाचा आणि इंग्रजी सिनेमांचा प्रचंड नाद! अक्षरश: हजारो चित्रपट पाहिले आहेत. ह्या व्यासंगाबरोबरच पर्यटन, आपले स्वास्थ्य, संतकृपा, विश्‍व पांथस्थ, समर्थ संदेश, ग्रंथ भारती यांसारखी अनेक नियतकालिके आणि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ग्रंथ आणि वाचन यांच्यावरील प्रेमामुळे ‘स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर' या वाचन संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेचे ते मार्गदर्शकही आहेत.

माझ्यासारख्या इंग्रजी वाचनाची ‘फ्युएन्सी’ नसलेल्या वाचकावर रवींद्र गुर्जरांचे अनंत उपकार
आहेत. अन्यथा, ‘गॉडफादर’, ‘सेकंड लेडी’, ‘कोमा’, ‘पेलिकन ब्रीफ’, ‘आईनस्टाईन’, ‘चॅपलीन’,
‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’.... यांसारख्या अभिजात इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाला मुकावे लागले
असते. भाषांतर ही साहित्याची एक वेगळी शाखा आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारपद्धतींशी,
जीवनशैलीशी अत्यंत अपरिचित असलेल्या परप्रांतीय, परभाषिक वाङ्मयाचा वेध घेऊन त्या
साहित्य-संस्कृतीचे मराठीत साधे, सरळ, सुबोध आणि ओघवते भाषांतर करणे म्हणजे केवळ
भाषा-अंतर नव्हे! इंग्रजीमधल्या लेखनातील सर्व कंपने, संवेदना आणि अर्थछटांचा संवेदनशील
वेध घेऊन पुन्हा मराठी भाषेत लिहिणे म्हणजे एक नवसृजनच आहे, असे मला वाटते. खरे तर
स्वलिखित साहित्यकृतीमध्ये आणि सुंदर, ओघवत्या, आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण अशा
भाषांतरामध्ये कोणताही दर्जात्मक फरक करावा, असे मला वाटत नाही. आज मराठी भाषा
विविध अंगाने समृद्ध होत आहे. इतर भाषांतून मराठीमध्ये आलेल्या भाषांतरित साहित्याने
आपले स्वत:चे असे एक समृद्ध दालन सजविले आहे. ह्या दालनामध्ये अनेक चमकून
दिसणार्‍या कलाकृतींची भर रवींद्र गुर्जरांना घातली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध आणि
विकसित होण्याच्या ह्या प्रवासास गुर्जरांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रवींद्र गुर्जर येत्या २९  एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने
त्यांच्या कार्याचा, विविध व्यासंगांचा, त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचा वेध घ्यावासा वाटतो.
आयुष्याच्या त्या टप्प्यावरही त्यांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची यादी मोठी आहे. संगीत व
नाट्यकलेचे चाहते असलेल्या गुर्जरांनी अक्षरश: हजारो कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे.
त्यांच्या अनुवादाचे हजारो वाचक देशात, परदेशात विखुरलेले आहेत. आजही अनेक
कार्यशाळा, मुलाखती, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला ह्या निमित्ताने समस्त मराठी विश्‍वात
त्यांचा संचार सुरूच आहे. बदलापूरच्या ग्रंथसखाचे निर्माते श्री. श्याम जोशी यांच्या समवेत
महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धी योजनांमधून ते कार्यरत आहेतच. ह्याच योजनेचा एक भाग म्हणून अगदी परवा ते गोव्यात येऊन गेले. वाचन संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी
फोंड्याजवळच्या बोरी (बा. भ. बोरकरांचे गाव) ह्या छोट्याशा गावात आम्ही चालवीत
असलेल्या लहानशा वाचनालयाला भेट देऊनही गेले. वाचन संस्कृती सर्वदूर पसरावी, अगदी
खेड्यापाड्यांतही सुजाण वाचक निर्माण व्हावेत, ह्या तळमळीतून वाचनसंस्कृतीला जे-जे पोषक आणि साह्यभूत आहे, त्यात भाग घेण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे. गेल्या 100 वर्षांत गाजलेल्या मराठी पुस्तकांचे त्यांचे संकलन आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रभर
किमान 500 सांस्कृतिक केंद्रे आणि घरगुती वाचनालये सुरू व्हावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परभाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत यावे व मराठी
अनुवादाचे दालन अधिक समृद्ध व्हावे, या दृष्टीने ‘अनुवाद’ या विषयावर ते बहुमोल मार्गदर्शन
करतात. सुमारे 500 हून अधिक अनुवादक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

आज वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावरही रवींद्र गुर्जरांचा वाचन-लेखन प्रवास त्याच वेगाने
चालला आहे. जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्याच्या आस्वादाने त्यांचे मन अधिकच
आत्मलक्ष्यी बनते. मग 'मम आत्मा गमला' सारखी छोटी पण ‘स्व’चा शोध घेणारी पुस्तिका
आपसूकच साकार होते. गुर्जरांनी आपल्या भोवतीच्या साहित्याचा, संगीताचा, नाट्यसृष्टीचा,
चित्रपटसृष्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावंतांचा सहवासही त्यांना लाभला.
मनात येईल, त्या उपक्रमांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. डोळ्यांसमोर मात्र ‘वाचन
संस्कृतीची अभिवृद्धी’ हाच ध्यास ठेवला. आजही त्याच ध्यासाने ते कार्यरत आहेत. अशा अनेक
उपक्रमांत ते जरी ते मग्न असले, तरीही त्यांची हजारो वाचकांच्या मनातील प्रतिमा मात्र
‘पॅपिलॉन’कार गुर्जर! हीच आहे. एखाद्याच कलाकृतीच्या वाट्याला असे भाग्य येते. इतकी वर्षे
होऊन गेली.  रवींद्र गुर्जरांची 35 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, तरीही माझ्या मनातले
‘पॅपिलॉन’ पंख मात्र रवींद्र गुर्जरांच्या नावाबरोबरच लयबद्ध हलल्यासारखे वाटतात!  पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे  ते पुस्तक आजही मी हाताळतो आहे, असे वाटते आणि जागतिक साहित्यातील पैलपाखरे मराठी माणसाच्या अंगणात उतरविण्याचे श्रेय रवींद्र गुर्जरांचे आहे, ह्याची साक्ष पटते.

Tuesday, May 5, 2020

Sunday, May 3, 2020

महाराष्ट्र दिन

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य 
संघटना आयोजित 


#महाराष्ट्र_दिन प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे उत्तरे







....







जय मराठी ! जय महाराष्ट्र 
#मराठीएकीकरणसमिती

Friday, May 1, 2020

गोष्ट कोकणातली


#Goshtakokanatli

आज दिनांक १ में २०२० रोजी

आपलो गाववालो अनिकेत रासम पेपरात झळकलो आसा!☺️ अभिनंदन त्याचे ! 👏👏👏👏


महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩