Tuesday, March 31, 2020

अखेरचा निरोप घेताना...

अखेरचा निरोप घेताना... 
#जनता_कर्फ्यू  #युद्ध_कोरोनाशी

डॉक्टर फ्रास्न्सिस्का कोर्टेल्लारो सांगत होते,  
"तुम्हाला माहिती आहे का एका डॉक्टरसाठी सर्वात हृदयद्रावक गोष्ट कोणती? पेशंटला एकट्याने मरताना पाहताना.  आयुष्याच्या शेवटी मुलांना, नातवंडांना एकदा पाहायला मिळावे म्हणून हात जोडून दयेची भीक मागताना.  कोरोनाग्रस्त रुग्ण (Covid-19 Positive) एकट्याने येतात. कोणी सोबत नसते मदतीला... जवळचे नातेवाईक सुद्धा. 

ही एकाकी लढाई लढत असताना, कोरोनाग्रस्त रुग्णांना अखेर हे कळून चुकते की आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. एक बरं की, त्याची शुद्ध लगेच हरपत नाही. ते संपत जातात पण हळूहळू. पुरेसा वेळ असतो त्यांच्याकडे विचार करायला... शेवटी काय करावं!  

आज रात्री, ती अशीच शेवटची पेशंट होती.  एक आजीबाई... तिला नातीला एकदा डोळेभरुन पाहायचं होतं जाण्यापूर्वी.  मी खिश्यातून फोन काढला आणि विडियो कॉल लावला. नातीसह घरातल्या सर्वांनी तिला गुडबाय केलं. कॉल संपल्यावर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्वास घेतला. 

माझ्याकडे आता अश्या विडियो कॉलची मोठी लिस्ट झाली आहे..... माझ्याकडील 'अखेरच्या निरोपांची यादी' !

मला आशा आहे की ते (प्रशासन) निदान छोटे आय-पॅड देतील.  ३-४ मिळाले तरी पुरेसे होतील, त्यांना एकटं मरण्याआधी अखेरचा निरोप घेण्यासाठी."

आता हे वाचून, तुम्हाला अजूनही तक्रार आहे का? की  प्रशासनाकडून सर्व व्यवहार बंद पाडून तुम्हाला उगाचच डांबून ठेवलं जाताय. घरात बसून तुम्हाला जाम बोअर झालंय?

उगाच त्रागा करण्याआधी ध्यानात ठेवा, ही निर्णायक लढाई आहे एका दिसू न शकणार्‍या अज्ञात शत्रूशी... 

(स्वैर अनुवाद)
- समीर दरेकर 
#IndiaFightsCorona #VideoCallForPatients

india fighter corona

पंतप्रधान मोदीं वर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  विश्वास आहे सगळं ठीकच करतील ! जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरू राहतील !
World health organization जे सुचवतात ते मोदी करत आहेत ! 🙏

कोरोना विरुद्ध उगाच चुकीच्या  बातमी चा प्रसार 
टाळणे योग्य !

अफवा पसरवू नये! 
#ईअक्षरमन

काही चुकलं तर सांगू शकता! उगाच वाद घालण्याचे दिवस नाही आहेत हे! 🙏

#StayAtHome #IndiaFightsCorona

मराठी हास्य कट्टा

चल मित्रा माझ्या गाडीवर एक चक्कर मारून येऊ.
मित्र - नको रे बाबा, मी तो व्हिडिओ पाहिलाय की त्यात मागचाच जाम मार खातोय. 😜😂😛

#fbshare #stayathome

पोलिसांना सहकार्य करा

#निशब्द  #बातमी #IndiafightsCorona
🙏
#पोलिस आणि #सरकार #डॉ इतर जण यांना सहकार्य करा!

किती झटत आहेत ते आपल्यासाठी !

#ईअक्षरमन

https://youtu.be/w__K7YD7Sso


मराठी बोला चळवळ

महाराष्ट्रात राहून किती माजली आहेत ही लोकं आता तरी मराठी माणसाने मराठी बोलावं समाजात वावरताना !

सांगूया तिला #२१दिवस घरी आहेस निदान महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची भाषा शिक म्हणून !

तिला सांगून काही उपयोग नाही !  बोलते की मराठी अशिक्षित माणसांसाठी आहे 😡😡 
आपण च #मराठीबोला सुरू करायचं ! एका रेल्वे मध्ये एक जण मराठी मध्ये उत्तर देत होता त्या माणसाला नाही कळलं म्हणून आरडाओरड करत होता अमराठी माणूस आणि नंतर आपल्याच मराठी माणसाने दुसऱ्या हिंदी बोलून माती खाली 😡😡
#विद्या
#ईअक्षरमन

Thursday, March 26, 2020

साहित्य वाचन

कलेचा आणि  विद्यार्थी म्हणून नवीन गोष्टी शिकण्याचा वयाशी काहीही संबंध नसतो! 
आम्ही ईअक्षरमन वर साहित्य वाचन उपक्रम सुरू केला !Audio किंवा video format मध्ये !☺️

नीता  जयवंत  आणि स्मिता  मेढी  वाचन करताना ☺️
काव्यानंद मध्ये कविता वाचन आणि कथा जागर मध्ये कथा वाचन!☺️
#eaksharman #मराठी #साहित्य 

Wednesday, March 25, 2020

गुढीपाडवा

#गुढीपाडवा
हा मराठमोळा सण ..
वसंत ऋतुचे आगमन, 
चैत्र शुद्ध प्रतिपदा,
नवीन वर्षाची सुरुवात !

महाराष्ट्रातील प्रतिष्ठान (पैठण) येथील मराठी राजाने ‘शकांना’ भारताबाहेर (आताच्या रशियापर्यंत) पळवून लावले, दिग्विजय मिळवला.
त्याचे प्रतिक म्हणून ‘शक’ ही भारतीय कालगणना सुरु झाली.
ही १९४१ वर्षे जुनी,
मराठी महाराष्ट्राची थोरवी..

विजयाची, उल्हसाची, आनंदाची गुढी उभारायची आहे.

काही आपलेच, अतिशिक्षित
‘गुडगुडी’ ओढून धूर काढत आहेत.
उत्तर भारतीयांच्या प्रभावाखाली,
*कृपया, सणाच्या नावांचा तरी अपभ्रंश करु नका.*

‘गुडी’ नाही ‘गुढीपाडवा’
सुरक्षेची व साक्षरतेची  ‘गुढी’ उभारुया !

सर्व मराठी बांधवाना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

- प्रदीप सामंत
- कार्याध्यक्ष
#मराठीएकीकरणसमिती

#काळजीघ्या #घरातचरहा #सुरक्षितरहा
#मीचमाझारक्षक


fight against corona

पंतप्रधान मोदीं वर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  विश्वास आहे सगळं ठीकच करतील ! जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरू राहतील !
World health organization जे सुचवतात ते मोदी करत आहेत ! 🙏

कोरोना विरुद्ध उगाच चुकीच्या अर्थवट बातमी चा प्रसार 
टाळणे योग्य  ! 
#ईअक्षरमन

काही चुकलं तर सांगू शकता! उगाच वाद घालण्याचे दिवस नाही आहेत हे! 🙏

Monday, March 23, 2020

कोरोना बद्दल ५


घरी बसून राष्ट्रसेवा करण्याची संधी!

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या “जनता कर्फ्यू “ च्या आवाहनाला सगळ्यांनी एकसाथ आज रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने घरात राहून पालन करावे .

कोरोना बद्दल ४

१५ दिवस संचार बंदी(Lock down) केलं नाही तर कोरोना virus third stage ला पोहोचणार ! हेच टाळण्यासाठी train सेवा बंद केली  झाली आहे भारताची!
#भारतजिंकणारकोरोनाहरणार! 
#IndiaFightsCorona

कोरोना बद्दल

अखेरचा निरोप घेताना... 
#जनता_कर्फ्यू  #युद्ध_कोरोनाशी

डॉक्टर फ्रास्न्सिस्का कोर्टेल्लारो सांगत होते,  
"तुम्हाला माहिती आहे का एका डॉक्टरसाठी सर्वात हृदयद्रावक गोष्ट कोणती? पेशंटला एकट्याने मरताना पाहताना.  आयुष्याच्या शेवटी मुलांना, नातवंडांना एकदा पाहायला मिळावे म्हणून हात जोडून दयेची भीक मागताना.  कोरोनाग्रस्त रुग्ण (Covid-19 Positive) एकट्याने येतात. कोणी सोबत नसते मदतीला... जवळचे नातेवाईक सुद्धा. 

ही एकाकी लढाई लढत असताना, कोरोनाग्रस्त रुग्णांना अखेर हे कळून चुकते की आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. एक बरं की, त्याची शुद्ध लगेच हरपत नाही. ते संपत जातात पण हळूहळू. पुरेसा वेळ असतो त्यांच्याकडे विचार करायला... शेवटी काय करावं!  

आज रात्री, ती अशीच शेवटची पेशंट होती.  एक आजीबाई... तिला नातीला एकदा डोळेभरुन पाहायचं होतं जाण्यापूर्वी.  मी खिश्यातून फोन काढला आणि विडियो कॉल लावला. नातीसह घरातल्या सर्वांनी तिला गुडबाय केलं. कॉल संपल्यावर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्वास घेतला. 

माझ्याकडे आता अश्या विडियो कॉलची मोठी लिस्ट झाली आहे..... माझ्याकडील 'अखेरच्या निरोपांची यादी' !

मला आशा आहे की ते (प्रशासन) निदान छोटे आय-पॅड देतील.  ३-४ मिळाले तरी पुरेसे होतील, त्यांना एकटं मरण्याआधी अखेरचा निरोप घेण्यासाठी."

आता हे वाचून, तुम्हाला अजूनही तक्रार आहे का? की  प्रशासनाकडून सर्व व्यवहार बंद पाडून तुम्हाला उगाचच डांबून ठेवलं जाताय. घरात बसून तुम्हाला जाम बोअर झालंय?

उगाच त्रागा करण्याआधी ध्यानात ठेवा, ही निर्णायक लढाई आहे एका दिसू न शकणार्‍या अज्ञात शत्रूशी... 

(स्वैर अनुवाद)
- समीर दरेकर 
#IndiaFightsCorona #VideoCallForPatients

Saturday, March 21, 2020

Traffic वडा पाव

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरुन वडापाव विक्री *"

तुम्ही प्रवासात आहात , बस-स्टँण्ड मध्ये गाडी थांबली , कळकट ,मळकट कपडयातला पोऱ्या , थंडगार वडा आणि पाव वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो ! 

गरज असली की खातात कि नाही लोक ?

पण तेच तुम्ही ट्राफीक सिग्नलवर वेल ड्रेस्ड मुलं , एक बॉक्स , त्यात गरम वडा , पाव , टिश्यू पेपर , छोटी पाणी बॉटल आणि किंमत 20 रू .

कोणतं पार्सल आवर्जून घ्याल ??

गौरव लोंढे 
या , मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली भन्नाट आयडीया 
Traffic WadaPav या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे ( पश्चिम) मध्ये राबवत आहे .

सबकुछ हायटेक ,, स्वतःचा ड्रेसकोड , वेबसाईट, फेसबूक पेज , आणि ग्राहकाला गरम गरम देण्याची जिद्द , हे सगळं कॉम्बीनेशन  एवढं भन्नाट जमलंय कि , हे स्टार्ट-अप फार लवकर ग्रो करेल .

आज त्यांची सहाच जणांची टीम हे करतेय उदया ही नक्कीच वाढणार वादच नाही !

हा व्यवसाय छोटा असला तरी यांनी खूपच जास्त मॅनेजमेंट प्रिसिंपल्स इतक्या परफेक्ट पणे पाळलेत कि , यांना कोणीच रोखू शकत नाही .

ती प्रिंसीपल्स खालीलप्रमाणे .

(1) Just in Time/zero inventory : 
आजकाल कोणतीच मोठी कंपनी खूप जास्त माल स्टॉक करत नाही , त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते कि पाहीजे ते मटेरियल "अगदी त्या वेळेत " त्या ठिकाणी पोहचेल .
एखादा स्टॉल टाकून बसू शकले असते पण वेळेवर ग्राहकाच्या हातात देणे ही Just in Time स्ट्रॅटजी आहे .

*************************************

(2)Excellent Customer service : 
इथे यांनी टिश्यू पेपर , छोटी  पाणी बॉटल सुद्धा देऊन एक लेवल पुढे जाऊन कशी सर्वीस दिली जाते? हे दाखवून दिलय ! 

**********************************

(3) Attractive Packaging :

बरेच नवीन व्यावसायिक अती उत्तम प्रॉडक्ट्स बनवतात पण खर्च वाचवण्यासाठी पॅकेजींग सो-सो करतात , 
आजकाल चा ग्राहक कोणतीही पदार्थ तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने खातो , आणि मग पुढचा निर्णय घेतो .
***********************************

(4): process delegation

बऱ्याच नवव्यावसायिकांची चुक होते कि, ते एकटेच सगळी ऑपरेशन्स संभाळत बसतात , पण कित्येक बिझनेस हे फक्त टिमवर्क नेच केले जातात , यासाठी written process and delegation याचा वापर करावा लागतो 

* **********************************"*

(5) Ask for Referrals :

कोणताही व्यवसाय ॲड साठी प्रचंड खर्च करतो तेंव्हा कुठेतरी त्याला लोक ओळखायला लागतात , पण हे लक्षात घ्या आजच्या जमान्यात word of mouth सारखं प्रभावी माध्यम नाही त्यामुळेच यांनी पॅकेट वरच अपील केलीये कि , तुम्ही आमची स्टोरी फेसबूक आणि व्हाट्स अपवर शेअर करा ! 

Smart !! 

ही भन्नाट आयडीया आहे ! 
हा पठ्या लवकरच खूप प्रसिद्ध होणार .

चला तर मग आपण पण त्याला थोडं प्रसिद्ध करूया ! शेवटी आपला मराठी पोरगा काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करतोय .

कधी ठाण्यात गेलात आणि यांच्या कर्मचाऱ्याची भेट ट्राफीक मधे झाली तर आवश्य खरेदी करा ! आणि प्रोत्साहन दया ! 

ही स्टोरी होती .
*"Traffic vada pav व गौरव लोंढेची*
Fb page @ https://www.facebook.com/Gaurav4555/
Teen Haath Naka flyover ,
Bhakti Mandir ,
Paach Pakdi ,
Thane West 
Maharashtra .

या आपल्या
भावाला नक्की व्हायरल करा !
🙏🙏🙏🙏🙏
Fb post @महाराष्ट्र देशा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2538704473084237&id=1729648977323128

कोरोना प्रभाव असताना घरी राहणं योग्य !

स्वतःच्याच घरात सगळ्या सोयी असताना देखील काही दिवसातच कंटाळलात??? 

कल्पना करा “११ वर्ष अंदमान” किती जीवघेणे असेल.
धन्य ते तात्याराव
#अनामिक #fbshare

Friday, March 20, 2020

fb post 2

#फोटोकॉपी काढताना सावध रहा #fbpost

Aniruddh Datar
· Pune
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय.
आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ. 
शेवटी एका जवळच्या गल्लीबोळात एक झेरॉक्स कम चहा कम सिमकार्ड कम फोन रिचार्ज कम फॉल पिको कम परकर पोलकं कम अंडीविक्याचं दुकान सापडलं. त्याला दोन फोटोकॉपीज मागीतल्या. ह्यानी कॉपीज काढल्या आणि मशिनच्या मागच्या पिशवीमधे दोन कागद खुपसले. नेमके खुपसता खुपसता मला माझ्या पॅनकार्डची कॉपी खुपसली जातीये असा भास झाला. त्यानी माझ्या हातात माझ्या प्रती टेकवल्या. मला शंका आली म्हणुन मी त्याला पिशवी उघडायला सांगितली. तो उघडायला काही तयार होईना. म्हणे खराब झालेल्या प्रतिंची पिशवी आहे. माझी सटकली. गचांडी धरल्यावर त्यानी पिशवी उघडली. त्यामधुन माझ्या पॅनकार्डच्या दोन सुस्पष्ट प्रती निघाल्या. त्याचबरोबर इतर अनोळखी लोकांच्या पॅनकार्ड्स, ड्राईव्हिंग लायसन्स, वीजबिल वगैरेच्या जवळजवळ २५-३० प्रति होत्या.
त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले. पोलिसात जायची धमकी दिली. गयावया करायला लागला म्हणुन आत्ता सोडुन दिलाय. आता परत तिकडे गेलो की मित्राला किंवा दुसर्या कोणालातरी प्रत काढायला पाठवणार. जर त्यानी परत तसाचं प्रकार केला तर तो गेला बाराच्या भावात.
लिहायचं तात्पर्य असं की ह्या अश्या दुकानामधे फोटो़कॉपीज काढताना सावधान. आपल्या कागदपत्रांचा वापर कुठल्या कामासाठी केला जाईल ह्याचा काय भरवसा? आपल्या नावाने सिमकार्ड्स उचलुन किंवा अजुन काही कारभार करुन आपण अडकले जाणार नाही कशावरुन? इथुन पुढे मी जास्तीच्या अनावश्यक प्रती काढणार नाही आणि रिसिव्ह्ड चा शिक्का मारुन घेतल्याशिवाय कुठेही देणार नाही. एवढचं नव्हे तर फोटोकॉपी मशिनवाल्यावर जास्तीचं लक्ष राहिल इथुन पुढं माझं.
ह्या सगळ्या प्रकारावरुन आधी घडलेल्या एका प्रकाराचीही आठवण झाली. एअरटेलला मी नंबर जवळ जवळ पाच वर्ष वापरल्यावर लक्षात आलं की माझी के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हरवलीत ते. ही डॉक्युमेंट्स जमा नं केल्यास ४८ तासात फोन बंद करु असा नोटिसवजा फोन त्यांनी केला. एअरटेल सेंटर मधे ह्या प्रकाराची चौकशी करायला गेल्यावर तिथे माझ्यासारखेचं ४-५ जणं आलेले दिसले. आम्ही सेंटर मॅनेजरला के.वाय.सी. डॉक्युमेंट्स हवी आहेत हे लेखी मागितलं. ते द्यायला तो टाळाटाळ करायला लागला. मग गरमागरमी झाल्यावर त्यानी लेखी मागणी लिहुन ४-५ जणांना त्याच्या कॉपीज दिल्या त्यानंतरचं मी ते डॉक्युमेंट्स परत दिले. खरं खोटं माहित नाही पण एक अशी गोष्ट ऐकली होती की अमहाराष्ट्रीयन मंडळी ज्यांच्याकडे निवास पुरावा नसतो त्यांना ही कागदपत्र लागतात म्हणुन जाणुन बुजुन असे प्रकार केले जातात.
तेव्हा पुढच्या वेळी अशी महत्त्वाची कागदपत्र प्रत काढायसाठी द्याल तेव्हा नक्की डोळ्यात फोडणी घालुन लक्ष द्या. दिवस खराब आहेत. Nआपल्या कागदपत्रांचा बेजबाबदार वापर झाल्यास तुम्हालाचं जबाबदार धरलं जाउ शकतं.
प्रिव्हेंशन इज बेस्ट मेडिसिन.
Forwarded as received

fb post 1

#fbpost
बऱ्याच जणींना facebook कसे वापरावे ग्रुपवर कश्या पोस्ट्स टाकाव्यात कळत नाही ..त्यांच्यासाठी ही माहिती..

* तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर facebook वापरा...

* facebook lite वर मोठ्या पोस्ट्स लिहता येत नाहीत.

* पोस्ट Copy paste करण्याचा ऑप्शन फक्त facebook वरच आहे.

* ग्रुपवरील पोस्ट सर्च करण्याचा ऑप्शन facebook आणि browser मधून facebook ओपन करून बघता येतात. facebook lite वर ग्रुपवरून सर्च करता येत नाही.

* play store मध्ये सेटिंग मध्ये Auto update apps on करून ठेवा म्हणजे अँप्सचे नवीन version update च्या नोटिफिकेशन येतात आणि अँप्स update करता येतात.

* मराठी टायपिंग साठी play store मधुन google indic keyboard किंवा Sparsh marathi keyboard install करा दोन्ही कीबोरर्ड्स सोपे आहेत दोन्ही डाउनलोड करा आवडेल तो वापरा दुसरा delete करा.

* एखादी पोस्ट लिहीत असताना वेळेअभावी पूर्ण लिहली जात नाही तेव्हा ही पोस्ट तुम्ही write something here वर लिहा आणि त्याच्या वरच share with चा ऑप्शन असतो तिथे क्लिक करून only me वर क्लिक करा आणि share करा म्हणजे तुमची पोस्ट फक्त तुम्हालाच दिसेल इतर कुणालाही दिसणार नाही. नंतर उजव्या कोपऱ्यात उभे 3 डॉट्स असतात त्यावर क्लिक करून edit post वर क्लिक करायचे आणि राहिलेल लिखाण पूर्ण करून save करायचे.
पोस्ट लिहून झाल्यावर save करून copy करून ग्रुप वर येऊन write something वर paste करून post करायचे.

* तुम्हाला एखादी पोस्ट आवडली असेल पण वेळेअभावी वाचता आली नाही तर वर उजव्या कोपऱ्यात जे 3 उभे dots आहेत त्यावर क्लिक करून save post वर क्लिक करा आणि वेळ मिळाल्यावर वर उजव्या कोपऱ्यात 3 आडव्या lines आहेत त्यावर क्लिक करून saved वर क्लिक करायचे आणि राहिलेलं वाचन पूर्ण करायचे.

* friend reqests स्वीकारताना आणि पाठवताना विचार करूनच निर्णय घ्या.बऱ्याचदा नावात साधर्म्य असेल तर request पाठवली जाते तेव्हा आधी प्रोफाइल बघूनच request पाठवा आणि स्वीकारा.

* अनोळखी लोकांच्या मेसेज ला reply देऊच नका कारण तुम्ही 1 reply दिला की पुढचा 2 रिप्लाय देणार..
संधीसाधू लांडग्यांची कमी नाही इथे..so beware..

* फोन सेटिंग मध्ये application management वर क्लिक करून running apps close करा..कारण आपण अँप्स जरी close केले तरी ही apps अंतर्गत run होत असतात त्यामुळे फोनमधील space कमी होते फोन hang होतो आणि व्हायरस शिरण्याची शक्यता असते.

* पोस्ट वर react होताना ईमोजी चा वापर विचार करून करा आणि आपण योग्य ईमोजी टाकलीय का याची खात्री करा. विनाकारण एखाद्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

अश्या रीतीने झुक्याचं व्यासपीठ वापरताना काळजी घ्या.☺

...सारिका...☺https://www.facebook.com/sarika.avasarenangare

लेख

"सैनिकहो तुमच्यासाठी घासही अडतो ओठी" ही उक्ती सत्यतेत उतरवणारे व्यक्तिमत्व.
एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देणारा अभिनेता।
चंद्रकांत गोखले
जन्म - ७ जानेवारी १९२१
मृत्यु - २० जुन २००८
।।परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील।।
।।अभिनय प्रवास।।
वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण ।
सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम।
।।पुरस्कार।।
विष्णुदास भावे गौरवपदक।
व्ही शांताराम पुरस्कार।
चिंतामनराव कोल्हटकर पुरस्कार।
नटश्रेष्ट नानासाहेब फाटक पुरस्कार।
छत्रपति शाहु महाराज पुरस्कार।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुरस्कार।।
।।देशसेवा।।
चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख
रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली। आज हा आकडा कमी वाटत
असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता।
सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते एकवेळ जेवन करत । बसने व
पायी प्रवास करत । कितीही अडचणी आल्या
तरी मदत थांबविली नाही। या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण
आदरांजली ।

निदा

निदा
- आल्हाद काशीकर
 
निदा फाजली हा एक मोठा अध्याय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रत असे अध्याय असतात. तो कालखंड त्या माणसांचा असतो. त्यांच्या अवतीभोवती घटना, माणसं, कथा फिरत असतात, बनत असतात. नुकताच शरद जोशी नावाचा एक अध्याय संपला. तसेच निदा होते. अतिशय निर्भय माणूस. कुठल्याही गोष्टीबद्दल मत व्यक्त करताना त्याचे काय बरेवाईट परिणाम होतील, याचा विचार निदा करीत नसत. अगदी स्वत:च्या खासगी जीवनाबद्दलसुद्धा जगाला सारं काही सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली.                                       
माझं त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालं त्यावेळी त्यांना मी त्यांचा पत्ता विचारला. ते म्हणाले, ‘मधुबन बार के सामने मेरा घर है वर्सोवा में.’ मी मनात म्हटलं, शायरचा हाच योग्य पत्ता असू शकतो! मी अनेकदा त्यांच्या घरी जायचो. साधारणत: संध्याकाळी. अनेक विषयांवर ते बोलत. 
निदा एक अंतर्दृष्टी होती. फार मोठी किंमत जीवनात चुकवलेला तो माणूस होता. आपल्या भूमिकेवर ते कायम ठाम राहत. त्याचमुळे फाळणीनंतर पाकिस्तानातही जाण्याचे  त्यांनी नाकारले.
पुढे त्यांच्या आईचे पाकिस्तानात निधन झाले. मात्र आईच्या आजारपणात व मृत्यूनंतरदेखील निदा व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानात जाऊ शकले नाहीत. निदांचा एक दोहा या प्रसंगावरच आहे. 
मैं रोया परदेस में  भिगा माँ का प्यार,
दुख ने दुख से बात की  बिन चीठ्ठी बिन तार
निदांनी अशी बरीच दु:खं पचवली. मुंबईच्या फुटपाथवर आयुष्य काढण्यापासून ते अत्यंत प्रतिष्ठित व्यासपीठांवर आपले विचार व्यक्त करण्यार्पयतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. निदांचे चाहते जगभरात आहेत. अमेरिका, ब्रिटन, दुबई इत्यादि अनेक देशांमध्ये त्यांना मुशाय:यांसाठी बोलावले जायचे. भारतात अनेक मुशाय:यांमध्ये त्यांचा सहभाग होता. निदांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता, पद्मश्री मिळाली होती. मला नेहमी वाटायचे की निदांना ज्ञानपीठ मिळायला हवे. मात्र दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. कमालीच्या सोप्या भाषेत सगळं आकाश ते उलगडून दाखवित. 
त्यांचे एक पुस्तक आहे. ‘तमाशा मेरे आगे’. मराठीत मी त्याचे भाषांतर केले आहे. विविध व्यक्तिरेखांवर व आठवणींवर आधारित असे सुंदर लेख निदांनी लिहिले. विविध शायर, त्यांचे भावविश्व व त्या त्या वेळेचा कालखंड, संस्कृती, मानवी चेहरे, स्वभाव इत्यादि सगळं त्यांनी या लेखांमध्ये लिहिलं. मानवी स्वभावाविषयीची त्यांची जाण अफाट होती. ते माणसांना वाचू शकत होते पुस्तकांसारखे.
निदांचे एक मित्र अंत्यविधीच्या वेळी मला म्हणाले की निदा कबीरपंथी होते. निदांचे काही दोहे जगजितसिंगांनी गायले आहेत. ‘इनसाइट’ या अल्बममध्ये ते दोहे आहेत. त्यामध्ये निदांचं एक दार्शनिक रूप दिसतं. तत्त्वज्ञ निदा त्यात जाणवतात. 
दो और दो का जोड हमेशा 
चार कहा होता है,
सोच समझ वालों को थोडी
नादानी दे मौला,
बच्चा बोला देखकर मस्जीद आलिशान
अल्ला तेरे एक को इतना बडा मकान.
त्यांच्या काही गजलासुद्धा अप्रतिम आहेत.
दुनिया जिसे कहते है  जादू का खिलौना है, 
मिल जाये तो मिट्टी है  खो जाये तो सोना है.
त्यांची आणखी एक गजल.
अपनी मर्जी से कहॉँ  अपने सफर के हम है,
रुख हवाओंका जिधर का है  उधर के हम है.
निदांच्या लेखनात शब्द जिवंत होऊन यायचे. ‘होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है’, ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता’, ‘तु इस तरहा से मेरी जिंदगी मे शामील है’.   
जगजितसिंग आणि निदा फाजली यांची प्रदीर्घ काळ दोस्ती होती. निदांच्या अनेक गजला जगजितजींनी गायल्या. अनेक कार्यक्रम दोघांनी सोबत केले. अशा कार्यक्रमांमध्ये निदा स्वत:च्या गजलांचा अर्थ समजावून सांगत व जगजितजी त्या गजला गात. निदा फाजली व जगजितसिंग या दोघांनी मिळून अनेक अप्रतिम रचना निर्माण केल्या, त्या मैफली, तो काळ लाखो लोकांच्या भावविश्वाचा एक भाग बनलेला आहे. 
निदांचं खरं मोठेपण त्यांच्या मानवतेशी असलेल्या बांधिलकीत होतं. जीवनभर त्यांनी ही बांधिलकी मानली. अगदी 1992 च्या मुंबई दंगलीत त्यांना त्यांच्या धर्मामुळे एका हिंदू मित्रच्या घरी आसरा घ्यावा लागला. त्यावेळीदेखील त्यांचे मत पूर्वग्रहदूषित झाले नाही. ते मानवतेची गाथा जीवनभर गातच राहिले. त्यांच्या एका दोह्यामध्ये त्यांनी लिहिले. 
चाहे गीता बाचीये,  या पढीये कुराण,
तेरा मेरा प्यार ही,  हर पुस्तक का ज्ञान
त्यांच्या सुधारक व मानवतावादी विचारांमुळे कट्टरपंथी मुस्लिमांची प्रचंड नाराजी त्यांनी ओढवून घेतली. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील गरिबी, शोषण, बकालपणा बघून ते नेहमी विचारायचे की, जर हेच कायम राहणार होतं तर मग ही फाळणी का केली गेली? मानवता हाच निदांचा खरा धर्म होता, पूजा होती. 
घर से मस्जीद है बहोत दूर,  चलो यु करलो,
किसी रोते हुए,  बच्चे को हसाया जाये.
त्यांच्या या ओळी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतात. ‘जिंदगी हिसाबों से जी नही जाती’ हे निदांच्या एका लेखाचं शीर्षक होतं. निदांचं जीवनदेखील असंच चाकोरीबाहेरचं व अफाट होतं. जगताना त्यांनी कधी हिशेब केले नाहीत आणि नियतीनेदेखील त्यांना सर्व काही भरभरून दिले.
निदांनी आयुष्य बघितलेलं होतं. त्यांच्या डोळ्यांत कारुण्याची छटा होती, दुस:याचं दु:ख समजून घेण्याची इच्छा होती. दुस:याच्या अडचणी, वेदनांना आपलं समजण्याची भूमिका होती. जगभरातल्या विचारवंतांची पुस्तकं निदा वाचायचे. जागतिक, सामाजिक व राजकीय अंत:प्रवाहांची त्यांना सखोल जाण होती. निदांनी अनेक विषयांवर असंख्य पुस्तकं लिहिली. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घटनांवर ते अभ्यासपूर्ण बोलायचे व वेगळाच दृष्टिकोन आपल्या लक्षात आणून द्यायचे.
एकदा ते म्हणाले, कुठल्याही देशाची फाळणी केवळ धर्म वेगळे असल्यामुळे होत नाही. तसे असते तर पाकिस्तान व बांगलादेश वेगळे झाले नसते. धर्म सारखा असूनदेखील संस्कृती वेगळी असणं हेदेखील या देशांच्या फाळणीसाठीचं महत्त्वाचं कारण होतं. एखाद्या समाज शास्त्रज्ञासारखे ते बोलत असत. 
पण हे सगळं होतं तरीही मला निदा फाजलींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक एकाकीपण नेहमी दिसलं. गर्दीत असूनही एकटे विचारात हरवलेले. अगदी बोलतानादेखील ते विचार करीत, चिंतन करीत बोलत आहेत, असं जाणवायचं. अतिसंवेदनशील माणसांचं असं होतं. ज्यांनी जीवनात अफाट दु:ख बघितलेलं असतं त्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं, ज्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं तेवढी त्यांची जगाचं दु:ख समजून घेण्याची क्षमता विस्तारत जाते. 
निदांचं हृदय असं ज्ञानेश्वरांसारखं, तुकारामांसारखं होतं. निदा या शब्दाचा अर्थ ‘हाक’ असा होतो. निदा एक आकाश होते. निदा एक फकीर होते, निदा मानवतेचे वारकरी होते. निदांचं जीवन, निदांचं साहित्य, निदांच्या आठवणी आम्हाला हाच संदेश देतात की वातावरण कितीही गढूळ झालं तरी तुमचं अंत:करण गढूळ होऊ देऊ नका. मानवतेवरची श्रद्धा कायम ठेवा. 
निदांसारखा शायर पुन्हा होणार नाही. निदांच्या अंत्यविधीला मी गेलो, त्यावेळी तिथे अभिनेते रजा मुराद भेटले. मी त्यांना म्हटलं, आज आपण एका महान शायराला अखेरचा निरोप द्यायला आलेलो असताना मला तुमच्यावरच चित्रित झालेलं ते गाणं तीव्रपणो आठवतंय. 
मैं शायर बदनाम, मैं चला. मैं चला..
 
निदांचे जीवन हाच एक कादंबरीचा, चित्रपटाचा विषय आहे. फाळणी झाली तेव्हा त्यांचे सगळे कुटुंब पाकिस्तानात गेले तरीही निदा हट्टाने भारतातच राहिले. त्यावेळी ते म्हणाले, ‘एका कागदाच्या नकाशावर तुम्ही रेषा ओढाल आणि म्हणाल, की देशाची फाळणी झाली! मला हे मान्य नाही. फाळणी झाली हे मी कधीही मान्य करणार नाही.’ फार मोठी किंमत त्यांनी त्यांच्या या मतासाठी दिली. खरं तर निदा ज्यावेळी मुंबईत फुटपाथवर राहत होते, त्यावेळी त्यांचे भाऊ व सगळे कुटुंब पाकिस्तानात आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले होते. काही वर्षानी कुटुंबीयांनी पुन्हा निदांची समजूत काढली, मात्र निदा पाकिस्तानात गेले नाहीत.

Wednesday, March 18, 2020

वपु विचार

स्वत:चेच सांत्वन स्वत:चे करायची वेळ आली कि समजावे एकटेपणाचे ढग आपल्यावर घुमू लागलेत.
आभाळ शांत झालंय.निरभ्र झालय.फिकट झालंय…
पण आभाळ कधी एकाच रंगावर स्थिर राहिलंय का?
ढग येतात,जातात, वादळं उठतात,आभाळ काळवंडून येतं, पाउस पडतो...

रंगांची उधळण सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे आभाळ नि
भावनांच्या रंगांची सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे माणसाचे मन.
माणूस कधी कधी पूर्ण भरलेला असतो तर कधी पूर्ण रिता असतो.दोन्ही स्थितीत चंचलता असते.या दोघांच्या मध्ये असते ते स्थैर्य.

जास्त असले कि ते गमावू हि भीती आणि कमी असले तर काहीच नाही हि कुरकुर.या गोष्टी शांत जगू देत नाहीत.
स्थैर्यात जगणारी माणसं तशी कमीच असतात.सापडतात ती हि वृद्ध झालेली, काही वयाने तर काही मनाने.
बहुतेकदा घालवलेल्या आयुष्यात काही चुका आपण किती नकळत केल्या आणि उगाच केल्या याचा उलघडा झालेली....
आता त्यावर काहीच उपाय नाहीयेय,वेळ निघून गेलीय अशी जाणीव झालेली...आणि म्हणून शांत झालेली....

जन्मासोबत प्रवास सुरु होतो,सुरु केलेला प्रवास कुठे संपणार हे माहित नसतं...वाटा-वळणे घेत घेत आयुष्य अश्या ठिकाणी आणून सोडतं कि ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता....
क्षणाक्षणाला क्षण रंग बदलतो,आयुष्य कात टाकतं...सुख असो वा दु:ख.ते त्या क्षणासोबत क्षणाने जुनं होत जातं...

आयुष्य हे मानवी अंदाजाच्या मुठीत कधीच मावले नाही...ते विशाल असतं...समजायला उमजायला कठीण.....
व. पु....

#वपु #vapu

Sunday, March 15, 2020

मुलांचं शिक्षण

#विजयखाडिलकर 
जुनंच, परत एकदा, 
६ फेब्रुवारी २०१५ चे विचार   ...
घडंण  ..
असं होऊ नये खरं तर, मुलांचं शिक्षण आणि आपल्या इच्छेनुसार त्यानां विविध छंद जोपासायला लावतानां!

आपल्या लेकाला/लेकीला अभ्यासाशिवाय अनेक खेळात, गोष्टीत प्राविण्य मिळालंच पाहिजे. हे दिवस त्याने फक्त शिकलच पाहिजे, जराही वेळ फुकट घालवता नये.

आम्हाला ह्यातल काहीही करता आल नाही इच्छा असुनही

आज आम्हाला काही कमी नाही आणि आमची कितिही खर्च करायची तयारी आहे.

आम्ही त्याची प्रत्येक डिमांड लगेच पुरी करतो, आणि आमची अपेक्षा त्यानेच  पुर्ण करायचीये एकुलता एकच तर आहे!

या आणि अशा इच्छांमधे त्या लहानग्याची खरंच घुसमट होते.

आपल्याच मुलगा-सुन किंवा लेक-जावयाला आई-वडिल काही सांगतील तर 'तुमचा काळ वेगळा होता, आणि आम्ही नाहिका तुमच्याच इच्छेनुसार वागलो तेव्हां' असा प्रश्नही गर्भित असतो मुलांच्या नजरेत!

आम्ही मात्र आमच्या मुलींना दरवर्षी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणं एवढीच सक्ती केली आणि उच्च शिक्षणही त्यांच्या आवडीनुसारच दिलं.

https://www.facebook.com/vijay.khadilkar.96

Friday, March 13, 2020

श्रीरंग

श्रीरंगात रंगले
.
रंगले रंगात कितीदा,
पुसून गेले ते परी,
रंगवी तुझ्याच रंगी,
रंगपंचमी ती खरी।
अनंगरंगा मागणे हे,
हे मुरारी श्रीहरी,
रंगवी तुझ्याच रंगी,
रंगपंचमी ती खरी।
जीवनाचे वस्त्र हे,
भक्तिभाव हा उरी,
श्रीरंगात रंगले,
रंगपंचमी ती खरी।

हे मुरारी, श्रीहरी, तुझ्याच रंगात माझ्या जीवनाचे वस्त्र रंगव अशी आळवणी करावीशी वाटतेय. कोण तो श्रीहरी? खरंच असा कुणी आहे? मुळात मी कोण आहे? का मी रंगपंचमीची आणि तीही खऱ्या खऱ्या अपेक्षा करतेय?

खरंच कोण आहे मी? गोकुळातली कोणी गवळण? कोण होत्या गोकुळातल्या गवळणी आणि त्या श्रीकृष्णकडून रंगवून घेण्यात का स्वतःला धन्य मानीत? एकनाथ महाराज म्हणतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती।

होय! त्या श्रुती होत्या. नेती नेती म्हणत माघारी फिरलेल्या गोपींच्या रूपाने गोकुळात आल्या. रासक्रीडेच्या निमित्ताने त्या कृष्णाच्या सुखप्राप्तीचा अनुभव घेऊ लागल्या. रंगपंचमी खेळू लागल्या. त्यांनी लोकांना भक्तीची परमसीमा दाखवली. मधुरा भक्ती कशी असते ते दाखवलं. जीवनाचा आनंद परमेश्‍वराच्या सान्निध्यात कसा घ्यायचा ते दाखवलं. निसर्गाशी एकरूप होत एक एक सण, एक एक आनंदसोहळा कसा बनवून टाकायचा ते दाखवलं.
श्रीकृष्ण गोपींवर आनंदाचे नवे नवे रंग टाकायचा. त्याच्याखेरीज आनंदाची इतकी सुंदर रंगपंचमी कोण खेळणार? बघता बघता सर्व गोपगोपिकांना एकमेकांमध्ये कृष्ण दिसू लागायचा. त्याला आपल्या रंगाने ते रंगवू बघायचे आणि त्याच्याकडून आपल्याला रंगवू बघायचे इतकी सुंदर रंगपंचमी...

हे आनंदघना, त्या रंगपंचमीची आस लागलीय तशी रंगपंचमी अनुभवायचीय...!

क्षणैक रंगी रंगणे,
क्षणैक ते आनंदणे,
क्षणैक तो जल्लोष अन्‌,
क्षणैक सुख पाहुणे।
शाश्‍वताची ओढ ती,
अशी मनास लागली,
लुटुपुटीत रंगणे,
हौस आता भागली।
एकदाच रे हरी,
ओती रंग मजवरी
रंग रंग रंगू दे,
अंतरी निरंतरी...।

(सौ. शैलजा शेवडे)
.
.

Thursday, March 12, 2020

मला उंच उडू दे बाल्यनाट्यछटा

माझी पुस्तकं 
मला उंच उडू दे - बालनाट्यछटा
प्रथम आवृत्ती - ४ एप्रिल २०१७
प्रकाशक - जे के मीडीया, प्रकाशन, मुंबई
पृष्ठे - ४० ,किंमत - ८०/- रु.

आनंदाची बाग

आनंदाची बाग - बालकथासंग्रह 
प्रथम आवृत्ती - २३ आॅक्टोबर २०१५
प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
पृष्ठे - ४८ किंमत - ८० रु.
'आनंदाची बाग' या बालकथासंग्रहाला सन २०१६ मध्ये अमरावतीचा सूर्यकांतादेवी  पोटे राज्यस्तरीय उत्कृष्ट बालवाङ्मय  पुरस्कार मिळालाय. महाराष्ट्र टाइम्स मध्ये ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डाॅ.सुरेश सावंत (नांदेड)  यांनी या पुस्तकावर लिहिलेले परीक्षण.
#एकनाथ आव्हाड

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांची भेट

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांनी माझ्या दिल्ली येथील घरी भेट दिली. यावेळी मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुस्तक भेट दिले. तसेच त्यांना छत्रपती घराण्याचा इतिहास  समजावून सांगितला. 19 फेब्रुवारी ला दिल्ली शिवजयंती मध्ये ते इतर 11 राजदूतांमध्ये उपस्थित होते. त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट झाली झाली.माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलर च्या विरोधात लढा दिला होता. हा एक समान आणि भावनिक धागा आमच्यात तयार  झाला आहे. या मैत्रीचा सदुपयोग महाराष्ट्रासाठी, देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे, असा माझा उद्देश आहे. 

गडकिल्ले संवर्धनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महाराष्ट्रातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळमुक्तीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ कसा घेता येईल?  यावर सखोल चर्चा झाली. ग्राम विकासाबाबतही त्यांचा दृष्टिकोन समजून घेता आला.

देशाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याकरिता त्यांनी केलेली उपाययोजना ऐकून थक्क व्हायला होतं. आपल्याला याबाबतही खूप काही शिकावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर पद्धत आणि इजरायल च्या मोसाद सारख्या गुप्तहेर व्यवस्थेमध्ये साम्य दिसून आल्याचे मी त्यांना नमूद केले. त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. 

औरंगजेबाच्या तुलनेत शिवाजी महाराजांचे राज्य अत्यंत छोटे होते. चहू बाजूंनी दुश्मनांचा वेढा होता. अगदी तीच परिस्थिती आज इजरायल ची आहे. स्वराज्याचा विकास करण्यात त्याकाळी महाराज यशस्वी झाले आणि आज इजरायल सुद्धा सर्वार्थाने यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे, विकास हा सर्वसमावेशक विचार करून, त्यावर व्यापक उपाययोजना करून साधता येतो.  सुटा सुटा विचार करून साधता येत नाही. 
जसे, इजरायल च्या सरकारांनी, त्या देशाचा दक्षिण भाग जो, वाळवंटी आहे, त्यावर वेगळ्या पद्धतीने मात केली, आणि उत्तर भाग जो निम्न वाळवंटी आहे त्यावर वेगळ्या उपाययोजना केल्या. त्या दोन्ही मध्ये एकप्रकारे सुसूत्रता ठेवली गेली. व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आला.

आपल्या राज्यात सहसा असे दिसून येते, की ज्या भागातील शक्तिशाली नेता सत्तेत त्याच्या मतदारसंघात किंवा विभागात पैसा जास्त वळवला जातो. केवळ पैसा वळवला म्हणजे विकास साधला असा समज आपण करून घेतो. त्या पैश्यांच पुढे नेमकं काय झालं? याच उत्तर सापडत नाही. म्हणून आपल्या राज्यासमोरील किंवा लोकांसमोरील मूळ प्रश्न तसेच  शिल्लक राहून जातात. 

रॉन माल्का यांचा मला आग्रह आहे, की मी त्यांच्या देशाला भेट द्यावी. काही गोष्टी पहाव्यात. मी म्हणालो की, मी केवळ भेट देणार नाही, तर अभ्यास दौरा करेन. मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्या शिकलेल्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्राला कसा करून देता येईल यावर कामही करायचे आहे. 

एवढासा देश पण तो एवढा शक्तिशाली कसा? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यांच्या राजदूतांच्या सहवासातून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सापडून गेली. अजूनही खूप काही शिकायला मिळालं. माझ्या महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनात सुद्धा बराच सुधार झाला.

यावेळी आमच्या सौ. संयोगीताराजे, चिरंजीव शहाजी राजे, कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे, पंजाब चे खासदार प्रतापसिंह बाजवा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार रोहित गांधी, व तसेच दिल्ली मधील माझे दोन मित्र उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे 

लेख

#लेख #वाचक #महिलाकंडक्टर 
एक अनुभव

एस.टी.ने प्रवास करत होतो, महिला कंडक्टर होती. भराभर तिकीट वाटप, पैसे देण्याघेण्यातली चपळता, इतरांपेक्षा वेगाने केलेला प्रवासी, तिकिटे व पैशांचा हिशेब माझे लक्ष वेधुन घेत होता. सर्व हिशेब पूर्णकरुन बसवर आत्मविश्वासाने तिने टाकलेली नजर व केलेली स्वतःची खातरी हे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.
ती आपल्या सिटवर बसली, बॅगेतून पुस्तक व छोटी टीप्पण वही पेन्सिल काढून तिने वाचनास सुरुवात केली. पुढिल दोन तासांनी चहापाण्याचा थांबा होता, त्यामुळे ती वाचनात मग्न होती. दोन तासांनी ठराविक हाॅटेलवर गाडी थांबली, खणखणित आवाजात तिने गाडी केवळ पंधरा मिनिटेच थांबेल ही सुचना देवून, स्वतःचा डबा काढला व पोळी भाजी खाण्याससुरुवात केली. मी नैसर्गिक विधी उरकुन चहा न घेताच परत बसमधे आलो, तिच्या वाचनाबद्य औत्सुक्य होते. पुस्तक पाहुन मी उडालो, सहसा तरुण मुलमुली अशी पुस्तक वाचत नाहीत, पुस्तक होते,  नरहर कुरुंदकरांचे "जागर". मी तिला या पुस्तकाच्या निवडीबद्दल विचारले. मग तीने थोडक्यात सांगायला सुरुवात केली. ती खेडेगावातली, वडीलांची तीन एकर शेती, लहान दोन भाऊ, वेडसर काका, वडलांनी गेल्याच वर्षी आत्माहत्या केली. सर्व भार हीच्यावर येवून पडला. बीए. पास झाली व एस.टी.त कंडक्टर म्हणून मुलाखतिला गेली. आत्माहत्याग्रस्त म्हणून अनुकंपा न दाखवता, माझ्या गुणांवर नोकरी द्या असे तिने सांगितले.
वीसएक वर्षाची ही काळीसावळी, तरतरीत नाकेली, टापटीप मुलगी मला हिराॅईन पेक्षा जास्त भावली. आता नोकरी बरोबर राज्य स्पर्धा परिक्षेचा ती अभ्यास करत आहे. समाजशास्त्र केवळ अभ्यासक्रमातुन समजत नाही तर कुरुंदकर, इरावती कर्वे यांच्या लिखाणातुन या विषयांचे आकलन होते, हा तिचा विश्वास पाहुन चक्रावून गेलो. तिने त्या दिवशी धक्केच द्यायचे ठरवले होते. तिने वसंतराव नगरकरांचे "जेनेसिस आॅफ पाकिस्तान" पटवर्धनांचे " "कम्युनल ट्रँगल" अश्या बर्‍याच लेखकांच्या पुस्तकांचा उल्लेख केला. 
घरची शेती बागायती करायची, त्यासाठी मेहनत, नोकरी, एम.ए.चा व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. खरच ही अष्टभूजा भासली.
मी तिच्या डोक्यावर हातठेवून शुभेच्छा व आशीर्वाद दिले, तर चक्क माझ्या पाया पडली. नरहर कुरुंदकरांची जवळ जवळ सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत, ती मी तिला देवू केली, व सांगितले की मी स्वतः ती तुझ्या घरपोच करीन, तुझा वेळ वाया जायला नको ही भावना.
क्षणंक्षणांचा व वेळेचे गणित तिच्या डायरीत मी वाचले.
वडलांच्या आत्महत्येबद्दल ती सर्व दोष वडलांना देते, कोणताही कडवटपणा सरकार बद्दल तिला नाही. जुगार व व्यसन म्हणून ते कर्जबाजारी झाले होते, ही सच्चाई तिने लपवली नाही. की फालतू अवडंबर, नव्हते. सरकारनी मला एस.टी.त सामावले असल्याचा कृतज्ञ भाव तिच्या शब्दाशब्दात होता.
सलाम या रणरागिणीला! व अनेक अनेक शुभेच्छा. लवकरच तिला लालदिव्याच्या गाडीतुन दिमाखाने मिरवायला मिळो ही इच्छा!
आशिष जोशी

संग्रहित

Tuesday, March 10, 2020

सुभाषित १

स्त्रियो हि नाम खल्वेता निसर्गादेव पण्डिताः। 
पुरुषाणां तु पाण्डित्यं शास्त्रैरेवोपदिश्यते।। 
(मृच्छकटिक-अंक ४)
स्त्रिया ह्या खरोखर जन्मतःच बुध्दीमान व हुशार असतात. पुरुषांना मात्र शास्त्रांच्या मदतीने शहाणपण शिकावे लागते. 


Monday, March 9, 2020

वपु विचार

चांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जळून जाव्यात....
कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाणे सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं.
#vapu

Saturday, March 7, 2020

मराठी बोला चळवळ १

तारक मेहता.." नावाच्या कधीच न पाहिलेल्या मालिकेच्या "मुंबईची भाषा कोणती?" या वादावर काही निरीक्षणे.

१) अनेक लोक याला विरोध करायला सरसावले. अनेक मराठीप्रेमींनी हा विषय समाज माध्यमांत उचलून धरला आणि त्याबद्दल चीड व्यक्त केली हे चांगले लक्षण आहे. लोक आता अधिक सजग होत आहेत हे उल्लेखनीय आहे.

२) निर्मात्याने निवेदन देताना "मी महाराष्ट्रीय गुजराती आहे, सर्व भाषांचा आदर करतो."  असा फापट पसारा मांडला पण माफी सोडा साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. 'मालिकेतील तो भाग पुन्हा चित्रित करून चूक सुधारू.'  हे तर लांबच. हा माज का येतो? कारण आपण यांना आधीपासून "मराठीच हवी." असं स्पष्ट शब्दांत न सांगता अतिसहिष्णुपणे यांच्या भाषेत व्यवहार करत गेलो. 

३) (अजूनपर्यंत तरी) राजकीय पक्षांमध्ये मनसे आणि मराठी कालावंतांपैकी सुबोध भावे यांनीच या विषयावर भूमिका मांडली. बाकीच्यांना निवडणुका आणि चित्रपट येणार असतील तेव्हाच का मराठी आठवते?  मराठी हा सर्वपक्षीय आणि सर्व कलावंतांचा मुद्दा असायला हवा हे आपण मराठी लोकांनीच यांच्या डोक्यात बसवायला हवं आणि त्यासाठी मराठी एकगठ्ठा मते किंवा मराठी मनोरंजनाचा प्रेक्षक निर्माण व्हायला हवा. 

४) आपण जर या मालिकेतील नट आणि निर्माते यांच्याकडून कोरडी माफी लिहून घेतली आणि उद्या परत यांच्याच मालिका पाहणार असू, तर त्याला काहीही अर्थ नाही. 
या मालिका पहाणे बंद करणे हाच एकमेव उपाय करायला हवा. 

५) चेन्नईची भाषा तामिळ पण मुंबईची मराठी असं का म्हटलं नाही याचा आपण जरा अधिक गंभीरपणे विचार करायला हवा.  आज व्हाट्सअप फेसबूक ट्विटरवर उर बडवून आपण या संवादाला विरोध केला आणि उद्या घराबाहेर पडल्यावर बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षावाले, भाजीविके, फळविके यांच्याशी मराठीतच बोलणार नसू तर "मुंबईची भाषा मराठी नाही हे आपणच सिद्ध करत नाही का?" 

त्यामुळे फक्त मराठी मनोरंजनाला प्राधान्य आणि फक्त मराठीत व्यवहार करणार असा निर्धार सुद्धा करायलाच हवा तर येत्या काळात परिस्थिती बदलताना दिसेल.

- चंदन तहसीलदार


मराठी एकीकरण समिती १

अखेर लेखी तक्रार दाखल

कारवाई करून मराठी बोलणारा अधिकारी  मुंबई शहरासाठी नेमावा मुख्यमंत्री महोदयांकडे करणार मागणी - गोवर्धन देशमुख

"मुंबई शहराचे नवनिर्वाचित #पोलीस आयुक्त सेवेवर असताना माध्यमांशी बोलताना किंवा इतर ठिकाणी #मराठी भाषेचा वापर करत नसल्याबद्दल #मराठीएकीकरणसमिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंदा पाटील आणि सहकारी यांनी मा. गृहमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली"


Thursday, March 5, 2020

अंक वाचन

मराठीत अंक वाचन करा ४६७८८६३२२७८८७६४

इंग्रजी ची इतकी सवय झाली की भ्रमणध्वनी क्रमांक मराठी सांगताच येत नाही! मराठी व्यवहाराची भाषा नाही झाली अजून!

 #ईअक्षरमन

Tuesday, March 3, 2020

व्याकरण १.८

व्याकरण.... भाग (८)......जोडाक्षर
----------------------------------------------
   कधीकधी उच्चारांतला सारखेपणा लेखनात दोष निर्माण करतो. आता हेच बघा ना....श व श्य आणि ज व ज्य यांच्या उच्चारात थोडा सारखेपणा आहे. इथेच बरेच जण घोटाळा करताना दिसतात. ते जास्त ऐवजी ज्यास्त आणि राजाला ऐवजी राज्याला असे चुकीचे लिहितात. हं.... पण प्रदेश या अर्थाने लिहिताना  मात्र  राज्याला असेच लिहावे..... 
    दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे मूळ शब्द आहे 'कसे'...'कसा '  पण या शब्दाला जेव्हा  विभक्ती प्रत्यय ( ला, स, ने, शी, तून, हून, चा,ची,चे, आत ) लागतात तेव्हा मात्र  लिहिताना हीच गडबड होते. आणि लिहिले जाते -कश्याला, कश्याने, कश्यात, कश्याचे/ची/चा..वगैरे...तसेच असे..असा या शब्दाचेही...इथेही अश्याने, अश्याचा, अश्यांना असे लिहिले जाते..... आणि हे सर्रास चूक आहे. लेखन सदोष  होते अशाने...कसे /असे/तसे , कसा /असा/तसा ..या शब्दांना जेव्हा  विभक्ती प्रत्यय लावायचे असतात तेव्हा  तिथे श्य हे जोडाक्षर नसते..मूळ शब्दांत नाही तर आपण बळेच का आणायचे ? फक्त  स चा श करायचा नि प्रत्यय लावायचा. म्हणजे कशाला, कशाने, कशातून, कशाचे,कशात , अशाने, अशांचे, तशांचे वगैरे लिहावे. तसेच मासा ,ससा, घसा, यांनाही हाच नियम लागू होतो. ...पण हं, मुळात माशी /मिशी असेल तर मात्र  माश्यांनी, माश्यांचे, मिश्यांचे, मिश्यांना असे श्य लिहावे..... 
कसे/असे / या शब्दांत स आहे .म्हणून  स चा श होताना त्याला आपण य हा आगाऊचा जोडू नये.. आणि श्य असे लिहूच नये..... 
आता  जे जे कश्याला वगैरे लिहित असतील ते ते आपले लेखन बदलतील असे समजू या...
कारण शुद्धलेखन  हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे....

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.७

व्याकरण भाग  ( ७)....जोडाक्षर 

      अनेक शब्दांत स्र हे जोडाक्षर येत असल्याने विद्यार्थी असो वा मराठीचे अनेक शिक्षक /प्राध्यापक /कवी/लेखकसुद्धा स्र आणि  स्त्र दोन्हीही शब्द सारखेच उच्चारतात आणि  तसेच सारखे लिहितातही. दिसण्यात जरासे साम्य असल्याने व दोन्हीचे उच्चार सारखेच केल्या जात असल्याने हे दोन्हीही शब्द सारखेच लिहिले जातात आणि  इथेच शुद्धलेखन चुकते.
     स्र आणि  स्त्र यातला वेगळेपणा समजून घेणे महत्त्वाचे ..जरी दिसण्यात सारखे भासत असले तरी ते सारखे नाहीत.
पहिल्या स्र मध्ये स्+र् (=स्र)  असे दोनच वर्ण आहेत. म्हणून  उच्चारातही केवळ स् र् हे दोनच वर्ण घ्यावे. स्र असलेले पुढील शब्द लक्षात ठेवले तर अधिक स्पष्ट होईल,,
सहस्र...दशसहस्र...सहस्रावधी...सहस्रबुद्धे...सहस्ररश्मी...अजस्र....हिंस्र...,रक्तस्राव..स्रोत वगैरे..यात स्+र् असाच उच्चार करून  स् च्या पोटात पूर्ण र लिहावा...
      दुसऱ्या स्त्र मध्ये स्+त्+र (=स्त्र)  असे तीन वर्ण आहेत. याचा उच्चार स् त् आणि  र मिळून स्त्र असा करावा आणि  तसाच लिहावाही.
अस्त्र..शस्त्र..निःशस्त्र...स्त्री  या शब्दांत अर्धा स्  .,अर्धा  त्   आणि  पूर्ण र आहे....
पहिल्या ठिकाणी  स् आणि  र् असे दोनच वर्ण आहेत तर दुसऱ्या ठिकाणी  स् त् आणि  र असे तीन वर्ण आहेत..तर असे उच्चार करून त्याचे वर दिलेले शब्द लक्षात ठेवले तर स्र आणि  स्त्र चुकणार  नाही. फक्त  लिहिताना मनात जाणीवपूर्वक उच्चार करावा...
मला वाटते आता हिंस्र..अजस्र..सहस्र...स्रोत आणि  
अस्त्र..स्त्री  या शब्दात गोंधळ उडणार नाही..हो ना ?
कारण #शुद्धलेखन_हा_आग्रह_न_राहता_ती
#सवय_झाली_पाहिजे.

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.६

व्याकरण भाग ६-----जोडाक्षरे 

     
आज आणखी दोन शब्दांबद्दल विचार करू या.
द्वितीय आणि  उद्धार  असे दोन शब्द आहेत की ज्यांचे जोडाक्षर लिहताना भल्याभल्यांचा गोंधळ उडतो, यात नेमका अर्धा ( हलंत)कोण ? द्वितीय मध्ये द् की व् ? आणि  उद्धारमध्ये द् की ध् ? या गफलतीमुळे मग लेखन चुकत जाते बघा. परंतु  थोडे मूळ समजून घेतले तर या चुका होणार नाहीत. 
द् आणि  ध जेव्हा एकत्र येतात तेव्हा द हलंत म्हणजे अर्धा 'द्' आणि  ध हा पूर्ण असतो. मराठीत पोटातील अक्षर  हे पूर्ण समजायचे असते. म्हणून  द् च्या पोटात ध लिहावे.जसे की- द्ध... इथे दिसताना आपल्याला  अर्धा ध् दिसतो व द् हा पूर्ण दिसतो. पण द चे खालील शेपूट हे द चे नसून पूर्ण  ध चे आहे व वर अर्धा द आहे. म्हणून  हे द्ध असे दिसते. ते तसेच लिहावे. नाहीतर 'द् ध' असे सुटे वर्ण लिहावे.
     म्हणून  उद्धार हा शब्द  उ+द्+धा+र असा क्रम लक्षात ठेवून लिहावा म्हणजे चुकणार नाही. 
दुसरे उदा.-- आम्र...यात  र साठी दिलेली तिरपी रेघ हा अर्धा र दर्शवतो. व म हा पूर्ण दिसतो. पण तसे नाहीय. इथे आ+म्+र म्हणजे  म हा अर्धा व र हा पूर्ण आहे. म्हणून  म च्या पोटात र  लिहलेला आहे . 
तसाच आग्रह..आ+ग्+र+ह..
प्रथम.,आक्रीत वगैरे असेच लिहावे..अनुक्रमे प्+र......
                                                             क्+री
पोटातले अक्षर हे पूर्ण असते हे फक्त ध्यानात ठेवावे.
अजून काही उदा.--- 
शु+द्+ध=शुद्ध  
बु+द्+ध= बुद्ध
उ+द्+ध+व=उद्धव
इथे द्ध यायला हवे. ध्द असे नको.इथे ध च्या लेखनाच्या जागेत फरक दिसतो..पण तो क्रमानुसार आहे. ध्द असे लिहिले तर ध अर्धा व द पूर्ण  होईल. आपल्याला  द् अर्धा व ध हा पूर्ण पाहिजे. म्हणून  द्ध असाच लिहावा. ध हा द च्या पोटात(द्ध) लिहावा. ध्द असे लिहू नये.
तसेच द्वितीय मधला द्व..इथेही आपल्याला  द् अर्धा आणि  व पूर्ण  पाहिजे. म्हणून द च्या पोटात व लिहावा.उदा.--द्विज, द्वापार,द्वंद्व वगैरे...आधी द् लिहावा मग व . तेव्हा द्व असे दिसेल. व्द असे लिहू नये. असे लिहिले तर व् अर्धा आणि  द हा पूर्ण  होईल. जे पूर्ण  अक्षर  लिहायचे ते खालच्या भागाला "द्ध / द्व " असे दिसेल. "ध्द /व्द"  असे वरच्या भागाला नाही.
एकतर द्ध / द्व  असे जोडाक्षर लिहावे ..नाहीतर , द् ध/  द् व असे सुटे वर्ण लिहावे..हल्ली असेच सुटे लिहतात. पण ध्द /व्द असे अजिबात लिहू नये. शुद्धलेखन चुकेल.
  लिहून बघा. कारण शुद्धलेखन  हा आग्रह न राहता ती सवय व्हायला पाहिजे.
आणि  काही जोडाक्षरे आहेत..ते पुढील भागात........

....डाॕ. वसुधा वैद्य

व्याकरण १.५

भाग (५)   #व्याकरण-जोडाक्षरे
    
    ऱ्हस्व दीर्घानंतर आज आपण जोडाक्षरांकडे वळतोय,.बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की 'महत्त्व' हा शब्द नेमका कसा लिहावा..यातला त् हा एकदा की दोनदा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. उच्चारताना तर एकदाच ' त् ' येतो मग लेखनात दोनदा का?
  याचे उत्तर अगदी सोपे आहे. 
 मुळात महत् असा शब्द आहे . यात शेवटी 'त्' आहे. याचा अर्थ होतो 'मोठे'. आणि  त्याला 'त्व' हा शब्द जोडला जातो. त्याचा अर्थ होतो 'पणा'. म्हणून मोठेपणा या अर्थाने लिहायचे असते 'महत्त्व'. इथे महत् मधील 'त्' आणि  त्व मधील 'त्' मिळून दोनदा 'त्' लिहावा.म्हणून  'महत्त्व' असे लिहावे.
  असेच आणखी काही उदाहरणे देता येतील.
सत् म्हणजे चांगले आणि  त्व म्हणजे पणा. म्हणून  सत्त्व म्हणजे चांगुलपणा. 
तत् म्हणजे  ते (विचार या अर्थाने) आणि  त्व म्हणजे पणा. म्हणून  तत्त्व 
व्यक्तिमत् म्हणजे  मानव आणि  त्व म्हणजे पणा..म्हणून  व्यक्तिमत्त्व .
तत् म्हणजे ते (तो विचार) आणि  ज्ञ म्हणजे जाणणारा.म्हणून  तज्ज्ञ  असा शब्द लिहावा. येथे संधीनियमानुसार  त् चा ज् झालेला आहे. म्हणून तज्ज्ञ  म्हणजे  ते जाणणारा . 
हे झाले दोनदा त् येणारे शब्द..कारण त्यांच्या मूळ शब्दाच्या शेवटी त् असतो ..पण असेही शब्द आहेत की ज्यात आपल्याला एकदाच त् दिसतो वा लिहिला जातो.जसे अस्तित्व , पालकत्व, मातृत्व, शत्रुत्व, कर्तृत्व ...वगैरे.
मग पुन्हा प्रश्न असा की इथे का एकदाच त् ????
याचेही उत्तर सोप्पे म्हणजे  मुळात अस्तित्व वगैरे या शब्दांत शेवटी त् नसतो.जसे अस्तित्व मध्ये अस्ति (असणे) आणि  त्व(पणा).  इथे त्व मधलाच त् येतो म्हणून  इथे एकदाच त् लिहावा..म्हणून अस्तित्व .
याप्रमाणेच 
पालक+त्व=पालकत्व
मातृ+त्व   = मातृत्व
कर्तृ +त्व  = कर्तृत्व ..तसेच
शत्रुत्व, व्यक्तित्व..वगैरे..
  म्हणून  एकच लक्षात ठेवायचे की मूळ शब्दांत शेवटी 'त्' आणि  त्व मधला 'त्' मिळून शब्द बनत असेल तर दोनदा 'त्' लिहावा आणि  ज्या मूळ शब्दांत शेवटी त् नसेल तर फक्त  त्व मधलाच 'त्' मिळून शब्द बनत असेल तर एकदाच 'त्' लिहावा.म्हणून 
 महत्+त्व        =महत्त्व 
व्यक्तिमत् +त्व  =व्यक्तिमत्त्व 
आस्ति+त्व       =अस्तित्व 
व्यक्ती +त्व       = व्यक्तित्व 
   आता आपण योग्य  'त्'  लिहू शकू असे मला वाटते..हो ना!
 कारण शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
       ----- डाॕ. वसुधा वैद्य

व्याकरण १.४

व्याकरण भाग (४)     ऱ्हस्वदीर्घ

      ऱ्हस्वदीर्घाच्या पुढील नियमाचा विचार करण्यापूर्वी 'अकारान्त' ही संकल्पना समजून घेऊ या. ज्या शब्दाचा उच्चार करताना वा लिहताना शेवटी 'अ' हा स्वर येतो, म्हणजेच ज्या शब्दाच्या शेवटी (अंती) 'अ' स्वर असतो तो 'अकारान्त' शब्द होय, उदा.-'नियम' या शब्दात शेवटी म्+अ असा वर्ण आहे . म्हणून  तो अकारान्त....तर आता अकारान्त समजले.
       मराठीत  अशा अकारान्त शब्दांच्या आधी जो इकार (वेलांटी) आणि  जो उकार असतो तो कायम दीर्घच लिहावा. मग तो शब्द कितीही अक्षरी असो.
उदा.-  कठीण   या शब्दात ण हे अक्षर अकारान्त (ण्+अ) आहे. म्हणून  त्या आधीची ठ ची वेलांटी (ठी) ही दीर्घ झालेली आहे. याप्रमाणेच...
उदा.--  पुढील, नीट, रतीब, विहीर, ऊस, पाऊस, तूप, फूल, पीठ, अनूप, खडूस, अवीट वगैरे. वगैरे..
परंतु हा नियम फक्त  मराठीतील शब्दांसाठीच लागू होतो. पण संस्कृतमधून मराठीत  जसेच्या तसे स्वीकारलेले जे तत्सम शब्द असतात ते त्याच्या मुळाप्रमाणे ऱ्हस्व /दीर्घ  लिहावेत. 
उदा.-  विष, गुण, समुह,अकल्पित, अवचित,  पिक(कोकीळ) [ हं...इथे पिक हा तत्सम शब्द असल्यामुळे तो तसाच म्हणजे ऱ्हस्व  लिहिलाय..पण कोकीळ हा मराठीतला शब्द म्हणून  नियमाप्रमाणे  दीर्घ  'की' लिहिलीय]    ., न्यायाधीश, व्यूह, रूप, गणित वगैरे..वगैरे
           म्हणून  कोणते शब्द मराठीतले आणि  कोणते संस्कृतमधून आलेले ते एकदा  माहीत असले की हे नियम आणि  त्यानुसार लेखन करणे अतिशय सोपे काम असते..त्याविषयी म्हणजे  तत्सम आणि  तद्भव , मराठी आणि  पारभाषिक शब्दांविषयी स्वतंत्र पोस्ट देईलच.
  तोपर्यंत  या नियमानुसार लिहायचं..कारण..
  शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.
            होय ना .!

डॉ वसुधा वैद्य 

व्याकरण १.३

व्याकरण भाग (३)        -हस्व दीर्घ
                     ..............
                  बरेचदा मला अशी विचारणा होत असते की, अमुक अमुक शब्द नेमका काय..तो -हस्वही दिसतो नि दीर्घही..जसा ' कवि' हा शब्द -हस्वही असतो नि कवी असा दीर्घही..सामान्यपणे शब्दांच्या शेवटची इ-कार उ-काराची मात्रा ही दीर्घच लिहिली जाते. पण काही शब्द -हस्वही असतात .
उदा. -तथापि वगैरे..
आज मला तेच स्पष्ट करावेसे वाटतेय..
   वास्तविक कवि, बुद्धि, गति, मति हे सारे तत्सम म्हणजेच संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द आहेत.पण हेच तत्सम शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा ते कायम दीर्घ लिहायचे असतात. 
उदा. 'कवि' हा तत्सम शब्द  मराठीत 
         'कवी' असा लिहतात.
तसेच बुद्धि-बुद्धी, गति-गती, वगैरे.
तत्सम/तद्भव जाऊ द्या... तो नंतरचा विषय.. फक्त एकच लक्षात ठेवायचे ते म्हणजे  मराठीत लिहिताना शब्दाच्या शेवटी येणारा उ-कार व इ-कार हा कायमच दीर्घ लिहावा.उदा.---पाटी, जादू, पैलू, कडू, पिशवी, माती, दिल्ली, वाहिली, अंजली, शेवंती, झाडी, सारू, लक्ष्मी , कधी, पूर्वी, बिंदू, लिहू, कुलगुरू, दिली,इत्यादी वगैरे सर्वच शब्द दीर्घ लिहावे.
पण हां, एक लक्षात असू द्यावे की, 'परंतु', 'यथामति', व 'तथापि ' ही संस्कृतमधून जशीच्या तशी ( तत्सम ) मराठीतील अव्यये -हस्व लिहावे आणि  बाकी सारे दीर्घ.
   दुसरे असे की, काही एकाक्षरी शब्द असतात...जसे--------मी, तू, ती, ही, की, पी, जी,यासारखे अन्य एकाक्षरी शब्द कायमच दीर्घ लिहावे.फक्त ..फक्त  'आणि'  व  'नि' ही मराठीतील दोन्ही अव्यये मात्र  -हस्वच लिहावीत. 
     थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतमधून मराठीत आलेली परंतु, यथामति, आणि  तथापि  तसेच मराठीतील 'आणि ' व  'नि' ही पाचही अव्यये ( परंतु, यथामति, तथापि, आणि , नि) -हस्व  (पहिली वेलांटी व पहिला उकार) आणि  बाकी इतर तत्सम व तद्भव शब्द कायम दीर्घच लिहावे. (दुसरी वेलांटी व दुसरा ऊकार) 
  चला तर मग... शोधा ते शब्द जे तुम्ही आधी -हस्व लिहायचे..ते आता दीर्घ लिहायचेय ..पण वरील पाच अव्यये सोडून....
  पुढील भागात आणखी बघू या -हस्वदीर्घाचे नियम....
कारण
" शुद्धलेखन हा आग्रह नाही तर सवय झाली पाहिजे..."


डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.२

व्याकरण भाग (२)

-हस्वदीर्घाची गंमत...

शुद्धलेखन म्हटले की सर्वात मोठी समस्या असते की अमुकअमुक शब्द  -हस्व लिहावा की दीर्घ ..ब-याचदा मग कागदावर लिहून पाहिल्या जाते ..डोळ्यांना जे योग्य वाटेल ते मग आपण स्वीकारतो. -हस्वच्या ठिकाणी दीर्घ आणि दीर्घाच्या ठिकाणी  -हस्व लिहले तर गोंधळ तर उडतोच, पण त्या शब्दाचा मूळ अर्थही बदलतो..फार गंमतीजमती होतात..खरं म्हणजे कधीकधी संदर्भानुसार तो शब्द -हस्व लिहावा की दीर्घ  हे ठरवावे लागते. आणि  आपला हा गोंधळ का उडतो माहीत आहे का? कारण मराठीत तोच शब्द -हस्वही असतो..आणि  दीर्घही असतो. पण दोन्ही शब्दांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात बरं का!
  आता हेच बघा ना..अनेक लेखक /कवी लेखन करीत असतात..कवींच्या कवितेत तर एक शब्द हमखास येतोच..तो म्हणजे  ' मिलन' . पण मिलन हा शब्द जसा -हस्व आहे तसा तो दीर्घ म्हणजे  ' मीलन ' असाही आहे..
उदा.- ' तुझे नि माझे व्हावे --- ' इथे नेमके कुठले मिलन लिहावे असा प्रश्न नक्कीच पडला असेल. 'मिलन' म्हणजे ' भेट' . तेव्हा  'तुझे नि माझे व्हावे मिलन असेच योग्य  राहील..
 आता दीर्घ  शब्द 'मीलन' याचा अर्थ होतो ' मिटणे' उदा.- 'तुझ्या पापण्यांचे मीलन माझ्या हृदयाचा ठोका चुकवतो' किंवा 'तुझ्या पापण्यांचे मीलन, घायाळ होई माझे मन' इथे पापण्यांचे मिटणे हा अर्थ येतो. जर आपण तुझे नि माझे व्हावे मीलन असे लिहिले तर तू आणि  मी मिटावे असा अर्थ होईल..आहे ना गंमत? ( मीलन यापासून उन्मिलीत हा शब्द आपल्याला परिचित आहे.याचा अर्थ अर्धवट मिटलेले.)
असाच दुसरा शब्द बघा ..हा 'सुशीला' ./ 'सुशिला'  असाही लिहतात. तेव्हा नेमका कोणता योग्य  असेल..पडलाच ना प्रश्न ? जर शिला असा -हस्व शब्द असेल तर  त्याचा अर्थ होतो 'दगड ' आणि  शीला असा दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ होतो चारित्र्यवान. 'सु' या उपसर्गाचा अर्थ होतो चांगला/चांगली. तेव्हा  सुशिला म्हणजे चांगली दगड आणि  सुशीला म्हणजे  चांगली चारित्र्यवान.आता तुम्हीच ठरवायचं की सुशिला लिहावे की सुशीला ..
  उदाहरणदाखल आणखी बरेच शब्द आहेत..ते असे..
पाणि-हात.........पाणी- जल 
पिक-कोकीळ.....पीक-धान्य
सलिल-पाणी.......सलील-लीलेने
शीर-नस/धमनी.....शिर- डोके
दिन- दिवस ........दीन- गरीब
सुर - देव ...........सूर- स्वर /आवाज 
सुत-मुलगा...........सूत- धागा

असे मराठीत बरेच शब्द आहेत. संदर्भानुसार -हस्व दीर्घाचे भान ठेवून आपले लेखन केले तर अधिक चांगले..शब्दकोश जवळ बाळगावा..म्हणजे शंका आलीच तर अर्थ शोधता येईल. कालांतराने ही सवय झाली की आपले लेखन आपोआप शुद्ध होऊ लागते. तेव्हा करा प्रयत्न ..कारण,
शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. बरोबर ना ?
आणि  हो..जरा काही नियम लक्षात ठेवले तर...ते पुढील भागात....

डॉ वसुधा वैद्य

व्याकरण १.१

व्याकरण भाग(१)
चला शुद्धलेखन जाणू या.........

परवा एका fb मित्राने मला विचारले की, 'देऊन लिहावे देवून?' मी म्हटले 'देऊन' ..तो परत म्हणाला 'कसं काय..देवून कां नाही? मला तर कळतच नाही कुठे देऊन लिहावे आणि कुठे  देवून..' याच्यासारख्या ब-याच जणांचा हा संभ्रम असतो..म्हणून  हा पोस्टप्रपंच..,
   याचं असं आहे ..मराठीत मूळ क्रियापदाला (धातूला ) ऊ/ऊन प्रत्यय  लावून ही रूपे /शब्द तयार झालेले असतात.उदा.-मूळ धातू 'देणे' ..याला जर ऊ /ऊन प्रत्यय लावला तर देऊ/देऊन असे रूप तयार होईल.यासारखेच 
खा+ऊ=खाऊ.....खा+ऊन=खाऊन ...असे होईल..आणखी  जाणे,येणे, घेणे,पिणे, धुणे या सर्वांना ऊ/ऊन प्रत्यय लावला तर त्यांचे 
जाऊ/जाऊन,
येऊ/येऊन, 
घेऊ/घेऊन,
,पिऊ/पिऊन,
 धुऊ/ धुऊन  
असे रूप तयार होतात..
म्ह्णून ही रूपे जावून,घेवून, येवून, पिवून, धुवून असे लिहू नये.कारण या मूळ क्रियापदात म्हणजेच धातूंत 'व ' नाहीच आहे तर आपण हा कां लिहावा..???

  पण हं..ज्या मूळ धातूत ..क्रियापदांत 'व ' आहे तिथे 
ऊ/ऊन प्रत्यय लावून कसे रूप तयार होतात ते पाहू या....
उदा.-- जेवणे, धावणे,लावणे, समजावणे, धमकावणे,...वगैरे क्रियापदे घेऊ या.
मूळ धातू..... जेव+ ऊ = जेवू
जेव+ ऊन= जेवून..
इथे ' व ' ची 'ऊ'  या स्वरासोबत संधी होते म्हणून  वू आणि  वून असे झालेय..
व+ ऊ =वू, 
व+ ऊन = वून असे....
म्हणून हे धातू जेऊ/जेऊन..धाऊ/धाऊन...समजाऊ/समजाऊन...असे लिहू नये..

आता उरलेले जे इतर क्रियापद..धातू आहेत..जसे,
राहणे, करणे, मोडणे, हसणे, काढणे..वगैरे..
राह +ऊ = राहू..राह+ ऊन = राहून
कर + ऊ =करू...कर + ऊन =करून
मोड+ऊ =मोडू..मोड+ ऊन =मोडून
अशाप्रकारे  हसू...हसून..काढू..काढून होईल..
इथे ऊ/ ऊन हे प्रत्यय दीर्घ आहेत म्हणून  हे प्रत्यय लागलेले सर्व रूपे दीर्घ उकारातच लिहावे..

कळलं ना?  हुशार आहात..

डॉ .वसुधा वैद्य

व्याकरण २.१

#व्याकरण

वर्गात मराठीचे अध्यापन करताना नं हे विद्यार्थीसुद्धा आपल्याला कोंडीत पकडतात बरं का !  आता परवाचीच गोष्ट , मी नेहमीप्रमाणे इ. ७ वी वर श्रुतलेखन घेत असताना मुलांना  'अनुस्वार नीट द्या रे.'  'शीर्षबिंदू द्यायला विसरू नका बरं ' अशा सूचना देत होते. तेवढ्यात स्मार्ट तेजसने मला मध्येच थांबवून विचारले की मॕम, म्हणजे टिंबच द्यायचा नं?  मी मान हलवून "हो " म्हणाले तर त्याचा पुढील प्रश्न "मग हा अनुस्वार व शीर्षबिंदू असे दोन शब्द का वापरताय तुम्ही ? दोन्हीसाठी टिंबच तर द्यायचाय. मग हे दोन्ही  शब्द सारख्या अर्थाचे की वेगवेगळे ? यांचे नेमके अर्थ काय ? "
अस्मादिकांनी क्षणभर विचार केला. स्वतःशीच म्हटले point to be noted mam,," आणि दिले समजावून..ते असे. 
अनुस्वार आणि शीर्षबिंदू यांचे चिन्ह (ं) जरी एकच असले तरी यात फार मोठा फरक आहे. 
अनुस्वार म्हणजे  अक्षरामागून येणारा उच्चार . व्याकरणाच्या भाषेत सांगायचे झाले तर  अक्षरानंतरचा येणारा 'अनुनासिकांचा' उच्चार म्हणजे  'अनुस्वार' होय. ङ्, ञ्, ण्,न् आणि म् ही  मराठी  वर्णमालेतील अनुनासिके आहेत. उदा. गङ्गा/गंगा पञ्चम/पंचम, षण्ढ/ षंढ, मन्दिर/मंदिर, अम्बर/अंबर. प्रस्तुत उदा.त अक्षरांवर  दिलेला अनुस्वार आहे.
शीर्षबिंदू याचा अर्थ ज्या अक्षरावर ं हा दिलेला असतो त्या वर्णाचा पूर्ण  उच्चार करायचा असतो. उदा. 
मी सांगितलं ,कसं ? ,भलं, पावसाचं गीत, राहिलेलं, 
यामध्ये ल, स, च वर शीर्षबिंदू दिलेला आहे तेव्हा  त्या ल,स, च चा पूर्ण  उच्चार करायचा असतो.

थोडक्यात , 
अनुनासिके -अनुस्वार 
आणि
 पूर्ण उच्चार - शीर्षबिंदू.

आणि हो, यापुढे ं याला टिंब नाही हं म्हणायचं..अनुस्वार अथवा शीर्षबिंदू असाच शब्दप्रयोग करायचा,

काय ? झाला ना संभ्रम दूर ?

डॉ .वसुधा वैद्य