Monday, May 28, 2012

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली

सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
किंकिण कांकण
रुणझून पैजण
सजली नटली नवरी आली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

नवऱ्यामुलाची आली
हळद हि ओली
हळद हि ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीन नवरीच
अंग सारं माखवा
पिवळी करून तिला
सासरी पाठवा

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सासरी मिळूदे तुला
माहेरची माया
माहेरच्या मायेसंग
सुखाची गा छाया
भरुनिया आले डोळे
जड जीव झाला
जड जीव झाला लेक
जाय सासराला
आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी
ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली......
-गुरु ठाकुर 

Sunday, May 27, 2012

आयुष्य

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.देशपांडे

Saturday, May 26, 2012

वा-यावर उडणारी बटं सावरताना



वा-यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”
पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..

-अनामिक