Thursday, January 28, 2010



नाती

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........


काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........


नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........


पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

Wednesday, January 27, 2010



नाती


जेव्हा एखादं नातं तुटतं
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.


आपुलकीची जखम
खोल मनात तशीच राहते.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.


चुक कोणाची होती
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.


त्या व्यक्तीचे “बोलणे” विसरु
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.


जेव्हा एखादं नातं तुटतं
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं

Friday, January 8, 2010

पाऊस आलाय….भिजून घ्या

पाऊस
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

Monday, January 4, 2010

पाऊस


काल हुतलय पावसाक
माफ कर बाबा.
आज भिजाक जमाचा नाय
मॆत्रीच्या पावसात भीजान
झालय वलोचींब
न्हावक घालता बघ माका
शुभेच्छांचो प्रत्येक थेंब
मीत्रांची इतकी गर्दी झाली
की भीजान भीजान माका सर्दी झाली
मगे पावस रिमझीम हसलो
ढगांका घेवन क्शीतीजार जावन बसलो
जाता जाता हुंता कसो " काळजी नको झीला, खुप भीजान घे
आनी मगे भीजान झाला की परत मॆत्रीचीच ऊब घे.

Saturday, January 2, 2010

मैत्री

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.


काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.


काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.


मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात



Friday, January 1, 2010



कुणीतरी असाव .........


कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !


कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !


कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !


कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !


खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार