Saturday, January 11, 2014

मस्त रहावं कसं ? ~ शिवराज गोर्ले

मस्त रहावं कसं ? ~ शिवराज गोर्ले 
विचार विवेक म्हणजे ANTI UN HAPPINESS FORMULA


जगात चांगलं वाईट असं काहीच नसतंच , आपणच आपल्या विचारांनी हे चांगलं हे वाईट ठरवत असतो .. शेक्सपिअर 

नकारात्मक भावनांचा उगम माणसांच्या दृढ समजुतीत असतो ..

विवेकनिष्ठ विचारसरणीच महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या अनेक रूढ कल्पनांना ,प्रस्थापित समजांना चांगलंच धक्का देणारी आहे .
वर्षानुवर्षे आपल्यावर जे संस्कार केले जातात कित्येकदा काळात नकळत , आपल्या विचारांवर जे प्रभाव पडत राहतात त्या संस्कारांना व प्रभावांकाहीसं आव्हान देणारी अशी हि पद्धती आहे .

“प्रत्येकानं लोकांच्या नजरेत भरेल ,असं यश मिळवायलाच हवं का ?” “माणसाला प्रेमाची किती गरज असते ?”
“प्रेमाशिवाय तो पुरेशा सुख समाधानानं राहूच शकत नाही का ?” अश्या आशयाचे सडेतोड प्रश्न ’विचारविवेका’ त विचारले जातात . 


आयुष्यात आनंद असणार तसंच दु:ख ही असणार


 
रसेल म्हणतो 
“हे सारं आयुष्यात आवश्यक हि असतं कारण माणसाची मानसिक शारीरिक जडण घडण अशी आहे कि जीवनासाठी किमान झगडा दिल्याशिवाय तो ठणठणीत राहू शकत नाही तेव्हा हे निसर्गदत्त वास्तव स्वीकारून प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदात राहील तोच खरा शहाणा ”

कळत नकळत आपल्या आनंदाच्या मार्गातील हे अडथळे हे व्यत्यय आपणच निर्माण केलेले असतात .
अनावश्यक चिंता ,ताण,दु:ख आपण टाळू शकतो .

HAPPINESS IS NOT SOMETHING TO ACHIEVE IT HAS TO BE EXPERIENCED.


----------------

असा मी असा मी 

माणूस असण्याचा सर्वात महत्वाचा फायदा तुम्ही कसा विचार करावा हे ठरवू शकता - डॉ . अल्बर्ट एलिस

Sunday, January 5, 2014

आयुष्य बहरताना ~ प्रवीण दवणे

आयुष्य बहरताना ~ प्रवीण दवणे

मानवी जन्म आणि त्यातही तारुण्य पुन्हा पुन्हा मिळत नाही .याच वयात मुलाचं नातं पृथ्वीतल्या स्पर्श ,रस , रूप , गंधाशी जोडून सूर्याशी हस्तांदोलन करा . बघा ,आपल्यातून फुलण्या साठी अधीर असलेली फुलं सहज फुलून येतील .
फुलपाखरं नंतर आनंदित होतील ,आधी झाड आनंदी व्हायला हवं, त्या साठी 'मुळातली ' साधना हवी ; त्यावर ठरेल ,आयुष्य सुफळ कि निष्फळ !