Saturday, September 29, 2018
Tuesday, September 11, 2018
Wednesday, August 15, 2018
स्वातंत्र्यवीर सावरकर
भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरम्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी. पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.
१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.
‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.
एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१) साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.
लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).
ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.
१८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला; पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.
लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.
ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.
सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली; त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).
सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.
सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.
१९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी; मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.
अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.
सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते; दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.
सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.
सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.
‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला; तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.
दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली; तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी; तसे घडले.
भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.
त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते; तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.
सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.
मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.
संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.
२. कीर, धनंजय; अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.
३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे, १९७०.
४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.
५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.
६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.
कुलकर्णी, अ. र.
Wednesday, April 11, 2018
Tuesday, April 3, 2018
मराठी साहित्यिक

- वि स. खांडेकर
- शिवाजी सावंत
- चंद्रशेखर गोखले (चंगो )
- पु ल
- प्रविण दवणे
- ह मो मराठे
- जी ए कुलकर्णी
- विजय कुवळेकर
- व पु काळे
- आनंद ललोटी
- डॉ.सुमती क्षेत्रमाडे
- इंदिरा संत
- माधवी कुंटे
- Pu la Deshpande
- Shivaji Sawant
- Swatantrvir Sawarkar
- Sane Guruji
- Vi Sa Khandekar
- Anant Tibile
- Pu la Deshpande
- Shivaji Sawant
- Swatantrvir Sawarkar
- Sane Guruji
- Vi Sa Khandekar
- Anant Tibile
- वि. स. खांडेकर
- शिवाजी सावंत
- पु. ल.
- व. पु.काळे
- शिवाजी सावंत
- माधवी देसाई
- पु.ल.देशपांडे
- सुनीता देशपांडे
- सुमती क्षेत्रमाडे
- शशी भागवत
- गो. नी. दांडेकर
- व्यंकटेश माडगूळकर
- सुहास शिरवळकर
- शोभा डे
- रविंद्र गुर्जर
- आशा बगे
- नारायण धारप
- वि . स .खांडेकर
- व पु काळे
- दया पवार
- भालचंद्र नेमाडे
- आ ह साळुंखे
- बाबुराव बागुल
- उत्तम कांबळे
- अमिश
- नागनाथ कोत्तापल्ले
- शिवाजी सावंत
- ग दि मा
- पु ल
- नितीन शिंदे
- ह ना आपटे
- वामन मल्हार जोशी
- ग त्र्यं माडखोलकर
- अरविंद गोखले
- वि स खांडेकर
- ना सी फडके
- मालती बेडेकर
- विभावरी शिरुरकर
- विश्राम बेडेकर
- पु भा भावे
- अच्युत बर्वे
- अच्युत गोडबोले
- गौरी देशपांडे
- इरावती कर्वे
- दुर्गा भागवत
- पु ल देशपांडे
- सुनीताबाई देशपांडे
- प्रा. व. बा. बोधे
- बाबा कदम
- शंकर पाटील
- देवदत्त पाटील
- Kurundkar
- Arnalkar
- gurunath naik
- chintamani lagu
- आण्णाभाऊ साठे
- सावरकर
- धनंजय कीर
- शिवाजीराव भोसले
- बाबासाहेब पुरंदरे
- अच्युत गोडबोले
- राजेंद्र खेर
- चंद्रकुमार
- नलगे
- वि वा शिरवाडकर
- विश्वास पाटील
- चेतन भगत
- रविंद्रनाथ टागोर
- भा द खेर
- विभावरी शिरुरकर
- राजीव पटेल
- साने गुरुजी
- डॉ. कलाम
- आचार्य अत्रे
- द ता जाधव
- लोकमान्य टिळक
- सत्येन्द्रनाथ मुजूमदार
- डॉ. नरेंद्र जाधव
- डॉ. सदानंद मोरे
- यशवंतराव चव्हाण
- डॉ. आनंद नाडकर्णी
- डॉ. रमा मराठे
- डॉ. सदा कऱ्हाडे
- ज द जोगळेकर
- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
- डॉ. शरदचंद्र देगलुरकर
- इरावती कर्वे
- दुर्गा भागवत
- विश्वास नांगरे पाटील
- भरत आंधळे
- विठ्ठल कामत
- चं प भिशीकर
- स्पेन्सर जॉन्सन
- रॉबर्ट कियोसाकी
- रोन्डा बर्न
- पुल, शिवाजी सावंत
- बाबा कदम
- जयवंत दळवी
- वपु
- शन्ना
- सुमती क्षेत्रमाडे
- जोस्ना देवधर
- प्रकाश नारायण संत
- दमा मिरासदार
- गोनीदा
- व्यंकटेश माडगूळकर
- सुधा मूर्ती
- भैरप्पा सर
- राँबीन कूक
- मारूती चितमपल्ली
- स्वा . सावरकर,अच्युत गोडबोले
- आनंद यादव
- आण्णाभाऊ साठे
- नारायण सुर्वे
- व्यंकटेश माडगुळकर
- बहिणाबाईची गाणी
- प्रल्हाद लुलेकर
- श्रीराम दुर्गे
- बाबाराव मुसळे
- रंगनाथ पठारे
- रावसाहेब बोराडे
- कैलाश दौंड
- मेनका धुमाळे
- मल्लीका अमरशेख
- बेबी कांबळे
- वृषाली किन्हाळकर
- वासूदेव मुलाटे
- दिनकर जोशी
- पृथ्वीराज तौर
- कल्पना दुधाळ
- दिपा क्षीरसागर
- रजनी ताजने
- सोपान हाळमकर
- शिवाजी मुंडे
- उमेश मोहिते
- राजेंन्द्र गहाळ
- अर्जून व्हटकर
- उर्मिला चाकूरकर
- पल्लवी बनसोडे
- किशोर सानप
- शशिकांत हिंगोणेकर
- बालाजी इंगळे
- राजश्री तावरे
- किर्ती साळोखे
- गंगाधर गाडगीळ
- श्री.ना. पेंडसे
- जयवंत दळवी
- विश्राम बेडेकर
- नरहर कुरुंदकर
- रवींद्र पिंगे
- सुभाष भेंडे
- रणजित देसाई
- माधव गडकरी
- गोविंद तळवलकर
- विजय तेंडुलकर
- मधू मंगेश कर्णिक....
- शिवाजी सावंत
- व.पु. काळे
- दुर्गाबाई भागवत
- ईंदिराबाई संत
- वा. रा. कांत
- शांता शेळके
- अरूणा ढेरे
- सुनीता बाई देशपांडे
- ना घ देशपांडे
- रविंद्र पिंगे
- द. भि. कुलकर्णी
- विजया बाई राजाध्यक्ष
- बा. भ. बोरकर
- कुसुमाग्रज
FB Post @ https://www.facebook.com/photo.php?fbid=10212124086320665&set=gm.2272145182799304&type=3&ifg=1
Sunday, March 25, 2018
Thursday, March 22, 2018
Sunday, March 18, 2018
Monday, March 5, 2018
पूर्वांचल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
पूर्वांचलातील विजयाचे आई-वडील कोण?
----------------------------------------------
(दत्ता जाेशी, आैरंगाबाद)
त्रिपुरात भाजपा आघाडीने शून्यातून झेपावत दोन तृतियांश बहुमत मिळविले. नागालँडमध्ये ही आघाडी सत्तेच्या उंबरठ्यावर आहे. शहा-मॅजिक कामी आले तर भाजपाशासित राज्यांमध्ये आणखी एकाची भर पडणार. मेघालयातही या पक्षाचा चंचूप्रवेश झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच आसामात खणखणीत बहुमत मिळवीत हा पक्ष सत्तेत आला. अरुणालचलात, मिझोरममध्ये याच आघाडीची सत्ता आहे. एकेकाळी ‘कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही’ अशा पाट्या झळकलेल्या प्रदेशात आज ‘भारतीय’ जनता पार्टी सत्तेत सहभागी आहे. हे सारे काय घडते आहे? हे ‘मोदी-शहा’ मॅजिक आहे, की कुणा सुनील देवधर नावाच्या व्यक्तीच्या मेहनतीचे फळ आहे की आणखी काही? मला वाटते, पूर्वांचलातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर कसलेही मत बनविण्याआधी आपल्याला थोडे भूतकाळात डोकवावे लागेल. म्हणजेे किती काळ मागे जायचे? आपल्याला थेट ब्रिटिशांच्या आगमनाच्या आधीपर्यंत मागे जावे लागेल आणि तिथून आपण एक एक टप्पा ओलांडत पुढे येऊ.
ब्रिटिशांच्या राजवटीआधी भारतात छोटी छोटी राज्ये होती, हे आपण जाणतो. आज विखंडित भारताचा नकाशा थोडा वेगळाच दिसत असला तरी अरुणाचलापासून बांगलादेश म्हणून अस्तित्वात आलेल्या भूभागापर्यंत ही सारी अखंड भूमी विविध शासनकर्त्यांत विभागलेली होती. या विषयी थोडी विस्ताराने माहिती मिळवायची तर साहित्य अकादमीचे अध्यक्ष राहिलेल्या सुनील गंगोपाध्याय यांची ‘प्रथम आलो’ अर्थात मराठीत दोन खंडांत प्रकाशित झालेली ‘पहिली जाग’ ही ऐतिहासिक तथ्यांवर आधारित कादंबरी वाचण्यास हरकत नाही. या परिसरावर वेगवेगळ्या राजांची राजवट होती. ही राज्ये वंशनिहाय होती. कुठल्या धर्माशी संबंधित असल्याचे उल्लेख सापडत नसले तरी ते निसर्गपूजक आणि मातृभूमीशी इमान राखणारे लोक होते.
ब्रिटिशांच्या आगमनापाठोपाठ भारतात कॅथॉलिक चर्चच्या धर्मप्रचारकांची मोठी लाटच येऊन या प्रदेशावर आदळली. एकीकडे राजसत्तेने या राज्यांत ढवळाढवळ सुरू केली आणि आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा सपाटा लावला. त्यांच्या संरक्षणाखाली ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या टोळ्या या परिसरात घुसल्या. उर्वरित भारतातील समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, जातीव्यवस्था यांच्या विणीमुळे त्यांना भारतभरात जे शक्य झाले नाही, ते त्या भागात निर्वेधपणे शक्य झाले. तेथे मुळातच धर्मजाणिवा नव्हत्या. आरोग्यसेवा, शिक्षणसुविधा पोहोचलेल्या नव्हत्या. त्याचा गैरफायदा घेत या धर्मप्रसारकांनी आधी आरोग्यसेवेच्या माध्यमातून तेथे पाय रोवले. त्यांची मिशनरी वृत्ती कौतुकास्पद होतीच, पण त्यामागचा धर्मप्रसाराचा हेतू मात्र गलिच्छ असाच होता. आरोग्यसेवा द्यायची आणि त्यामुळे मिंधे झालेल्या समाजावर आपल्या धर्माचे संस्कार सुरू करायचे हा क्रम वेगात सुरू झाला. शिक्षणव्यवस्था ब्रिटिशांनीच तेथे आणली आणि नव्या पिढीला शिक्षण देण्यास प्रारंभ केला. हजेरीपटात धर्माच्या रकान्यात बिनदिक्कत ‘ख्रिश्चन’ उल्लेखाला प्रारंभ झाला. आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर काम करीत त्यांनी अतिशय वेगाने ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या या भूभागाचे ख्रिस्तीकरण पार पाडले. ‘भारताच्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य झाला तो भाग भारतापासून तुटला’ असा सिद्धांत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडला होता, त्याचे प्रत्यंतर या भागात येत गेले.
या भागात ख्रिस्ती मिशनर्यांना मोकळे रान मिळावे या साठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या परिसरात अन्य भारतीयांच्या प्रवेशावर बंधने लादली. परमिटची अट घातली गेली. भारतीयांना या भागात जाण्यासाठी परमिट लागायचे पण रोमहून पोपने पाठविलेले पाद्री मात्र इथे बिनदिक्कतपणे प्रवेश करू शकायचे. आज या भागात 80 ते 90 टक्के ख्रिस्ती लोकसंख्या आहे, याचे महत्त्वाचे कारण हे आहे. ‘हे लोक मुळात हिंदू नव्हतेच’, असा दावा ख्रिस्ती आणि समाजवादी-साम्यवादी वगैरे मंडळी करतात. पण ते ख्रिस्तीही नव्हते, हे ही आपण समजून घेतले पाहिजे. ख्रिस्ती धर्माभिमान आणि अलगाववादाची लागण या मिशनर्यांनी इकडे इतक्या प्रमाणात केली, की ‘डॉग्ज अँड इंडियन्स आर नॉट अलाऊड’चे फलक या भागात झळकू लागले. स्वतंत्र भारतातही हीच स्थिती काम राहिली आणि सत्तालोलूप काँग्रेसने संकुचित राजकीय स्वार्थापोटी हा भाग धुमसत ठेवला. फुटीरतावादी चळवळीला बळ दिले आणि पुढे तेच भस्मासूर म्हणून डोक्यावर बसले. जातीय अस्मितांना त्यांनी खतपाणी घातले. छोट्या राज्यांची निर्मिती झाली. चित्र असे दिसू लागले की हा सारा भाग भारतापासून फुटून बाहेर पडू इच्छितो. त्याला भारताच्या अन्य भागातील वर्तणूकही तेवढीच जबाबदार ठरली. मिझोरमचे तत्कालीन मुख्यमंत्री लालथनहावला एका परिषदेच्या निमित्ताने मुंबईत आले होते. एका जगप्रसिद्ध हॉटेलमध्ये ही परिषद होती. ते तेथे पोहोचले आणि सुरक्षा अधिकार्यांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे पासपोर्टची मागणी करण्यात आली. आपण भारतातीलच एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत, हे ते पुनःपुन्हा सांगत होते आणि सुरक्षा अधिकारी मात्र ते परदेशी नागरिकच आहेत, हे गृहित धरून पासपोर्टची मागणी करीत होते...! स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याची जबाबदारी त्या काळच्या सत्ताधार्यांनी उचललीच नाही आणि सारा देश त्यात पोळून निघाला...! अनेक वर्षे पूर्वांचलातील राज्यांत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जात असे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेंव्हा नागालँड मधील 50% ख्रिश्चन झालेल्या नागांनी स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्षातच मिझोरामने देखील बहुसंख्याक ख्रिश्चन झाल्यावर अशीच मागणी केली. ब्रिटिशांच्या अख्ख्या कारकीर्दीत जेवढे धर्मांतर झाले नसेल त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त धर्मांतर स्वातंत्र्यानंतर झाले ते भारत द्वेषाच्या जोरावर. आज अख्ख्या जगतात सर्वात जास्त अमेरिकन बाप्टिस्ट श्रद्धा बाळगणार्या लोकांची टक्केवारी असणारे राज्य नागालँड आहे. मिसिसिपी हे दुसर्या क्रमांकाचे राज्य. तर मोठया संख्येत जगात ख्रिश्चन धर्मांतर होणारे भूभाग म्हणजे ईशान्य भारत, फिलीपिन्स व इंडोनेशियातील ईस्ट तिमूर. शेवटच्या दोन भूभागावर आता अमेरिकेची लष्करी केंद्र आहेत!
ख्रिश्चन मिशन्स जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम सुरु करतात तेव्हा तेथे ओतलेला पैसा ही त्यांची ‘गुंतवणूक’ असते. मात्र पुरेसे मतांतरण झाल्यावर ते त्या समाजावर अनेक प्रकारच्या वर्गण्या लादून आर्थिक शोषणास सुरुवात करतात. मेघालयातील सर्व चर्चेसना मिळणारा मासिक निधी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त परदेशातून येणारा पैसा! मिशनर्यांना मिळणार्या पैशावर सरकारचे नियंत्रण नाही. राज्यघटनेतील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सवलतींनुसार या पैशाचा जमाखर्च सरकारला दाखविण्यास ते बांधिल नसल्याने या पैशाचा वापर देशविरोधी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी देखील होत असतो.
000
पूर्वांचलातील ही सारी परिस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आली आणि ती बदलण्यासाठी संघाने कंबर कसली. सारा भारत अखंड, एकात्म, जातीपातींपासून मुक्त होऊन समर्थपणे उभा राहावा, ही संघाची भूमिका. पण या भूमीत संघाला पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. जिथे ‘भारतीय’ शब्दाला चर्चमधून कडवा विरोध होत असे तेथे ‘हिंदू’ या शब्दाची परिस्थिती काय होणार? अशा परिस्थितीत स्थानिक माणसाला ‘अपिल’ होऊ शकेल अशा ‘विवेकानंद केंद्रा’च्या नावाने, अन्य काही पद्धतींनी तेथे कामाला प्रारंभ झाला. त्यात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्र हाती घेतले गेले. या शिक्षणाच्याच माध्यमातून निष्ठावान नागरिक घडवता येऊ शकतो, हे इतिहास सांगतो. तोच प्रयोग पूर्वांचलात ठिकठिकाणी सुरू झाला.
मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ‘सील’ ही योजना आठवते. पूर्वांचलातील विद्यार्थ्यांनी भारतात विविध प्रांतांत यावे आणि इकडून काही विद्यार्थ्यांनी तिथल्या परिवारांतून वास्तव्याला जावे. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून परस्पर सौहार्द वाढावे, ही उपक्रम 1970-80च्या दशकापासून हाती घेण्यात आला. त्याच दरम्यान त्या भागातील मुलांना भारताच्या विविध भागांत आणून त्यांना शिक्षण देण्याची योजना समोर आली. सांगलीच्या भय्याजी काणे यांनी यात पुढाकार घेतला. (कै.) शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे हे मूळचे व्यवसायाने शिक्षक. भैय्याजी काणे यांचा जन्म 6 डिसेंबर 1924 चा. दि. 26 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांचे निधन झाले. पूर्वांचलातील स्थिती समजून घेण्यासाठी ते स्वतः अनेक वर्षे पूर्वांचलात राहिले. ही राज्ये आणि उर्वरित भारतात संवादाचे पूल उभे राहणे ही खरी गरज असल्याचे रा. स्व. संघाच्या लक्षात आले. त्याची सुरवात भय्याजी काणे यांनी केली. साधारण 1974 मध्ये नागालँड आणि मणिपुरातून त्यांनी 12 मुले सांगलीत आणली आणि त्यांची येथे राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली. महाराष्ट्रात सांगली, रत्नागिरी, नाशिक, पुणे, चिंचवड आणि औरंगाबाद येथे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांची वसतीगृहे आहेत. एकेका राज्यातील मुले एकेका शहरात राहतात. त्यापैकी पुण्यात पूर्वांचलातील मुलींचे वसतीगृह आहे. इथे आल्यानंतर ही सर्व मुले तेथील स्थानिक जातीय वैमनस्य विसरतात. तिकडे नागा आणि कुकींमध्ये रक्तरंजित संघर्ष होत असतो, इथे आल्यानंतर ते हा संघर्ष विसरून एकत्र राहतात. नव्या पिढीत वैमनस्याची भावना निवळण्यास या उपक्रमामुळे प्रारंभ झाला. असे प्रयत्न विविध राज्यांतही सुरू झाले. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीला लागली.
हे झाले एक उदाहरण. अशी असंख्य उदाहरणे आहेत. संघाचे अनेक प्रचारक जिवावर उदार होऊन पूर्वांचलात गेले. अनेकांनी तेथे प्राणार्पण केले. शेकडो स्वयंसेवकांनी मागच्या अर्धदशकात त्या भागात प्राणार्पण केले आहे. काही वर्षांपूर्वी ओरिसात एका पाद्री कुटुंबाला जाळून मारल्याचा विषय सार्या मानतावाद्यांनी लावून धरला होता. असे कृत्य चुकीचेच. पण त्रिपुरात 1999 मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या चार प्रचारकांचे अपहरण करून 28 जुला 2001 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, ही हत्या करणार्या ख्रिस्त्यांच्या कृत्याचा निषेध करणारा आवाज कधी फुटलाच नाही. समाज हे सारे पाहात असतो. एकीकडे धर्माला अफूची गोळी मानणारा कम्युनिझम सत्तेवर वर्षानुवर्षे राहिला, काँग्रेसने चर्चचेे लांगुलचालन केले, पक्षाचे आणि नेत्यांचे हित जपले.
000
संघपरिवारातील विविध संघटना आपापल्या परीने मागचे अर्धदशक या भागात कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत त्यांनी समाजाच्या भारतीयत्व जागवले. भ्रष्टाचार, देशद्रोह, स्वार्थ यांची जाणीव करून दिली. त्याचा सकारात्मक परिणाम होण्यास प्रारंभ झाला आहे. या ख्रिश्चनबहुल भागात ‘हिंदूं’चा म्हणून शिक्का मारला गेलेला भाजपा सत्तेत येत आहे. विरोधकांच्या धर्मांध प्रचाराला समाजानेच दिलेली ही चपराक आहे. कुणाच्या धर्मपालनाचा संघ किंवा भाजपाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण धर्मपालनाआडून केली जाणारी धर्मांधतेची जोपासना व त्यातून धर्मविस्ताराच्या योजना यांना हा विरोध असणे साहजिक. हा सूक्ष्म भेद त्या समाजाने ओेळखला.
सत्तेवर येण्याचे नियम पाळून, मतपेटीच्या माध्यमातूनच हा पक्ष सत्तेत येत आहे. डाव्यांच्या रक्तपाताला प्रत्युत्तर देणे ही फार अवघड गोष्ट नसते. मुठभर डावे इतका उत्पात माजवू शकतात तर त्यांच्या पटीत असलेल्या संघ परिवाराला ही गोष्ट अशक्य अजिबात नसते. पण विषय संस्काराचा, मातृभूमीवरील प्रेमाचा आणि लोकशाही व्यवस्थेवरील विश्वासाचा असतो. मिडियातील बगलबच्च्यांच्या आधाराने आणि कथित विचारवंतांच्या कंपूशाहीच्या आधारावर डाव्यांनी जो काही ऊत मात केला, तो आता अखेरच्या टप्प्यात येतोय. पूर्वांचलातील परिवर्तनाचा अर्थ तेवढाच आहे.
000
या पार्श्वभूमीवर या विजयाकडे पाहायला हवे. साम्यवादाचे हे 25 वर्षे तगलेले झाड मोदी-शहांच्या नेतृत्त्वाखाली घातल्या गेलेल्या घावाने तुटलेले असले आणि त्या कुर्हाडीची धार सुनील देवधरांनी लावलेली असली, त्याचा दांडा होण्याची भूमिका बिप्लव दास यांनी बजावलेली असली तरी त्या मागे संघाच्या शेकडो प्रचारकांची अर्धशतकाची तपश्चर्या आहे. असे यश दोनचार महिने सोशल मिडियावर शिवीगाळ करून मिळवता येत नसते. त्या साठी जमिनीवरील काम लागते. तो आधार तुटलेले लालभाई आता सैरावैरा झाले आहेत. त्याउलट भक्कम कामाच्या पायावर संघविचार ठामपणे एकेक राज्य उजळवीत पुढे निघाला आहे.
जिथे भारतीयांना प्रवेश नाही, असे फलक लागायचे, 15 ऑगस्ट - 26 जानेवारी काळे दिवस पाळले जायचे तिथे भाजपाच्या विजयानंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा गर्जल्या आणि सारा इतिहास डोळ्यासमोर तरळला...
या वेळी इतकेच.
Friday, March 2, 2018
धुलिवंदन
आज धुलिवंदन
*****
आपल्या महाराष्ट्रात तरी हा सण साजरा करत असतील का कधी ऐकलेलं नाही।
धुलिवंदनाच्या दिवशी काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते ।
******
१. धूलिवंदन
होली ब्रह्मांडका एक तेजोत्सव है । होलीके दिन ब्रह्मांडमें विविध तेजोमय तरंगोंका भ्रमण बढता है । इसके कारण अनेक रंग आवश्यकताके अनुसार साकार होते हैं । तथा संबंधित घटकके कार्यके लिए पूरक एवं पोषक वातावरणकी निर्मिति करते हैं । इन रंगोंका स्वागत हेतु होलीके दूसरे दिन ‘धूलिवंदन’ का उत्सव मनाया जाता है ।
२. धूलिवंदन का महत्त्व
२ अ. त्रेतायुग के आरंभ में श्रीविष्णुद्वारा अवतार कार्य के आरंभ की स्मृति मनाना
त्रेतायुग के आरंभ में पृथ्वीपर किए गए पहले यज्ञ के दूसरे दिन श्रीविष्णु ने यज्ञस्थल की भूमि को वंदन किया एवं वहां की मिट्टी दोनों हाथोंमें उठाकर उसे हवा में उडाया अर्थात श्रीविष्णुने विभिन्न तेजोमय रंगोंद्वारा अवतार कार्य का आरंभ किया । उस समय ऋषि-मुनियोंने यज्ञ की राख अर्थात विभूति शरीरपर लगाई । तब उन्हें अनुभव हुआ कि यज्ञ की विभूति पावन होती है । उसमें सभी प्रकार के रोग दूर करने का सामर्थ्य होता है । इसकी स्मृति के लिए धूलिवंदन मनाया जाता है । इसे शिमगा भी कहते हैं ।
२ आ. अग्नितत्त्व का लाभ प्राप्त करना
होली के दिन प्रज्वलित की गई होली में प्रत्यक्ष अग्निदेवता उपस्थित रहते हैं । उनका तत्त्व दूसरे दिन भी कार्यरत रहता है । इस तत्त्व का लाभ प्राप्त करने हेतु तथा अग्निदेवता के प्रति कृतज्ञता व्यक्त करने हेतु होली के दूसरे दिन अर्थात फाल्गुन कृष्ण प्रतिपदा को सुबह होली के राख की पूजा करते है । उसके उपरांत उस राख को शरीरपर लगाकर स्नान करते हैं । इसे धूलिवंदन कहते है ।
३. धूलिवंदन कैसे मनाए ?
अ. सूर्योदय के समय होली के स्थानपर पहुंचे ।
आ. होलीपर, दूध एवं पानी छिडककर उसे शांत करें ।
इ. होलीकी विभूति को वंदन कर प्रार्थना करें …
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : हे धूलि, तुम ब्रह्मा-विष्णु-महेशद्वारा वंदित हो, इसलिए भूते देवी, तुम हमें ऐश्वर्य देनेवाली बनो एवं हमारी रक्षा करो ।’
ई. पश्चात् नीचे बैठकर होलीकी विभूतिको अंगूठा तथा अनामिकाकी चुटकीमें लेकर अनामिकासे अपने माथेपर अर्थात आज्ञाचक्रपर लगाएं ।
उ. उसके उपरांत वह विभूति पूरे शरीरपर लगाएं ।









