Friday, September 5, 2008

मराठी कविता,

खर तर मला आवडल असत
माझ्या कवितेनी धारदार बनण
एखाद्या लखलखत्या तलवारीच्या पातीसारख
किम्वा निदान एक सुरी
जी कापत गेली असती वाचणार्यान्ची काळीज
निदान एक धगधगती ज्वाळा
जिने होरपळून निघली असती मन
क्रूर वास्तवाच्या धगीत
किम्वा एक आश्चर्य , एखादा दुर्गम पर्वत
एक सन्थ नदी किम्वा छेडलेला मधूर स्वर
पण
प्रत्यक्षात ती आहे
एक वेदना
जिचा आक्रोश कधी कुणाला कळलाच नाही
ती आहे षन्ढ, वास्तवाला निमुट स्वीकारून
शान्त
मन मेलेली जिन्दा लाश
किम्वा
स्वताशीच उमटलेल स्वताच्या नाकर्तेपणाच
ठसठशीत अस्तित्व

0 comments: