Saturday, October 2, 2010

पसारा ..घर आवरावे तसे एकदा मन पण आवरले पाहिजे

पसारा 


घर आवरावे तसे 
एकदा मन पण आवरले पाहिजे 
नकोसे काय काय साठलेले
पाहून ठेवले पाहिजे.....


पण नक्की अडगळ कशाकशाला मानायचे..
पहिले वाहिले अल्पायुषी प्रेम 
की साहोदारांचे तोडकेमोडके  भावबंध
ही पण अडगळच  ना......


कितीतरी सल अगदी  तळात
 खोलवर  आहेत साठलेले मनाच्या 
न  ढाळलेले अश्रुंचे कढ
त्यांचे डोह तसेच अजूनही आहेत.......


तुझ्यामाझ्या नात्यातले 
अवघडलेले क्षण तसेच उभे आहेत
तुझे नकोसे स्पर्श काही
अजून अवघडलेले तसेच आहेत......


या सगळ्याचे काय करायचे 
खरच माहित नाही मला...
वापरून झाले की टाकायचे 
तुझ्यासारखे नाही जमले मला...


पहिले प्रेम पण तेवढाच खरं होते
जेवढी रक्ताची नाती खरी होती
तुझेमाझे लग्नही तेवढाच खरं होते 
आणि झालेल्या जखमाही तेवढ्याच खऱ्या ...


म्हणूनच  हा सारा पसारा
कितीतरी वर्षे आहे तसाच आहे
वाटते कधीतरी  अवचित 
कुठला जुना धागा अजूनही जुळेल....


या पसाऱ्याचे खरच काय करायचे असते?
घर आवरावे तसे
एकदा मनही आवरायला पाहिजे
अडगळ एकदा साफ करायला पाहिजे .......


-माधुरी 
  




0 comments: