Wednesday, October 17, 2012

नवरात्र

नवरात्र


 अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात,   नऊ दिवस रोज ...
एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.

आदिशक्तीची नऊ रुपे  :  नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

0 comments: