Wednesday, October 29, 2014

माझे संगीत व साहित्य क्षेत्र ~ सुधाकर कदम

माझे संगीत व साहित्य क्षेत्र 
~  सुधाकर कदम 

भाग १ 
----------------------

   नव्याने झालेल्या अनेक तरूण मित्रांनी मला माझ्या मराठी गझल गायकीच्या कारकिर्दीबद्दल ’मॅसेजबॉक्सद्वारे’ अनेक प्रश्न विचारलेत.त्यांचेसाठी...

 आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.(याचे आज हयात असलेले साक्षीदार म्हणजे श्रीमती पुष्पाताई सुरेश भट, सुरेशकुमार वैराळकर,सकाळचे संपादक अनंत दीक्षित,अजीम नवाज़ राही वगैरे मंडळी....) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत. १९८० ते १९८३ ही चार वर्षे सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.(आमच्या या मेहनतीचे फ़ळ सध्याचे गायक चाखत आहेत) १९८३ मध्ये "भरारी" नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल मिळालेले पुरस्कार...
"Outstanding Young Person"(१९८३),
"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६), 
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),
"कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३), 
"शान-ए-गज़ल"(२००५),
"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६),
"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),
"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले.
अनेक म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले.पुस्तके लिहिली.



1. ‘भरारी’...मराठी गझल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम.१९८३.
2. ‘झुला’ (तीन भाग) मराठी पाठ्यपुस्तकातील कविता.१९८७
3. ‘अर्चना’ (भक्तिगीते) २००६ टी सिरीज कं.
4. ‘खूप मजा करू’ (बालगीते) २००७ फाऊंटन म्य़ुझिक कं.
5. ‘काट्यांची मखमल’ (मराठी गझल) २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं.
6.‘तुझ्यासाठीच मी...’ (मराठी गझल) लवकरच बाजारात येत आहे.

 -पुस्तके-
१. ‘सरगम’ शालोपयोगी गीतांची स्वरलिपी.(प्रस्तावना - संगीतकार यशवंत देव.)
२. ‘फडे मधुर खावया...’ निवडक (विषयांतर) लेख.



Posted ON fb :  May 29, 2013 at 11:44am

0 comments: