Monday, June 30, 2025

मराठी व्यवसायिक

Swayam Talk वर मुलाखती चे कार्यक्रम होत असतात आज काल मराठी उद्योजक तरुण पिढीचे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता पर्यंत Ndtv मराठी किंवा swayam talk वर बघितलेल्या मुलाखती मधली सगळी मंडळी गावा कडची होती आणि शहरातल्या मराठी न बोलणारी गावची त्यांची त्यांची मराठी भाषा बोलणारी होती.
कष्ट , सातत्य आणि शिक्षण घेत घेत पुढे उद्योजक झालेली. इंग्रजी येत नाही म्हणून काही अडलं नाही कोणी मित्राची मदत घेतली गरज पडेल तेव्हा.
गावाकडची मंडळी शून्यातून उभी राहतात  down to earth होती .

कोणी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला आणि organic अंडी विकण्याचा धंदा सुरू केला सोबत ३ ५०० च्या वर शेतकरी लोकांना एकत्र केलं कोंबडी पालन कसं करतात ते शिक्षण दिल आणि करोडो मध्ये कमाई होते. Marketing च ज्ञान आणि वडिलांनी सोबत दिली जे वडा पाव चा व्यवसाय करायचे. अपयश मध्ये आलं तरी त्याच्या वडलांनी सोबत मात्र दिली.

दुसरा व्यवसायिक फळ cold storage मध्ये ठेवायचा व्यवसाय सुरू केला आणि फळ विकायची.

तिसरा व्यवसायिक शेतकरी चा मुलगा पुण्यात IT कंपनी मध्ये साफ सफाई करायचा सुरवातीला . डिप्लोमा शिक्षण घेतलेला.

नंतर त्याने computer शिक्षण कसं असतं माहिती काढली. Animation course केला. चित्रकला शाळेत असताना एका दुकानात आई वडील ठेवून द्यायचे painter च्या दुकान होतं. ती चित्रकला त्याला कामी आली . मित्राच्या ओळखी मुळे एक नोकरी मिळाली. नंतर चित्रकला येते म्हणून दुसरी .

पुढे tv channel template बाहेरच्या देशातून विकत घेतात म्हणून canva सारखा स्वतःचा brand सुरू केला.

Import export सगळं केलं यांनी.

परदेशात service देऊन सगळ्यांनी व्यवसाय मोठा केला.
ज्ञान ला प्राधान्य दिल की पैसे आपोआप येतात की !

एक जण shark tank मध्ये ही आला होता!

#vidyamsblog

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच का असावे?

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच का असावे?

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मातृभाषेचे महत्त्व नाकारता येत नाही. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी मूलभूत शिक्षण मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे, कारण तेच बालकांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी उपयुक्त ठरते.

१. समजण्याची क्षमता वाढते

मुलांना सुरुवातीच्या वयात आपल्या मातृभाषेचा पूर्ण परिचय असतो. ते ज्या भाषेत घरी बोलतात, तीच भाषा शिकण्यासाठी आणि विचार करण्यासाठी सर्वात सुलभ असते. त्यामुळे मातृभाषेतून शिकवलेले विषय त्यांना पटकन समजतात व लक्षात राहतात.

२. बौद्धिक विकासास चालना

मातृभाषेतून शिकत असताना मुले मुक्तपणे विचार करतात. त्यांना संकोच वाटत नाही आणि त्यामुळे त्यांची सर्जनशीलता व तर्कशक्ती विकसित होते. अन्य भाषेत शिक्षण घेतल्यास मुले भाषेच्या अडचणीत अडकून विषय समजून घेण्यात अपयशी ठरू शकतात.

३. आत्मविश्वास वाढतो

मुलांना जर त्यांच्या ओळखीच्या भाषेत शिकवले गेले, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना उत्तर देताना किंवा प्रश्न विचारताना संकोच वाटत नाही. हीच गोष्ट त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाला एक सकारात्मक दिशा देते.

४. संस्कृतीशी नाते टिकते

मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांना आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि सामाजिक मूल्यांचे भान राहते, जे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त असते.

५. आंतरराष्ट्रीय संशोधनाचा आधार

युनेस्कोसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व मान्य केले आहे. संशोधनानुसार, ज्या मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळते, त्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होते आणि गळती दरही कमी होतो.

मुलांचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास, आणि सशक्त शैक्षणिक पाया घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे. इतर भाषा शिकाव्यातच, पण त्या नंतरच्या टप्प्यांवर. शिक्षणाचे बीज हे जिथे मुळ घटक समजायला सोपे जाते, अशा मातृभाषेतच पेरले गेले पाहिजे.

© #eaksharman

Tuesday, June 17, 2025

लेख अनुभव

एका सैनिकाला लिफ्ट दिल्यानंतर तरुणीला आलेला अनुभव बघून तुम्हालाही लाज वाटेल या समाजाची

लाज वाटती मला या समाजाची !
बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी लॅपटॉप बाजूला सारला आणि तिच्याकडं पाहत विचारलं, “काही बिनसलं का स्कुलमध्ये ?” त्यावर कोरड्या डोळ्यांनी गॅलरीकडं पाहत म्हणाली, “काही बिनसलं नाही रे, पण एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं.”
हिच्या स्कुलमध्ये नक्की काहीतरी झालं असणार, असा विचार करत मी तिच्याकडं खुर्ची वळवली. तशी ती बोलू लागली, “अरे मी स्कुलमधून निघाले, तोच कॅम्पमध्ये एक सैनिक उभा दिसला. अंगावरच्या कपड्यांवरुन ते लक्षात येत होतं. त्याच्या पाठीवर एक आणि हातात दोन बॅगा होत्या. येणाऱ्या गाड्यांना तो हात करत होता. पण, त्याच्या हातातलं सामान पाहून कुणीच थांबत नव्हतं. नेमका तो अशा ठिकाणी उभा होता, की तिथं बस येण्याचा प्रश्‍न नव्हता. म्हणून मी त्याच्यासमोर जाऊन थांबले. तर शेजारच्या गाड्यांवरुन जाणारे पुरुष आणि बायाही माझ्याकडं तिरक्‍या नजरेनं पाहू लागल्या. मी थांबलेली पाहून
त्या सैनिकानं विचारलं, “दिदी कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही ?”
मी म्हणाले, “तुम्हाला त्या कॅनॉलपर्यंत सोडू शकते. तिथून तुम्हाला बस मिळेल.”
स्मित करत तो गाडीवर बसण्यास तयार झाला. त्यानं दोन्ही बॅगा स्वत:च्या मांडीवर अशा पद्धतीने घेतल्या की मला त्याचा धक्काही लागणार नाही. तो गाडीवर बसला. पण, रेस वाढवूनही गाडी पुढं सरकत नव्हती. तर त्यानं एका पायानं जोर देत गाडी पुढं ढकलली.
“कुठून आलात” असं मी त्याला विचारलं, तर म्हणाला, “श्रीनगरवरुन आलोय. स्टेशनवरुन आमची गाडी होती. त्या ट्रकमध्ये कॅन्टोन्मेंटपर्यंत आलो. पण, इथून पुढं जायला बस, रिक्षा काहीच मिळत नव्हतं. म्हणून गाड्यांना हात करत होतो.”
माझी गाडी आता बऱ्यापैकी धावत होती. स्पीडब्रेकर आल्यावर मी ब्रेक दाबत होते. पण, तो थोडाही पुढं येत नव्हता. उलट त्यानं गाडीचं कॅरियर पकडून धरलं होतं. कॅनॉल येताच मी गाडी थांबवली. तसं मी त्याला स्वत:हून विचारलं की तुम्हाला नेमकं कुठं जायचंयं ?
तसा तो म्हणाला, “मी सासवडचा आहे. अडीच वर्षानंतर आलोय. मला हडपसरला जायचंय. तिथुन एसटी मिळेल मला.” त्यावर मी त्याला म्हणाले की चला मी तुम्हाला हडपसरला सोडते. त्याला मोठा आनंद झाला आणि तो पुन्हा त्याच आत्मियतेने गाडीवर बसला. तो बसत असताना मात्र आजुबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने माझ्याकडं पाहत होते. काहींना माझा अभिमान वाटत असावा. काहीजण मात्र, गालातल्या गालात कुत्सित हसत होते. एका तरण्याबांड जवानाला मी गाडीवर बसवतीये, अशी काहीतरी घाणेरडी भावना साऱ्या लोकांच्या डोळ्यात होती. तो बिचारा अडीच वर्षांनी त्याच्या घरी आलाय. त्याला लिफ्ट द्यायला एक माणूस थांबत नव्हता. तो तिकडं आपल्या देशाच्या सीमेवर बिनधास्त उभा राहतो, म्हणून आपण हितं निवांत झोपतो आणि मी त्याला लिफ्ट दिली तर हे हरामखोर लोक माझ्याकडं पाहून हसत होते.
काय चुक केली होती रे मी ?
असं म्हणत बायको रडायलाच लागली. तिला सावरणेही शक्‍य नव्हते. तशी रडक्‍या डोळ्यांनी पुढं बोलू लागली,
“मी त्याला हडपसरला सोडलं, तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, दिदी आम्हाला चालायची सवय असते. पण, जेव्हा आम्ही चालून थकतो, तेव्हा इथल्या बायातर सोडा, पुरुषही आम्हाला लिफ्ट देत नाहीत. असो.”
असं म्हणत त्यानं नमस्कार केला आणि बसस्टॉपच्या दिशेने निघून गेला.
खरोखरच लाज वाटतीये मला या समाजाची !
असं म्हणत पुन्हा पंधरा मिनिट बायको फक्त मुसमुसत राहिली. अशा प्रसंगाच्या अनुभवानंतर समजूत तरी घालणार कशी ?
-नितीन थोरात