Friday, September 12, 2025

लेख

हल्ली उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बेवारस वासरं पाळायचा दौर आलाय, अर्थात त्यांची घरं मोठी आहेत, त्यांच्या घराला मागे पुढे आवार आहेत. पण तरी हा विचार च किती सुंदर आहे. पण याचा प्राॅपगंडा कोणी करणार नाही.दोन वर्षांपूर्वी मी याच आशयाची एक कथा लिहीली होती, चांगला प्रतिसाद मिळाला होता किती जण चाँद सुरज ला पहायला सफाळ्याला जायला तयार होते. म्हणजे आपण ही असा विचार करू शकतो. दाक्षिणात्य अभिनेते तर गायींची सेवा आणि पूजा करतानाचे रील्स व्हायरल करतायत, जयपूर उदयपुर, कोटा, बुंदी अशा शहरात तर कधीपासून वासरं घरात पाळायला सुरुवात झाली. त्यांचा अनुभव असा वासरं लवकर शिस्त शिकतात त्यांच वेळापत्रक फार वक्तशीर असतं लाडात येऊन पिझ्झा बर्गर, गोड पदार्थ त्याना खायला द्यायचे नाहीत, चांगली शेकलेली भाकरी पोळी जरूर द्यावी पण चारा, भुईमूगाची टरफलं, शेंगा,कडबा हाच त्यांचा मुख्य आहार .वासरं ठराविक वयात दंगा करतात तेवढे चार पाच महिने जपावं लागतं मग एकदम शांत होतात 
या अशा घरात रमलेल्या गायींचे किस्से खूप ऐकण्या सारखे असतात. जयपूर जवळ एका गर्भश्रीमंत घरात असाच गायींचा कळप पाळला होता.काही कामा निमित्त घरचे कर्ते पुरुष बाहेर गावी कामा साठी गेले असताना त्यांच्या गाडीला जिवघेणा अपघात झाला बरोबर त्याच वेळी कळपातील काही गायी इतक्या अस्वस्थ झाल्या की घरचे त्यांचे विचित्र वर्तन बघून घाबरले.एक गाय तर देवघराच्या बंद दरवाजाला धडका देत होती.इतक्यात अपघाताची वार्ता समजली.पुढे ते दोघे बंधू शुध्दीवर येई पर्यंत या गायी व्रतस्थ राहिल्या. धोका टळल्याचं कळल्यावर एकच जल्लोष झाला तेव्हा या गायींना ताक मिश्रीत पाणी देण्यात आलं.पुढे त्यांची मानाची मिरवणूक ही निघाली कारण ज्या पध्दतीचा अपघात होता त्यात हे बंधू बचावणं असंभव होतं.
माझे मित्र म्हणाले कुत्रे मांजरं पाळण्या इतकच गायींना घरात स्थान देणं सोपं आहे.

© चंद्रशेखर गोखले

Tuesday, September 9, 2025

कथा १

आर आर आबांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने पार्थिवावर हंबरडा फोडला. खालच्या चार ओळी जरूर वाचा. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
.
एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
.
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
#कथाविश्व 
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...
.
'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
Fb group post