हल्ली उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बेवारस वासरं पाळायचा दौर आलाय, अर्थात त्यांची घरं मोठी आहेत, त्यांच्या घराला मागे पुढे आवार आहेत. पण तरी हा विचार च किती सुंदर आहे. पण याचा प्राॅपगंडा कोणी करणार नाही.दोन वर्षांपूर्वी मी याच आशयाची एक कथा लिहीली होती, चांगला प्रतिसाद मिळाला होता किती जण चाँद सुरज ला पहायला सफाळ्याला जायला तयार होते. म्हणजे आपण ही असा विचार करू शकतो. दाक्षिणात्य अभिनेते तर गायींची सेवा आणि पूजा करतानाचे रील्स व्हायरल करतायत, जयपूर उदयपुर, कोटा, बुंदी अशा शहरात तर कधीपासून वासरं घरात पाळायला सुरुवात झाली. त्यांचा अनुभव असा वासरं लवकर शिस्त शिकतात त्यांच वेळापत्रक फार वक्तशीर असतं लाडात येऊन पिझ्झा बर्गर, गोड पदार्थ त्याना खायला द्यायचे नाहीत, चांगली शेकलेली भाकरी पोळी जरूर द्यावी पण चारा, भुईमूगाची टरफलं, शेंगा,कडबा हाच त्यांचा मुख्य आहार .वासरं ठराविक वयात दंगा करतात तेवढे चार पाच महिने जपावं लागतं मग एकदम शांत होतात
या अशा घरात रमलेल्या गायींचे किस्से खूप ऐकण्या सारखे असतात. जयपूर जवळ एका गर्भश्रीमंत घरात असाच गायींचा कळप पाळला होता.काही कामा निमित्त घरचे कर्ते पुरुष बाहेर गावी कामा साठी गेले असताना त्यांच्या गाडीला जिवघेणा अपघात झाला बरोबर त्याच वेळी कळपातील काही गायी इतक्या अस्वस्थ झाल्या की घरचे त्यांचे विचित्र वर्तन बघून घाबरले.एक गाय तर देवघराच्या बंद दरवाजाला धडका देत होती.इतक्यात अपघाताची वार्ता समजली.पुढे ते दोघे बंधू शुध्दीवर येई पर्यंत या गायी व्रतस्थ राहिल्या. धोका टळल्याचं कळल्यावर एकच जल्लोष झाला तेव्हा या गायींना ताक मिश्रीत पाणी देण्यात आलं.पुढे त्यांची मानाची मिरवणूक ही निघाली कारण ज्या पध्दतीचा अपघात होता त्यात हे बंधू बचावणं असंभव होतं.
माझे मित्र म्हणाले कुत्रे मांजरं पाळण्या इतकच गायींना घरात स्थान देणं सोपं आहे.
© चंद्रशेखर गोखले
0 comments:
Post a Comment