Tuesday, January 29, 2013
Monday, January 28, 2013
ई साहित्य कथा विभाग
ई साहित्य कथा विभाग
शो-पीस (कथा संग्रह) ~ अरुण वि देशपांडे
October 29, 2012
--------------------------
अनंतराव एक लोकप्रिय हेडक्लार्क म्हणून विख्यात होते. याचे रमाबाईंना भारी कौतुक होते ... त्यापेक्षा काकणभर जास्त अभिमान होता.
नवर्याच्या आवडींना जपणे, लक्षात ठेवून त्या पुरवणे, - असा प्रेमळ स्वभाव असणार्या रमाबाईंनी इथल्या नव्या नव्या वातावरणात पलटी का मारली असेल? अनंतरावांना काही कळेनासे झाले.
Download ईबुक @ http://www.esahity.com/
-------------------------- ----
विषामृत (कथा संग्रह) ~ आनंदिनी
July 28, 2013 ·
July 28, 2013 ·
या सर्व कथा यातील पात्रे काल्पनिक आहेत. पण त्यातील नाती जसे सासू सून , नवरा बायको , आई बाळ , त्यातल्या पक्क्या गाठी , त्यातले प्रेम काल्पनिक कसे असू शकते..
-------------------------- ----
-------------------------- ----
वाचकांच्या प्रतिक्रिया :
मराठी कथा फारच छान आहे, कथा एकदम दर्जेदार आहे
---संजय गोखले
-------------------------- ----
पुस्तक वाचायला साधारण विस मिनिटे लागली .प्रयत्न चांगला आहे अजून कथेत सकसपणा आणता आला असता .पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा
---आनंद खेर
-------------------------- ----
October 1, 2013
--------------------------
हे मंदार कात्रे अर्ध्याहून अधिक काळ परदेशात असतात. आणि परदेशी नोकरीच्या आकर्षणात मराठी मुलांची कशी कशी फ़सवणूक होते त्याचे सत्य अनुभव म्हणजे हा कथासंग्रह” आभास हा”.
--------------------------
Ebook download @ http://www.esahity.com/
--------------------------
वाचकांच्या प्रतिक्रिया :
नमस्कार
आपला कथासंग्रह आभास हा नुकताच वाचला ,मला मनापासून यातल्या कथा पात्रे
संवाद आणि प्रसंग आवडले . आभास हा कथेतील चंदू किंवा चकवा कथेतील आशिष
म्हणा किंवा वेंकट अय्यर या व्यक्ती समाजात आजूबाजूला दिसत असतात जाणवून
येतात . पण भूलभुलैया मधील विश्वकर्मा ,सलील देशमुख डॉन कथेचा नायक
,अवलिया चंदू या खरोखरच फार भयानक भीषण वाटाव्या अशा प्रसंगातून गेलेल्या
दिसतात . नातेवाईक मित्र मंडळी परदेशात स्थायिक असतात नोकरी करत असतात पण
अस काही घडत असेल याची वरवरदेखील कधी कल्पना येत नाही ,पेपरमधून अधून
मधून अशा गोष्टी वाचायला मिळतातच "नार्वे सरकारने लहान बाळ ताब्यात घेणे
,ऑस्ट्रेलिया चीन मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्रास" पण हे सगळ वाचले
जाते आणि सुटून जाते . आपल्या या साऱ्या कथांमधून हे प्रसंग प्रत्यक्ष
अनुभवणारी व्यक्ती कोणत्या विचारसरणीतून कोणत्या मानसिक स्थितीतून जाते
आहे हे खरच समजून येते . वाचताना प्रत्येक कथेशी एक भावनिक नाळ जोडली
जाते . शेवटी जात पात धर्म लिंग भाषा रेहन सेहन वेश देश या साऱ्या सीमा
ओलांडून पुढे गेले तरी आयुष्य नावाची गोष्ट समोर येत राहते आणि त्याला
न्याय "चांगुलपणा आणि माणुसकी " नावाचीच गोष्ट देत राहते ,आपल्या कथा
वाचताना मला पुन्हा पुन्हा हेच जाणवले .
आपले मनापासून अभिनंदन आणि सदिच्छा
----कविता मोकाशी ,मिरज
--------------------------
अंतरीच्या गूढगर्भी
December 12, 2013
लेखक ~ संकल्प आभाळे.
कथासंग्रह
__________________________वाचकांच्या प्रतिक्रिया :
संकल्पच्या कथांबद्दल प्रसिद्ध कवी संदिप खरे म्हणतात, “ संकल्पच्या कथा या जगण्याला संवेदनशील हातांनी स्पर्श करणार्या कथा आहेत. आयुष्यातल्या बारिकसारिक घडामोडींचा, नातेसंबंधांचा आणि अनुभवांचा त्या वेध घेऊ पहातात. ... आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी आणि जिवंत मनाने संकल्प पहातो...”
__________________________
Ebook download @
http://www.esahity.com/
__________________________
ध ध ध ध धमाल विनोदी #कथासंग्रह
January 28, 2014
भव्य दिव्य अवाढव्य : विजय काचरे
__________________________
Ebook download @ http://www.esahity.com/ uploads/5/0/1/2/501218/ bda_bhavy_divy_awadhavya.pd f
__________________________ ___
ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
__________________________
ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
Saturday, January 26, 2013
Monday, January 14, 2013
मकरसंक्रांत SMS
मकरसंक्रांत SMS
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मांजा, चक्री…
पतंगाची काटाकाटी…
हलवा, तिळगुळ, गुळपोळी…
संक्रांतीची लज्ज्त न्यारी…
पतंग उडवायला चला रे….!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
आठवण सुर्याची,साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा,ऋणानुबंध वाढवा...!!!
!!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!
Tuesday, January 8, 2013
RIght TO Recall - राईट टू रिकॉल प्रस्तावित कायदा
Sunday, December 30, 2012
काव्यसंग्रह विभाग
८:०५ :: ७:१६ ~ सचिन काकडे
-----------
सचिन काकडे याचे हे ८:०५ :: ७:१६ अशा विचित्र नांवाचे पुस्तक म्हणजे अशा लखलखीत कवित्वाचा पुरावा. मुंबईत रोज चाळीस लाख लोक लोकलचा प्रवास करतात. पण सचिनला कॉलेज आणि नोकरीची कसरत करत असताना, जी लोकल दिसली ती लाखातील एखाद्यालाच दिसते, जाणवते, सतावते आणि आश्वस्तही करते. ही लोकल कधी त्याला आईसारखी मायाळू भासते तर कधी तिचा राक्षसी थंडपणा त्याला हादरवून टाकतो. लोखंडाच्या अनेक पत्र्यांच्या पलिकडे चिरडत जाणारा जीव सचिनच्या काळजाला हात घालतो. गार हिरवळ त्याचे डोळे शेकते. सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार जाणीवांनी सचिनची कविता अतिशय टोकदार झाली आहे. हे टोक जाणवायला कातडी मात्र जिवंत असायला हवी. नाहीतर आजकाल बघू नये ते बघून बघून डोळे, मन आणि आत्मासुद्धा निर्जीवच अस्ल्यासारखे असतात. त्यांना संजीवनी देण्याचे काम सचिनच्या या कविता करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
------------
Free download #eBook copy @
बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @
------------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com
बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @
------------------
बालभारती २
-----------
आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @
चार क्षण ~ संतोष नार्वेकर
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @
------------------
क्युबिकल्स~ आनंद माने
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @
लालनाक्या ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @
------------------
डरकाळी ~ गणेश पावले
------------
संग्रहातून :
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश असावा लागतो ...
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून चालण न्हवे
त्यासाठी शत्रू सोडाच त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं लागतं..
आग्राहून सुटका.. आणि शास्तेखनाची फजिती.. अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व यायला
माझ्या राजांसारख रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे भोसले असावं लागतं...
------------
Free download #eBook copy @
------------------
ग्रेव्हयार्ड लिटरेचर ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @
------------------
कृष्णा ~ स्वप्ना कोल्हे
------------
Free download #eBook copy @
------------------
अहं ब्रहास्मि
-----------------
Free download #eBook copy @
------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com
------------------
Tuesday, December 11, 2012
Thursday, December 6, 2012
Tuesday, November 13, 2012
दिवाळी SMS
दिवाळी SMS
सप्तरंगाच्या या प्रकाशपर्वाने
उजळून गेले कोपरे सारे
किरणांना ओंजळीत भरा त्या
अन् दीनांघरी घेऊन जा रे...
अंधाराच्या प्रत्येक कणावर
मात करणाऱ्या या
**दीपोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा**
******************
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
************
Thursday, November 1, 2012
कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१२
Kalaavishkaar_E-Diwali Magazine_November_2012
कलाविष्कार - ई दिवाळी अंक
---------------
प्रथमश सुरेश शिरसाट
संपादक आणि प्रकाशक
Fb page @ https://www.facebook.com/kalavishkaar.ediwaliank
Fb Profile @ http://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988
Wednesday, October 24, 2012
Wednesday, October 17, 2012
नवरात्र
नवरात्र
अश्विन
शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या
दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या
मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात.
या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी
लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून
त्यावर फुलांची माळ सोडतात, नऊ दिवस रोज ...
एक
नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या
झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात
तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात,
तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला
ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा
पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी
या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले
जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या
पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना
करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री
देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन
होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून
घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून
उपवासाची सांगता करतात.
आदिशक्तीची नऊ रुपे : नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.
पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री
Tuesday, October 16, 2012
दुर्गेचे रूप
दुर्गेचे रूप
दुर्गेचे रूप
- दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिलाशैलपुत्रीअसे नाव पडले आहे....
- नवशक्तीपैकी ब्रम्हचारिणी हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
- दुर्गेच्या तिसर्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.
- दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.
- दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते.
- दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते.
- दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते
- दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.
- दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे

































