Sunday, February 26, 2012

निसर्ग कविता


मनातल्या पहाटेला पारिजात फुले
पाखरांचे थवे गंधवेडे झाले
मनातल्या उन्हात झाडे बहरली
आशेची पाखरे वर उडू लागली
मनातल्या पानोपानी दवबिंदू झुले
सोनेरी किरणात त्याचे मोती झाले
मनातल्या उन्हात वायूलहर झुले
मंद गंधाचे दर्वळ दूरदूर पसरले
मनातले ऊन असेच राहू दे कोवळे
मध्यान्हीच्या तीव्र धगीपासून मोकळे....!!!
-अनामिक

0 comments: