Wednesday, May 22, 2013

ई साहित्य कांदबरी विभाग


टल्लीची शाळा
----------
टल्लीची शाळा. ई साहित्यचं पहिलं ई पुस्तक
----------
Free download ‪#‎eBook‬ copy @
http://www.esahity.com/uploa…/…/1/2/501218/tallichishala.pdf
----------------



सईची वही... काही पानं निखळलेली ~ सुप्रिया जाधव जोशी
July 14, 2013
------------------

प्रेम... एक नाजुक भावना.
वयात येता येता प्रेमात पडणं हे अत्यंत नैसर्गिक. पण त्यातल्या भावुकतेला दुर्बलता मानून जेव्हा कोणी फ़सवणुकीचे जाळे विणतो आणि त्यात एखाद्या अजाण मुलीचा बळी जातो. पण कुणी अशीही निघते जी त्या जाळ्याला भेदून त्या पारध्याचीच शिकार करते. एका धाडसाची कथा आहे ही.
लाल गुलाबांसह हा एक लाल सिग्नल दाखवण्याचा प्रयत्न. 
प्रत्येक मुलामुलीने आणि पालकांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
----------------------



Free download #eBook copy @ :  


-------------------



आरंभ एक नवी वाटचाल ~ शशांक नवलकर
---------
लघु कादंबरी ... प्रेम कथा
-------
Free download #eBook copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aarambh_ek_navi_vatchal......pdf

------------

रोबो : लेखक : दिनानाथ मनोहर
May 22, 2013
---------------------------
महाराष्ट्र राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कादंबरीचे पारितोषिक लाभलेली कादंबरी
--------------------------------
Free download #eBook copy @
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/robo.pdf

---------------
रोबो संग्रहातून .......

त्या माणसाच्या ओठांवरून ओघळणाऱ्या हास्यामधून, त्याच्या नजरेमधून सर्व काही स्पष्ट होत होते. त्याने खिशात हात घातला. बराच वेळ खिशात चाचपले. खिशातून एक पावली काढून त्याने तिच्या हातात दाबली. पावली काढताना मघाशी खिशात कोंबलेले ते पत्र बाकावरून घसरत जाऊन त्याच्या पायाशी पडले. तिने थोडीशी नाराजी दाखवली; पण पावली कमरेला लावीत ती उठली व त्या माणसाच्या समोर बसलेल्या माणसाकडे सरकली. डिकीने घाईघाईने खिशातून एक रुपयाची नोट काढून समोरील बाकावर ठेवली. त्याने आपल्या सहप्रवाशांकडे पाहिले. समोरच्या बाकावरील दोघे सैनिक हसत होते. एकटक त्या पोरींकडे पाहाणाऱ्या त्यांच्या डोळयांत वखवखलेली भूक होती. त्या पोरींनी आता दुसऱ्या माणसांचा ताबा घेतला होता. दोघी त्याच्याशी लाडीगोडी करत होत्या. त्याच्या खिशाकडे त्यांचे लक्ष होते.
डिकी कोपऱ्यात सरकला, त्याने आपले अंग आक्रसून घेतले होते. त्यांच्यातील एक पोरगी त्याच्याजवळ आली. त्याने बोटानेच बाकावरील नोट तिला दाखवली, ओठावर स्मित आणण्याचा त्याने प्रयत्न केला. आपल्या डोळयांतील घृणा, किळस तिला दिसू नये, असे त्याला वाटत होते. त्या पोरींना कोण नाचावयास लावते, त्यांना रस्त्यावर येण्यास भाग का पडते, हे त्याला समजू शकत होते.
ती पोरगी क्षणभर घोटाळली, त्याच्या चेहऱ्याकडे पाहात राहिली, मग झटकन् तिने ती नोट कपाळाला टेकवून, किंचित खाली झुकून तिने त्याला सलाम केला आणि ती मागे वळली.
मिसामारी स्टेशनवर पाच सहा नग्न मुले आरडाओरड करीत डब्यात शिरली व दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडली. त्याने बाहेर पाहिले. गाडी स्टेशनच्या बाहेर उभी होती. समोरच एका शेतातील झोपडीबाहेर एक स्त्री कमरेवर पोरीला घेऊन उभी होती. नजर शून्यात लावून, अविचल, स्तब्ध. गाडी चालू झाली, तरी ती स्त्री तशीच उभी होती. खिडकीतून डोके बाहेर काढून तिच्या पुसट होणाऱ्या, अंधारात वितळत जाणाऱ्या आकृतीकडे पाहात राहिला. तिच्या कमरेवर बसलेल्या त्या पोरीचे भवितव्य काय आहे? कदाचित दहा बारा वर्षांनंतरती पोर मोठी होऊन पेटीच्या सुरावर अशीच रेल्वेच्या डब्यात त्याच्यापुढे येईल!
चीनने दिलेल्या धक्क्याच्या खाणाखुणा जरी नष्ट झाल्यासारख्या वाटत असल्या, तरी सैनिक तो प्रसंग अजून विसरले नव्हते. अजूनही गप्पा मारताना जुने लोक एकेका स्थळाशी, रस्त्यावरील मैलांच्या दगडाशी निगडित असलेल्या आठवणी सांगत होते. पंजाब सरहद्दीवर, सरहद्दीपलीकडील माणसांबद्दल असणारा द्वेष, चीड, संताप त्याला अनेकदा जाणवला होता. पण इथे त्याचा अभाव होता. खरे म्हणजे तो प्रसंग एका पराभवाची, एका न लढलेल्या युध्दची कहाणी होती. तरी पण सैनिकांच्या आठवणींना शरम, अपमान, दु:ख यांची झिलई नव्हती.

----------------------


ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
esahity@gmail.com

0 comments: