Wednesday, July 23, 2014

एक एक करून उडाले पक्षी


#मराठी

एक एक करून उडाले पक्षी
राहिली व्रणांची देहावर नक्षी

वठलेले खुरटे सुकलेले झाड
तिकडे विहीर इकडे आड

कुणाला कुणाचा लागावा पत्ता?
झिंगलेल्या राजाची झिंगलेली सत्ता

वेल्हाळ पाखरू रानात एकटं
गिधाड करतय शिकारी कट

झेपेल का खांद्यावर ओझं?
रिकाम यावं रिकाम जावं...

वैऱ्याच्या हाती फुलांचा हार
विखारी नखाला लावलीय धार

कुणाचे कुणाशी जराही पटेना
झालेला गुंता अजूनी सुटेना

काटेरी वाटेला फुटलेला फाटा
जन्माआधी गावभर बोभाटा

- मनिषा नाईक
https://www.facebook.com/nkmanisha

0 comments: