Monday, February 3, 2020

वपु

वपुर्झा - व. पु काळे (भाग २)

माणसाला काही न काही छंद हवा, स्वप्न हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी, त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. हे हरवणं सापडणं प्रत्येकाच निराळ असत. नवरा बायकोचं एकच मत असलं तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. नवरा बायकोच्या या हरवण्या सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुखदुखःचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अश्या जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील तर प्रकृतीधर्मानुसार ते स्वाभाविक आहे पण तो एकमेकांचा टिंगलीचा विषय होऊ नये, इतपत भान संसारामध्ये ज्यांना टिकवता येईल त्यांना संसारसुखाचं मर्म सापडलं. ज्यांना असे ठरवता येत नाही ते रिकाम्या वेळेचे बळी होतात आणि रिकामा वेळ हा सैतानाचाच असतो.

किती दमता तुम्ही? या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईलापण एव्हढ एकच वाक्य हवं असत आणि कामावरून आलेल्या पुरुषालापण. इतर कितीही गरजा असोत पण हे एव्हढ एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे, त्या पुरुषानं आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक करता येऊ नये आणि बायकोला नोकरी करता येऊ नये. एकमेकांचे कर्तुत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कर्तुत्व टिकत. त्यात काय आहे हे मी पण करीन इथ अर्पणभाव संपला स्पर्धा आली, कौतुक संपल तुलना आली, साथ संपली स्वत्वाची जाणीव आली.

संसार... संसार या शब्दाबरोबरच संघर्ष आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही, नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारामध्ये या संघर्षाचे खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकच. पण असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुडनाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचे ताज्या मनानं स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी काहीही वेगळ करावं लागत नाही. अरे नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनानं सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत जरूर असतो.

बायको... बायको म्हंटल ना मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही कारण संशय हा नेहमी दुष्ट बुद्धीने घेतला जातो असं मला वाटत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावरच प्रेम असावं ही भावना त्या मागं असते. महत्व त्याला नाहीये, तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा मात्र उबग येतो. ‘अति सर्वत्र वर्जेयीत’ म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा बायकोने एकमेकांवर प्रेम करण सुद्धा वाईट. प्रेम माणसाला दुबळ बनवत. प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे, त्याला त्याच स्वतःच स्वतंत्र अस्तित्त्व आहे, जीवन आहे. केवळ स्वतःचा उत्कर्ष आहे इतकच नाही तर स्वतंत्र असा अध्धपातही आहे. ह्याचा विचार, ह्याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही. प्रेमान माणूस ताकतवान बनला पाहिजे. नवराबायकोंच एकमेकांवर अमर्याद शेवटी गुलाम बनवाण्याची शाळा ठरतं. त्यात व्यक्तित्त्वाचा विकास करायची ताकत नसते. कलाकाराला असलं प्रेम नको असत, त्याची कला ही त्याची संजीवनी असते, डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं. ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या सौ. ला कधीच धक्का लागायचा नाही. प्रत्येक कलावंताच्या पत्नीन आपल्या जोडीदारासाठी आपण हे करत आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जिला जमत नाही तिला मग आपलाच पराभव झाला असं वाटायला लागत. कलाकाराशी संसार हा ह्या अर्थाने सुळावरची पोळी असते. 

न मावणार दुखः नेहमीच जीवघेणं असतं, कारण तुमचा जीवच तिला दुखःपेक्षा लहान झालेला असतो. त्या माणसाने नेहमीच दुखःपेक्षा मोठ व्हायचं ध्येय ठेवावं. दुखः मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहिलं इतकं मोठ व्हाव. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठ भांड वापरायच पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही ते भांड ओसंडून जाईल इतकं ते छोट ठेवायचं.

ताकत स्पर्शाची असते की आपल्याच मनात जी अनिवार ओढ असते तीच हे सामर्थ्य. जादू शरीरामध्ये असते की नावात. चार सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटत त्यापेक्षा दुसऱ्या गायकाने पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळ वाटत. श्रोत्यांच्यामध्ये एखादीजरी नावाजलेली व्यक्ती आढळली तर घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो, का? नावाची महती. फक्त नावाचीच महती असते? नाही असं मुळीच म्हणता येणार नाही. चार सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात, भक्तीने ऐकतात, विभूतीपूजाही त्यात डोकावत असते. अशी माणस फक्त समोर चाललेली मैफिलच ऐकत असतात पण ज्या माणसाने संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरास्वरामागे रियाज ऐकू येत असतो. तो कदाचित मैफिल ऐकतच नसतो. तो मागची तपश्चर्या पाहत असतो. एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवत असतो. स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो, साम्य शोधत असतो. स्वरांच्या प्रवासाची सगळी वळण त्याला तानेतानेतून दिसतात. वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घ श्वास घ्यावा लागतो ती स्पंदन जाणकार प्रेक्षकाला कळत असतात. त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळ चैतन्य देतो. कौतुक कुणी केलं याला महत्त्व प्राप्त होत. जे संगीताच्या बाबतीत तेच प्रेमाच्या. तसच प्रेम आणि स्पर्शाच नात असावं. कातडीचा स्पर्श दुसऱ्या कातडीसारखाच असतो. नव काही असेल तर त्या स्पर्शामागे तात्काळलेली अनेक अनेक वर्षांची प्रतीक्षा त्यातून उफाळलेला आवेग, उत्कटतेच तोरण आणि व्यक्तीच नावही. तो स्पर्श प्रतीक्षेला असतो आणि प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही.

संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. अरे तो होतो भक्तीतून, प्रेमातून, प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीन व्यवहायिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यांच्यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःच निराळ अस्तित्त्व मानलेल नसतं, तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एव्हढीच तिची एकमेव इच्छा असते आणि मग तेव्हढ्यासाठीच तिला प्रेमामध्ये भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावनापण स्वभाविक आणि कुणीतरी कलावंतावर भाळत राहण हेही स्वभाविकच. तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला अकारण नालायक समजायला लागते, कल्पनेचे इमले रचायला लागते. नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोचला असणार असं बायको गृहीत धरते. तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव वाटतो, अपमान वाटतो आणी मग नवऱ्याची कलासाधना हा तिला ताप वाटतो. अशी बायको नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटत का? बायको एकवेळ शरीराने दूर झाली तर चालेल पण मनानं, विचारानं दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काहीकाळच अस्वस्थ करणारा असतो पण दुसऱ्याबाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटल तरी सहजी फुटत नाही. पुरूषांच निम्म अधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा शरीरसुखासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही अशीच त्यांची गोड समजूत आहे आणि त्याला तसच कारणही आहे. शरीर सुखासाठी स्त्री राबवली जाते पुरुष फायदा घेतात ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आलेला आहे.

एकदा केव्हातरी शांत बसावं आणि वयानुसार आपण काय काय सोडल्यात याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येत गाभोळलेली चिंच अनेक वर्ष खाल्ली नाही, जत्रेमध्ये मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही, चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असे आता वाटत नाही कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलीडोस्कोप कधी आपणहून पाहिल्याचे आठवत? सर्कसमधला जोकर आपले मन रिझवू शकत नाही तसेच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीच्या सुखाचा काळ कधी नेला हे आपल्याला कळलच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत, दोनदोन मुलांच्या जोड्या करून चालण नाही, विटीदांडू नाही, साबणाचे फुगे नाही, प्रवासात बोगदा आला की अनामिक हुरहूर नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्दक्य तिने आपल्याला दिले म्हणून ती उडू शकते आपण जमिनीवरच आहोत. 

कुंकू, मंगळसूत्र, पांढर कपाळ ह्या खुणांच्यावरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले सायबा. हल्ली संपूर्ण मोत्यांचा माळेत मानेमागे वेणीखाली लपेल असा एकच काळा मणी असतो. नवऱ्याचे संसारात स्थान किती हे या फॅशनवरून समजत पण हिला नवरा आहे की नाही हे समजत नाही. स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे. तो प्रेमाचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा. जातायेता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते, रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कनं तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ओंफिसरने फाईल देताना तेच, हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटात चिकटून जाते, वर पुनः सॉरीच गुलाबपाणी शिंम्पडायचं आणि एक ओषट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो, नजरा दुसर काही ओकतच नाहीत. स्त्री देहावरती या ज्या अर्थपूर्ण नजरांची पुट चढलेली असतात पुट. भारतीय युद्ध समाप्तीनंतर कृष्णाने अर्जुनाला प्रथम रथातून उतरायला सांगितले. अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचे ऐकून तो उतरला. त्यानंतर कृष्ण उतरला आणि अर्जुनाचा रथ जळून गेला. तेव्हा कृष्णाने सांगितले कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा प्रभाव रथावर झालेला होता. आगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता. आयुष्यभर स्त्री देहाचं सौरक्षण करणारा कुणी अजाद कृष्ण असलाच पाहिजे, नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.

Youtube@
http://www.youtube.com/watch?v=jaa58LYgz6I

0 comments: