Thursday, August 14, 2025

लोकमत सखी स्वप्न पहा शीतल महाजन

 स्वप्न पाहा, अडथळे येणारच. ते आले की विचारा स्वतःला, का?
आणि शोधा उत्तर.

भारतीय महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. साधनांची आणि संधीची कमतरता असली तरीही.  जे ठरवलं आहे ते करता येऊच शकतं !   पण मग आपण कमी कुठे पडतो  आपल्याला काय हवं ते ठरवण्यात. 

आपलं ध्येय निश्चित करण्यात आणि  त्यांचा पाठलाग करण्यात आपण कमी पडतो.

का?

समाज काहीतरी सांगतो महणून आमच्या अनेक मुली स्वप्नं ही बघत नाहीत. अमुक एक आपल्यासाठी नाही असं आपलं आपणच ठरवून टाकतात. 

मग कथी स्वतःला, तर कधी परिस्थितीला दोष देत असतात.

 माझे एक्च सांगणं आहे  , की आपल्याला हवी ती स्वप्नं बघा आणि ती सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी 

सर्वार्थाने प्रयत्न करा. अडथळे  येणारच. मात्र त्या अडथळ्यांना घाबरून जाऊ नका, अडथळ्यांचं स्वरूप वेगळं असू शकतं, मात्र अडथळे येणारच हे स्वीकारून पुढे जात राहिलं तर मार्ग सोपा होतो, तुमचे कसोशीचे प्रयत्न पाहिले की तुमच्या स्वप्नांना  होत असलेला इतरांचा विरोधही टप्प्याटप्प्यानं मावळत जाईल, मग बघा, यश आणि तुम्ही यात फार अंतर नसेल. 

का ? हा प्रश्न स्वतः लाच विचारायला शिका ! मला जेव्हा कळलं की कुठल्याही भारतीय स्त्रीने दोन्ही ध्रुवावर sky diving केलेले नाही .

तेव्हा मी स्वतः ला च विचारलं का ? आणि मग उत्तर मी शोधलं आणि ते स्वप्न पूर्ण ही केलं !


शीतल महाजन 

लोकमत सखी 

0 comments: