Tuesday, July 20, 2010

जीवन
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !

सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !

चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !

मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या प्रीतीला, या मातीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !

गीत - शांता शेळके
संगीत - राम-लक्ष्मण
स्वर - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
चित्रपट - आपली माणसं (१९७९)
__._,_.___

..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?
---**-----
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,
रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,
तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,,,

-----**----

0 comments: