Wednesday, October 1, 2008

नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.
काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.
मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांनानिशब्द करतेती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावललासाथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
जो रक्ताची नातीच कायपण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं
श्रीमंत आणि सुंदरत्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात
अनजणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अनकामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतीलपरंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

0 comments: