Wednesday, October 29, 2008

आयुष्य
ठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाही
विधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही

सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासठीच होते सारे कलतय पण वळत नाही...........
हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

मला एवढेच वाटते..................................
मला एवढेच वाटते सुन्दर आयुष्य जगावे,
स्वप्नाचे गाव पवलोपावली बसावे

सुन्दर कल्पनानी सजलेले असावे,
वास्तवाचे भान मात्र सदैव रहावे

जगण्याला मानाचा मुजरा असावा,
अपमानाला क्षणीकही थारा नसावा

एक विश्वासाची सोबत असावी,
प्रेमाने मयेने मने जुळावी

मला एवढेच वाटते नवी आशा फुलावी,
येणार्या शतकची सुन्दर पहाट असावी.........

मन
मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं...

0 comments: