Sunday, May 30, 2010

मराठी हास्यकट्टा 34

झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....
शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?
चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला उशीर झाला ..
शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??
झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो .
******************
३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो. पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते.. ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते.. पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का?? ? ? कारण, ती म्हणते, "ई...,केक ला मुंग्या लागल्यात ...!!"
******************
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील??? "माऊ माऊ"!!
******************
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ????? . .
अरे टॉम अँड जेरी सुरु होते ..
******************
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो.
दुसर्‍या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो.
खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
******************
दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अ‍ॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
******************
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
******************
अतीभयानक पीजे रिर्टन्स

एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
. .. कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!

******************
नकार देणे ही कला असेल..
पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.

******************
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,''ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सरम्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''
******************
ट्रिंग ट्रिंग हॅलो हॅलो, प्रकाश आहे का? नाही. मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
******************
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते
की त्याला दुसऱ्या बाईचे लाडपुरवणं अशक्य व्हावं!!!
******************
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,
असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ? *जगात** **एकच** **सर्वात** **सुंदर** **बायको** **असते** **आणि** **
ती** **प्रत्येक** **शेजाऱ्यापाशी** **असते**!!!!*
******************
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून
भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तरत्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ?
उत्तर : चीनी कम!!!!
******************
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.तिथे एक शिकारी येतो आणि
गोळी झाडतो.एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...... का? ..अंगात मस्ती , दुसरं काय ?
******************
-------- --------- ------तू झाडावर चढू शकतोस का ?संजीवनी आणू शकतोस का ?छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?नाही ना? ... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!
******************
तुफान पाऊस पडतोय...तुला वाटत असेलछान बाहेर पडावंभिजून चिंब होतपाणी उडवतगाणं गातानाकुणीतरी खास भेटावं...हो ना?अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
******************
जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.

******************
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्यालोकांनी सरळ दुपारीच उठावे.

0 comments: